DIY फॅशन

लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Mar 12, 2021
लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स

लग्न म्हटलं की अनेक खरेदी असते. अगदी साड्यांपासून दागिन्यांपर्यंत काय घ्यायचं याचा विचार करावा लागतो. कारण लग्नात आपल्याला सर्वात सुंदर दिसायचं असतं. त्याशिवाय सध्या काय ट्रेंडमध्ये आहे याचाही विचार करावा लागतो. लग्नात बऱ्याच जणांचं लक्ष नवरीने नक्की काय काय घातलं आहे याकडे जास्त असतं. त्यामुळे त्याचा एक वेगळाच ताण असतो. त्याशिवाय आपल्याला अधिक सुंदर कसं दिसता येईल याचाही एक ताण असतो. लग्नासाठी दागिने निवडताना काहींचा गोंधळ उडतो. मग नक्की लग्नासाठी दागिने कसे निवडायचे याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. तुमचेही लग्न ठरले असेल अथवा तुमच्या जवळच्या कोणत्या व्यक्तीचे लग्न ठरले असेल आणि त्यांचाही गोंधळ उडत असेल अथवा दागिने घेतना नक्की काय करायचे कळत नसेल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्हालाही त्रास होणार नाही. 

दागिने घेण्यापूर्वी करा नेटवर रिसर्च

कोणतेही दागिने लग्नासाठी घेण्यापूर्वी सध्याची नक्की फॅशन कोणती आहे आणि नवरीच्या कपड्यांवर नक्की कोणते दागिने खुलून दिसतील याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण कोणत्या रंगाची साडी नेसणार आहोत किंवा लेहंगा घालणार आहोत त्यानुसार लेटेस्ट फॅशन (latest fashion of jewellery) अर्थात सध्याचा ट्रेंड (trend in jewellery) काय आहे हे जाणून घेण्याची गरज असते. तुम्ही नेटवर रिसर्च केल्यानंतर तुम्हाला आताची नक्की फॅशन काय आहे आणि आपण कोणते दागिने घ्यायला हवे आणि साड्यांवर कशाप्रकारे ते कॅरी करायला हवे ते कळेल. लग्नाच्या तारखेपूर्वी साधारण एक महिना आधी तुम्ही ही तयारी करायला घ्या. 

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

दागिने अथवा दागिन्यांसाठी खडे निवडताना तज्ज्ञांची मदत घ्या

बऱ्याचदा आपण आपल्या सोनारावर विश्वास ठेऊन तो सांगेल ते झटक्यात घेतो. पण तसं न करता दोन ते तीन वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरून तुम्ही तयार करून घेणार असल्याच्या दागिन्यांच्या खड्यांची योग्य किंमत काढा. तसंच तुम्ही खड्यांचे दागिने घालणार की सोन्याचे हे तुम्ही आधीच ठरवा. याबाबतीत केवळ स्वतःचे मापन न काढता तज्ज्ञांची मदत तुम्ही घ्या. जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि लग्नात तुम्हाला योग्य किमतीच दागिनेही घालता येतील. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

पहिले कपड्यांची खरेदी करा

दागिने नक्की कोणते घालायचे आहेत हे कपड्यांशिवाय ठरू शकत नाही. तुम्ही लग्नात नक्की कोणता वेष परिधान करणार आहात हे निश्चित करणे आवश्यक आहे. कोणत्या प्रकारची साडी अथवा लेहंगा तुम्ही लग्नात नवरी म्हणून परिधान करणार आहात यावर दागिने कोणते निवडायचे हे ठरते. उदाहरणार्थ जरीची साडी अथवा पैठणी असेल तर त्यावर सौन्याचे दागिने घालणेच योग्य आहे. तर खणाची साडी अथवा चंदेरी जरीची साडी असेल तर त्यावर ऑक्सिडाईज्ड दागिने अधिक खुलून दिसतील. त्यामुळे आपली साडी अथवा कपडे कोणते आहेत त्यानुसार दागिन्यांची निवड करावी. 

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

अधिक जड दागिने निवडू नका

बऱ्याचदा नव्या ट्रेंडप्रमाणे आपण अधिक जड दागिन्यांची निवड करतो. पण आपला चेहरा कसा आहे यानुसार दागिन्यांची निवड करायला हवी. तोदेखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आपला चेहरा लहान असेल तर जडसर दागिने शोभून दिसत नाहीत. त्यामुळे सहसा जड दागिने निवडणे टाळा. दागिने निवडल्यानंतर तुमचा गळाही दिसणे गरजेचे आहे. पूर्ण गळा भरून जाईल असे जड दागिने घालणे तुम्ही टाळलेलेच बरे. तसंच वेगवेगळ्या दागिन्यांच्या ऐवजी अगदी मर्यादित पण शोभून दिसतील असे दागिनेच निवडा. जेणेकरून तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल आणि तुम्हालाही जड जड वाटणार नाही. असेच दागिने निवडा जे तुमच्यासाठी आरामदायी ठरतील. तुम्हाला सतत टोचत राहणारे अथवा जड वाटणारे दागिने कदाचित शोभून दिसतीलही पण तुम्हीच त्यामध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्हाला त्याची मजा घेता येणार नाही. 

आम्ही सांगितलेल्या या महत्वाच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. दागिने निवडताना या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे आता पुढे जेव्हा लग्न ठरेल तेव्हा नक्कीच या टिप्सचा उपयोग करा आणि आपल्या मैत्रिणींनाही या टिप्सबद्दल सांगा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन