DIY सौंदर्य

अंड्याचा वापर करून घरच्या घरी हटवा ब्लॅकहेड्स

Dipali Naphade  |  Apr 17, 2020
अंड्याचा वापर करून घरच्या घरी हटवा ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्सची समस्या सगळ्यांनाच असते. त्वचेवरील पोर्समध्ये तेल आणि घाण जमा झाल्याने ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्सची समस्या असणे हे अतिशय कॉमन आहे. पण बऱ्याचदा ब्लॅकहेड्स जास्त झाल्याने त्वचा अधिक खराब दिसू लागते. महिला असो वा पुरूष प्रत्येक जण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी नेहमीच सलॉनचा आधार घेतात. पण कितीही वेळा पार्लरमध्ये गेलो तरीही हे जिद्दी ब्लॅकहेड्स परत येतात. सतत ब्लॅकहेड्स काढण्याने  त्वचेवरील चमकही कमी होते. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सतत पार्लरला जाणेही शक्य नसते. मग अशावेळी काय करायचे? अशा वेळी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही क्रिमचा नाही तर घरगुती गोष्टींचा वापर करण्याची गरज आहे. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरातील सर्वात उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे अंडे. अंड्याच्या सफेद भागाचा वापर करून आपण घरच्या घरी ब्लॅकहेड्स काढू शकतो. पण त्यापूर्वी ब्लॅकहेड्स नक्की कसे तयार होतात ते आपण पाहूया आणि त्यानंतर अंड्याचा वापर यासाठी कसा करायचा याची माहिती घेऊया. 

ब्लॅकहेड्स का होतात?

Shutterstock

ब्लॅकहेड्स झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर ते पटकन उठून दिसतात. चेहऱ्यावर अगदी लहान लहान ठिपके दिसत राहतात. अधिक प्रमाणात ब्लॅकहेड्स हे नाकावर असतात. तर काही लोकांच्या हातावर अथवा खांद्यावरही ब्लॅकहेड्स असतात. धूळ, प्रदूषण आणि माती या सगळ्याचा निचरा त्वचेवरून न झाल्याने घाण जमा होते आणि त्याचे ब्लॅकहेड्स तयार होतात. ज्यामुळे चेहरा दिसायला खराब दिसतो. यासाठी अंड्याचा सफेद भाग वापरून आपण हे ब्लॅकहेड्स घरच्या घरीही काढून टाकू शकतो. 

‘या’ घरगुती वस्तूंचा करा वापर आणि मिळवा ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका (How to remove Blackheads)

अंड्याचा सफेद भाग आणि मध

Shutterstock

तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्या जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही 1 अंड्याचा सफेद भाग घ्या आणि त्यात 2 चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि साधारण 20 मिनिट्स तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि स्वच्छ पुसून त्यावर मॉईस्चराईजर लावा. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स जाण्यास मदत मिळते. तसंच तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो. 

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)

अंड्याचा सफेद भाग आणि बेकिंग सोडा

Shutterstock

अंड्याचा सफेद भाग घ्या आणि त्यात बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही ब्लॅकहेड्स अगदी सोप्या पद्धतीने काढून टाकू शकता. 2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यामध्ये एका अंड्यांचा सफेद भाग मिक्स करा. हे मिश्रण  चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 मिनिट्स तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे तुम्ही महिन्यातून दोन वेळा केल्यास, तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्या जाणवणार नाही.  

व्हाइटहेड्स वर करा घरच्या घरी उपाय आणि मिळवा क्लीअर त्वचा (How To Get Rid Of Whiteheads)

अंड्यांचा सफेद भाग आणि साखर

साखर ही आपल्या त्वचेवर स्क्रबिंग म्हणून चांगले काम करते. अंड्यांचा सफेद भाग आणि साखर 2 चमचे मिसळून घ्या. हे नीट मिक्स करा आणि चेहऱ्यावर अर्धा तास तसंच ठेवा.  त्यानंतर चेहरा साफ करून घ्या. चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर पुन्हा पाण्याने चेहरा धुवा. चेहरा पुसल्यावर त्यावर मॉईस्चराईजर लावा. अंडे आणि साखरेच्या  या मिश्रणाने तुमची ब्लॅकहेड्सची समस्या निघून जाईल. साखर आणि अंड्यांच्या कॉम्बिनेशनमुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार दिसेल. तसंच ब्लॅकहेड्स लवकर येणारही नाहीत. 

 

Read More From DIY सौंदर्य