Diet

रोगप्रतिकार शक्ती कमी करतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ सवयी

Trupti Paradkar  |  Jul 29, 2020
रोगप्रतिकार शक्ती कमी करतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ सवयी

निरोगी जीवनशैलीमध्ये योग्य आहार आणि चांगल्या सवयींचा समावेश असतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेणं जितकं आवश्यक आहे तितकंच चुकीचा आहार टाळणंही महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा काय खायचं याकडे लक्ष दिलं जातं मात्र काय खाऊ नये अथवा काय करू नये यावर विचार केला जात नाही. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकार शक्ती चांगली असणं गरजेचं  आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत अशा काही चुकीच्या सवयी आणि खाद्यपदार्थ शेअर करत आहोत ज्यांच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. या चुकीच्या सवयी जर तुमच्यासाठी नेहमीच्याच झाल्या असतील तर त्या त्वरीत बदला. आरोग्य राखण्यासाठी ते आता फार महत्त्वाचं आहे. 

उभं राहून पाणी पिणे

कामाच्या गडबडीत अथवा लक्षात न आल्यास आपण पाणी बऱ्याचदा उभं राहून पितो. एवढंच नाही तर खूप लहान लागल्यास आपण अगदी घटाघटाही पाणी पितो. पण ही सवय तुमच्या प्रतिकार शक्तीसाठी घातक आहे. कारण यामुळे तुमची फुफ्फुसे  आणि किडनीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने पाणी पिण्यामुळे तुम्हाला सतत तहान लागणे, घसा कोरडा होणे, वारंवार लघवीला होणे, अशक्तपणा जाणवू शकतो. यासाठीच नेहमी बसून आणि घोट घोट पाणी प्या.

मद्यपान करणे

मद्यपान करण्याचे व्यसन एकदा लागले की ते सहज सोडणे अशक्य असते. जी माणसं दररोज मद्यपान करतात त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असू होते. त्यामुळे अशा लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कितीही चांगला आहार घेतला पण त्यासोबत मद्यही घेतले तर त्याचा काहीच चांगला फायदा होणार नाही.

उत्तेजक पेयांचे अती सेवन करणे

काम करताना उत्साही आणि फ्रेश वाटावे यासाठी बऱ्याचदा अती प्रमाणात कॉफी आणि चहा घेतला जातो. चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स यामुळे तुम्हाला तेवढ्या पुरतं फ्रेश वाटतं. पण यामुळे तुमच्या पचनशक्तीवर नकळत परिणाम होत असतो. यामुळे हळूहळू तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणूनच उत्तेजक पदार्थांचे सेवन कमी करा. 

मीठाचे पदार्थ आहारात जास्त असणे

मीठामुळे अन्नपदार्थांची चव वाढत असली तरी त्याचे प्रमाण मर्यादित असावे. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे तुमची इन्युनिटी कमी होऊ शकते. कारण मीठाचे पदार्थ  अतीप्रमाणात खाण्यामुळे तुमची हाडे कमजोर होतात, शरीराला सूज येते. यासाठी जास्त तळलेले, नमकीन पदार्थ खाणे टाळा.

गोड पदार्थ खाण्याची सतत इच्छा होणे

शुगर क्रेव्हिंग होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण आपल्या इच्छेपेक्षा आपल्या शरीराला कोणते पदार्थ गरजेचे आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवं. आजकालच्या जीवनशैलीत जिथे घराबाहेर पडणंच अशक्य आहे. तुमच्या शरीराला हालचाली अभावी कोणताही व्यायाम मिळत नाही. अशावेळी अती प्रमाणात गोड पदार्थ खाण्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. यासाठीच गोडाधोडाचे प्रमाण आहारात कमी करा.

 

या काही सवयी आणि खाद्यपदार्थ टाळल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती नक्कीच वाढू शकते यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा. ज्यामुळे तुमचे कोरोनापासून तर संरक्षण होईलच शिवाय तुम्हाला उत्तम आरोग्यही मिळेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

हे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा

जेवणानंतर कधीच करु नका या 5 चुका, अन्यथा होईल त्रास

चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Read More From Diet