Make Up Products

मेकअपचे साहित्य चांगले राहण्यासाठी असे करा तुमचे मेकअप पाऊच अरेंज

Leenal Gawade  |  May 5, 2020
मेकअपचे साहित्य चांगले राहण्यासाठी असे करा तुमचे मेकअप पाऊच अरेंज

मेकअपचे साहित्य आणल्यानंतर सगळेच मेकअप पाऊच छान अरेंज करुन ठेवतात असे नाही. काही जण ते साहित्य आणल्यानंतर तसेच ठेऊन देतात. अनेकदा आपण नव्याने आणलेल्या वस्तू योग्यवेळी आपल्याला मिळत नाही.त्यांचा कालांतराने आपल्याला विसरही पडतो. मग ज्यावेळी आपण ते पुन्हा शोधायला जातो. तो पर्यंत अनेक जणांचे मेकअपचे साहित्य खराबही झालेले असते. त्यासाठीच मेकअपचे साहित्य व्यवस्थित मेकअप पाऊचमध्ये अरेंज करणे फारच महत्वाचे आहे. मेकअपचे पाऊच लावताना तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आपण जाणून घेऊया.

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

मेकअपचे साहित्य करा वेगळे

Instagram

आता आपल्याकडे मेकअपच्या साहित्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात.तुम्हाला रोज लागणारे साहित्य कोणते आहे ते साहित्य तुम्ही आधीच वेगळे करा. म्हणजे तुम्हाला त्या नुसार तुमचे पाऊच बनवता येईल. रोज वापरणाऱ्या साहित्यामध्ये कॉम्पॅक्ट, लिपस्टीक, काजळ, लायनर असे साहित्य असून शकते. या सामानाला फार जागा लागणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला काय काय रोज लागते ते साहित्य वेगळे करा.

वॅलिडिटी तपासा

प्रत्येक ब्युटी प्रोडक्टचा एक कालावधी असतो. बरेचदा आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट असल्यानंतर कोणते आधी वापरायचे ते कळत नाही. अशावेळी तुम्ही मेकअप पाऊच अरेंज करताना प्रोडक्टची वॅलिडिटी तपासा. जे प्रोडक्ट लवकर जुने होणार आहेत. ते आधी वापरायला घ्या. तुमच्या रोजच्या मेकअप किटमध्ये ते प्रोडक्ट असू द्या. म्हणजे त्या वस्तू तुम्ही रोज वापराल आणि त्या वस्तू वायाही जाणार नाही. 

मेकअप कधी करावा? तुम्हालाही पडतो का प्रश्न

क्वचित प्रसंगी वापरणारे मेकअप प्रोडक्ट

Instagram

आता आपल्याकडे असे काही मेकअप प्रोडक्ट असतात जे आपण रोज वापरत नाही. तर फार क्वचित वापरतो. अशा प्रोडक्टमध्ये  ब्लशर, हायलाईट, आयशॅडो यांचा समावेश असतो. तुम्ही ते प्रोडक्ट आणि ब्रश एका पाऊचमध्ये अगदी व्यवस्थित ठेवा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी लग्नाला किंवा इतर कोणत्या खास प्रसंगासाठी तयार व्हायचे असेल त्यावेळी तुम्हाला या गोष्टी अगदी नीट मिळू शकतील. 

प्रवासात केसांची काळजी घेण्यासाठी तयार करा तुमचे हेअर केअर पाऊच

मिनीएचर प्रोडक्टची करा निवडा

Instagram

जर तुम्ही रोज मेकअप कॅरी करत असाल आणि तुम्हाला तुमच्या बॅगमधील खूप जागा तुम्हाला मेकअपसाठी घालवायची नसेल तर तुम्ही मिनीएचर प्रोडक्टची निवड करा. म्हणजे तुम्हाला लहानात लहान पाऊचमध्ये हे साहित्य ठेवता येऊ शकते . त्यामुळे ऑफिस किंवा प्रवासासाठी तुम्ही मिनीएचर पाऊचची निवड करा.

वेगवेगळे असू द्या पाऊच

जर तुम्ही रोजच्या रोज बॅगमध्ये मेकअपचे साहित्य नेत असाल तर ते त्या बॅगमध्येच ठेवा. तुमच्या इतर कामांसाठी हे मेकअप पाऊच वापरु नका.तुम्ही जर तुमचे दोन पाऊच कायम वेगळे ठेवले तर तुम्हाला मेकअप इकडे तिकडे जाण्याची किंवा गहाळ होण्याची भीतीही राहणार नाही. त्यामुळे दोन वेगवेगळे पाऊच करुन तुम्ही कमी वापरत असलेल्या वस्तूंचे पाऊच वेगळे करा. रोजच्या पाऊचमध्ये दोन ते तीन शेडच्या लिपस्टीक असू द्या.म्हणजे तुम्हाला व्हरायटी मिळेल. तर तुमचे उरलेले साहित्य दुसऱ्या पाऊचमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मेकअप पाऊच अरेंज करा म्हणजे तुमचा मेकअप वाया जाणार नाही आणि व्यवस्थितपणे मेकअप वापरताही येईल. 

 

 

Read More From Make Up Products