Care

घरच्या घरी असा स्वच्छ करता येईल कंगवा, वाचा टीप्स

Leenal Gawade  |  Apr 29, 2019
घरच्या घरी असा स्वच्छ करता येईल कंगवा, वाचा टीप्स

केसांचा गुंता सोडवणारा तुमचा कंगवा तुम्ही नियमित स्वच्छ करता का? 10 पैकी 4 ते 5  जण कंगवा कदाचित नित्यनेमाने स्वच्छ करत असतील. पण उरलेल्यांचे काय? तुम्ही तुमचा कंगवा नीट निरखून पाहाल तर तुम्हाला त्यात अडकलेली घाण दिसेल हीच घाण परत परत तुम्ही केस विंचरताना तुमच्या केसांना लागते आणि तुमचे केस लगेच तेलकट होतात. शिवाय तुमच्या केसांना त्यामुळे वासही यायला लागतो. जर तुम्हाला कंगवा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला कंगवा स्वच्छ करण्यासाठी काही टीप्स देणार आहोत.

गरम पाणी आणि डिटर्जंट

सगळ्यात सोपा आणि पटकन करता येण्यासारखा इलाज म्हणजे गरम पाणी.. एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात तुम्हाला थोडे डिटर्जंट घालायचे आहे. आता या पाण्यात तुम्हाला कंगवा बुडवून ठेवायचा आहे. गरम पाण्यामुळे कंगव्याला असलेली घाण नरम पडते. मग ती हाताने देखील निघते.  साधारण 15 ते 20 मिनिटे तुम्हाला त्यात कंगवा भिजू द्यायचा आहे. मग तुम्ही हाताने पटकन घाण काढू शकता.

नखांची काळजी घेण्यासाठी अशी घ्या काळजी

कंगवा स्वच्छ झाल्यावर तुम्ही कोरडा पुसून घ्या शक्य असल्यास उन्हात वाळवा. आता तुमचा कंगवा तुम्हाला एकदम स्वच्छ दिसेल.

व्हिनेगर आणि कोमट पाणी

व्हिनेगरदेखील तेलकटपणा कमी करतो.त्यामुळे कंगवा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता. एकास एक असे व्हिनेगर आणि कोमट पाण्याचे प्रमाण घेऊन त्यामध्ये कंगवा साधारण अर्धा तास बुडवून ठेवा.  साधारण 30 मिनिटांनी तुम्हाला तुमच्या कंगव्यामधून घाण बाहेर आलेली दिसेल. पाण्यातून कंगवा बाहेर काढून स्वच्छ करुन घ्या. तुम्हाला तुमचा कंगवा स्वच्छ दिसेल

तुम्ही हेअर ब्रश वापरत असाल तरी अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा कंगवा स्वच्छ करु शकता.

टेक्नॉलॉजीचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा किती बहुगुणी आहे हे तर तुम्हाला माहीत आहेच. तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नरम करण्याचे काम बेकिंग सोडा करते. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा कंगवा स्वच्छ करण्याचे काम बेकिंग सोडा करते.  एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या त्यात थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. जुना टुथब्रश घेऊन त्यावर बेकिंग सोडाचे मिश्रण लावून ब्रशवर घासा. तुम्हाला लगेचच ब्रशमध्ये घाण आलेली दिसेल. पण ही पद्धत वापरताना तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल.

शॅम्पूचे पाणी

जर तुम्हाला डिटर्जंटमध्ये कंगवा भिजवून ठेवायचा नसेल तर तुम्ही शॅम्पूमध्ये देखील तुमचे कंगवे डीप करुन ठेवू शकता. कोमट पाण्यात शॅम्पूचे काही ड्राॅप घ्या आणि त्यात कंगवा बुडवा. काहीवेळाने कंगव्यावरील घाण फुगून येईल. आणि मग ती काढणे सोपे जाईल. शिवाय तुमच्या कंगव्याला शॅम्पूचा सुगंध येईल.

टुथब्रशचा करा वापर

जर तुम्हाला पाण्यात भिजवून ठेवायला वेळ नसेल तर तुम्ही पटकन टुथब्रशचा वापर करु शकता.सॉफ्ट ब्रिसल असलेले टुथब्रश घेऊन तुम्ही तुमचा कंगवा स्वच्छ करु शकता. त्यामुळे वेळही जाणार नाही. पण हे तुम्ही रोज केले तर त्यात जास्त घाणही साचणार नाही.

आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी?, मग वाचा या टीप्स

 हेही लक्षात घ्या

*वरील सोप्या पद्धतींचा अवलंब करुन तुम्ही तुमचा कंगवा झटपट स्वच्छ करु शकता

(फोटो सौजन्य-Shutterstock)

Read More From Care