Dad

90+ वडिलांसाठी भावनिक कोट्स | Emotional Quotes On Father In Marathi

Vaidehi Raje  |  Jun 6, 2022
Emotional Quotes On Father In Marathi

आई आणि बाळाचं नातं ह्यावर अनेक कलाकृती आहेत. कादंबऱ्या, कथा, इतकंच  नव्हे तर चित्रपट, शिल्पे. चित्रं  , कविता ह्यातून कायम आई आणि बाळाचं नातं किती सुंदर आहे , खास आहे हे नेहेमीच अधोरेखित केलं जातं. आईचं  महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मान्य आहे.असं म्हणतात की जगात सगळी दारं बंद झाली तरी आईच्या हृदयाचं दार आपल्यासाठी कधीच बंद होत नाही. आईचं तिच्या मुलांशी असलेलं नातं जितकं खास असतं तितकंच बाबांचं सुद्धा त्यांच्या मुलांशी असलेलं नातं स्पेशल असतं. आईची तिच्या मुलांशी नाळ जोडलेली असते. तसेच जेव्हा बाळाच्या जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर बाबांशी देखील एक अदृश्य नाळ जोडली जाते. 

जितकं आईवरचं  प्रेम शब्दांतून , कृतीतून व्यक्त केलं जातं तितकंच बाबांविषयीचं  प्रेम आपण करायला हवं तितकं व्यक्त करत नाही. भलेही आपल्या मनात त्यांच्याविषयी कितीही आदर आणि प्रेम असो, आपण ते शब्दांतून ,स्पर्शातून व्यक्त करत नाही. त्यांच्या धाकापोटी आपण त्यांच्यात आणि आपल्यात उगाच एक अदृश्य भिंत बांधून ठेवलेली असते. ती भिंत तोडून टाका आणि बाबांवरचं प्रेम बिनधास्त व्यक्त करा. बाबांचा वाढदिवस, फादर्स डे या खास दिवशी बाबांवरचं प्रेम तर व्यक्त करायलाच पाहिजे पण खरं तर आपल्या माणसांवरचे प्रेम व्यक्त करायला कुठल्या खास दिवसाची गरज नसते. ते आपण कधीही व्यक्त करू शकतो. तुम्हालाही तुमच्या वडिलांविषयीचा प्रेम, आदर आणि काळजी व्यक्त करायची असेल पण त्यासाठी शब्द सापडत नसतील तर आम्ही तुमच्या मनातल्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. फादर्स डे साठी खास आपल्या बाबांना मेसेज पाठवायला वडिलांसाठी भावनिक कोट्स (happy fathers day quotes in marathi) हवे असतील तर येथे तुमच्या मनाला स्पर्श करतील असे काही संदेश (Emotional Marathi Quotes On Father And Daughter) दिलेले आहेत. यापैकी काही कोट्स (Emotional Quotes On Father In Marathi By Daughter) तुम्हाला नक्कीच आवडतील. 

बाबांसाठी भावनिक मेसेज । Emotional Quotes On Father In Marathi

वडिलांसाठी भावनिक कोट्स

खरं तर आपल्या लाडक्या बाबांविषयी आपण करायला हवा तेवढा विचार करत नाही किंवा तो वेळोवेळी व्यक्त करत नाही. कदाचित बाबा हे न बोलता शांतपणे आपल्यासाठी सगळा भार सोसून तितक्याच शांतपणे पहाडासारखे खंबीरपणे आपल्यामागे आधार देत असतात , न बोलता शांतपणे आपल्यासाठी त्याग करीत असतात, त्यामुळे  त्यांच्याशी आपण तितका संवाद साधत नाही. काही अपवाद सोडले तर आजची तरूण पिढी सुद्धा आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही “आई” आहे हे सांगून मोकळे होतात.  पण बाबांचं काय?  बाबा! मग ते आधीच्या पीढीचे असो ,मधल्या पीढीचे असोत की आजच्या पीढीचा बाबुडी किंवा ए बाबा असो , बाबांची काळजी , त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आपल्या अपत्याविषयीच्या भावना ह्या कुठल्याही पीढीत बदललेल्या नाहीत. म्हणूनच बाबांवरचे प्रेमही वेळोवेळी व्यक्त करायलाच हवे. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खास संदेश शोधत असाल तर पुढे वाचा.

बाबा, तुम्ही मला केवळ कसं जगायचं हेच शिकवलं नाही, तर तुमच्याकडे बघून आयुष्य कसं असावं याची शिकवण मिळते. बाबा तुम्ही माझा आदर्श आहात! तुमचा प्रेमळ हात डोक्यावर आहे म्हणून हे आयुष्य सुंदर आहे. 

ते लोक भाग्यवान असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. बाबा तुमची साथ असेल तर तुम्ही माझ्यासाठी बघितलेली स्वप्ने मी पूर्ण करू शकेन. 

बाबा, तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्या गेल्याचा मला अभिमान आहे. इतर कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार. 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे , कितीही मोठे झालो तरी पाठीशी ठामपणे बाबांनी उभं असणं होय. तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. 

स्वतःची झोप आणि भूक यांचाही विचार न करता सतत आमच्यासाठी झटणारे आणि तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारे आमचे बाबा! बाबा, तुम्ही आमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे आहात. ( Emotional Quotes On Father In Marathi)

बाबा, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्यामुळेच मी आज जगाला तोंड देण्यास सज्ज आहे. 

बाबा म्हणजे कुटुंबासाठी अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे सतत मुलांची काळजी करणारं मन!

स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन , मुलांसाठी झटणारं अंतःकरण! बाबा, तुम्हाला मनापासून साष्टांग नमस्कार!

आपल्या कुटुंबावर, मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटावर निधड्या छातीने  मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात. आम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवणारे आमचे बाबा म्हणजे आमच्यासाठी सुपरहिरो आहेत.

वडिलांविना जीवन कठीण आहे. वडिलांशिवाय जीवनाच्या एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो, आयुष्यात वडिलांचा आधार असणे महत्वाचे आहे, कारण वडिलांसोबत चालताना प्रत्येक मार्ग सोपा होतो. 

स्वतःचा खिसा रिकामा असला तरीही मला तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कधी नाही म्हणाला नाहीत. बाबा, तुमच्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती मी कधी पाहिला नाही. 

वाचा – मुलगी आणि बाबाच्या खास नात्यासाठी कोट्स

पतीसाठी भावनिक संदेश । Emotional Father Quotes For Husband In Marathi

वडिलांसाठी भावनिक कोट्स

पूर्वी घरात बायकाच भरपूर असायच्या त्यामुळे  घरातल्या पुरूषांना मुलांचं काही करायची वेळच यायची नाही.  किंवा काही अपवाद वगळता वडिलांनी मुलांचं करायचं ही पद्धतच नसावी. पुढे घरातल्या स्त्रिया सुद्धा नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडू लागल्या अन् वडिल सुद्धा मुलांचं करण्यात हातभार लावू लागले. अन् आता तर बाबांइतकीच आई देखील नोकरीनिमित्त बाहेर पडू लागल्यामुळे आई इतकंच मुलांचा बाबासुद्धा बाळाची शी काढण्यापासून, आईने बाहेर जाण्याआधी बॉटल स्टोर केलेलं ब्रेस्ट मिल्क पाजण्यापर्यंत सगळं आवडीने करतो. त्यासाठी खास पॅटर्निटी लिव्ह घेतो.  शिवाय मुलांशी मित्रासारखं क्रिकेट , ऑनलाईन गेम्स खेळतो.  त्यांच्यासोबत कार्टून्स बघतो. त्यांचे शाळेचे प्रोजेक्ट्स करायला मदत करतो. त्यांचा अभ्यास घेतो. ह्या सगळ्यातून तो मुलांच्या भावनिकरित्या जवळ जातो.  त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून तो त्याची काळजी व प्रेम व्यक्त करतो.  हे सगळं बघून मुलांच्या आईला समाधान मिळतं. आपल्या बिनधास्त वृत्तीच्या नवऱ्याचा एक जबाबदार बाबा होतानाच प्रवास बघणे हे एखाद्या स्त्रीसाठी खूप आनंददायक असते. अशा आपल्या बाळाच्या बाबाविषयी भावना व्यक्त करायच्या असतील तर पुढील कोट्स तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यास मदत करतील. (Emotional Quotes On Father In Marathi)

जेव्हा मी तुला भेटले तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम केले. आता तू आपल्या बाळाचा  लाडका बाबा आहेस. तुझे आपल्या बाळाशी असलेले सुंदर नाते बघून माझ्या मनातील तुझ्याविषयीचे प्रेम आणि आदर अधिक वाढला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आणि नवऱ्याला फादर्स डेच्या शुभेच्छा!

तू माझा आधार आहेस, माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू आपल्या मुलांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट पिता आहेस. फादर्स डेच्या शुभेच्छा. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. 

जीवन नेहमीच सोपे नसते, परंतु तुझ्याशिवाय जगात दुसरे असे कोणीही नाही की ज्याच्याबरोबर मी सुंदर क्षण साजरे करू शकेन आणि सगळ्या वादळांना तोंड देऊ शकेन. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझा पती म्हणून माझ्या पाठीशी असण्याबरोबरच  तू आपल्या मुलांचा बाबा म्हणून त्यांचा देखील भक्कम आधार आहेस.  तू आहेस म्हणून आम्ही आनंदाने जीवन जगू शकतो.  फादर्स डे च्या शुभेच्छा!

आपल्या पहिल्या भेटीत तू माझा हात धरला होतास, आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी माझा हात धरला होतास आणि आता या जीवनाच्या सुंदर प्रवासात देखील तू माझा हात कायम धरून ठेवला आहेस.  तुझ्याशिवाय आमच्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

एक चांगला पिता कसा असावा याचे कुठेही ट्रेनिंग दिले जात नाही. पण तरीही तू पहिल्या दिवसापासून एक प्रेमळ पती व पित्याची जबाबदारी अगदी लीलया पेलली आहेस. तू म्हणजे आपल्या कुटुंबाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेस. आज आणि वर्षातील प्रत्येक इतर दिवशी आम्ही तुझे कितीही आभार मानले तरीही ते कमीच असतील. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्वात प्रेमळ आणि खंबीर पिता, पती, संरक्षक आणि मित्र यांना फादर्स डेच्या शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित सुखी आयुष्य जगू शकतोय. तुमच्या रूपाने आपल्या बाळांना एक आधारवड मिळाला आहे. 

कितीही संकटे आली तरीही माझ्यावर व आपल्या मुलांवर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल , आमची काळजी घेतल्याबद्दल आणि आम्हाला संकटांची झळ न बसू दिल्याबद्दल तुमचे शतश: धन्यवाद! पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आम्ही लकी आहोत की आम्हाला तुम्ही पती व पिता म्हणून मिळलात! 

आपल्या बाळाचा तर तू बाबा आहेसच, पण मलाही प्रसंगी वडिलांचे प्रेम आणि आधार दिल्याबद्दल मी तुझे कसे आभार मानू! जगातील सर्वात बेस्ट बाबाला फादर्स डे च्या शुभेच्छा! 

जेव्हा मी तुम्हाला आपल्या मुलांशी संवाद साधताना बघते, त्यांची काळजी घेताना बघते तेव्हा मी स्वतःला खूप लकी समजते. असे प्रेमळ वडील आणि पती असल्याबद्दल धन्यवाद. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचे प्रेम आपल्या मुलांच्या डोळ्यांत प्रतिबिंबित होते, तुम्ही आसपास असता तेव्हा आपल्या मुलांचे डोळे आनंदाने चमकतात. तुमच्यासारखा एक आदरणीय, कष्टाळू आणि प्रेमळ पती दिल्याबद्दल मी देवाची आभारी आहे. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अधिक वाचा – जाणून घ्या माहिती आणि महत्त्व पितृदिनाचे 

वडिलांसाठी मुलीकडून भावनिक मेसेज । Emotional Marathi Quotes On Father And Daughter 

वडिलांसाठी भावनिक कोट्स

लहानपणापासून आपल्याला सगळे बाबांचा धाक दाखवत असतात. या धाकापोटी आपण त्यांच्यात आणि आपल्यात उगाच एक अदृश्य भिंत बांधून ठेवलेली असते. ही भिंत जेव्हा मुलीचं  लग्न ठरतं  आणि ती सासरी जाते तेव्हा तुटते. तेव्हा त्या अगदी बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घेतात. तेव्हा बाबा सुद्धा आडपडदा न ठेवता आपल्या काळजाचा तुकडा कायमचा सासरी जाणार म्हणून आपल्या भावना व्यक्त करतात. स्वतःच्या  डोळ्यातले पाणी थांबवत नाहीत, किंबहुना थांबवू शकत नाहीत.  मुलीचे आणि वडिलांचे नाते तर खास असतेच. पण मुलाचे आणि वडिलांचे नाते सुद्धा खूप सुंदर असते. बाबा म्हणजे पहिला मित्र, फिलॉसॉफर आणि आयुष्यभराचा गाईड असतात. मुलींसाठी त्यांचे वडील म्हणजे जगातला असा एकमेव पुरुष असतो जो त्यांना कधीही दुखावणार नाही. असं हे बाप-लेकीचं सुंदर नातं असतं. अशा बाबांसाठी काही लिहायचे म्हटले की गळा दाटून येतो, डोळ्यात पाणी येते आणि शब्द कमी पडतात. पण डोन्ट वरी. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास कोट्स आणले आहेत. ज्यांच्याद्वारे तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्त करू शकाल. 

प्रत्येक ग्रेट मुलीच्या मागे तितकेच ग्रेट वडील असतात ज्यांनी तिच्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास दाखवला असतो. 

प्रिय बाबा, मी आयुष्यात कुठेही गेले, कितीही मोठी झाले तरी तुम्हीच माझ्यासाठी माझी नंबर वन व्यक्ती राहाल. तुमची जागा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही. 

एखाद्या मुलीसाठी तिचे वडील सोबत असणे, वडिलांचा आधार असणे म्हणजे आयुष्यभर कायमचे चिलखत असण्यासारखे आहे.जे तिचे कायम रक्षण करतील. 

बाबा, तुम्ही मला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहात. तुमच्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नसेल. 

माझे बाबा हे माझे हिरो,  माझा आधार,  माझा हक्काचा श्रोता, माझे मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझा सपोर्ट आहेत. बाबा, तुम्ही ग्रेट आहात! 

या जगात कोणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही.

या नात्यात काहीतरी खास आहे, ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते. हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा! या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही. 

जेव्हा आयुष्यात संकटे  येतात, सगळीकडे अंधःकार पसरतो आणि आशेचा कुठलाही किरण समोर दिसत नाही, तेव्हा मला आठवते की मी कोणाची मुलगी आहे आणि माझे बाबा मला या सगळ्याशी लढण्याचे बाळ देतात. बाबा, तुम्ही असताना मला सुपरहीरोची गरज ती काय! 

माझ्या वडिलांनी मला कसे जगायचे ते कधीच सांगितले नाही.पण त्यांनी मला कसे जगायचे हे स्वतः जगून दाखवले. बाबा, तुम्ही माझा आदर्श आहात. 

काही लोकांचा सुपरहिरो असतात यावर विश्वास नाही.  पण कधी माझ्या बाबांना येऊन भेटा, तुम्हाला सुपरहिरो प्रत्यक्ष समोर दिसेल. 

माझ्या वडिलांनी मला सर्वात मोठी भेट दिली जी सहसा कुणाला मिळत नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि हा विश्वास सार्थ करण्याचे बळ मला दिले. थँक यू बाबा! 

“माझे बाबा माझे हिरो आहेत. जेव्हा मला त्यांची गरज असते तेव्हा ते नेहेमी पाठीशी उभे राहतात. ते माझे ऐकतात आणि मला खूप काही शिकवतात. त्यांच्या अनुभवाच्या बोलांची सर इतर कुठल्याही पुस्तकाला नाही. 

अधिक वाचा – फादर्स डे युनिक गिफ्ट आयडियाज

मिस यू बाबा मराठी स्टेटस । I Miss You Dad Emotional Quotes in Marathi

वडिलांसाठी भावनिक कोट्स

आपले बाबा आपल्यासाठीच कष्ट करतात. आपल्यावर खूप प्रेम करतात. आपल्याला काही कमी पडू नये म्हणून  स्वतः कष्ट करतात पण आपल्याला कुठलीही झळ बसू देत नाहीत आणि यातलं कधीही काहीच बोलून दाखवत नाहीत. पण म्हणून त्यांचं आपल्यावर प्रेम नसत असं नाही, हे ज्या दिवशी मुलांना कळतं  त्यादिवशी मुलांना मॅच्युरिटी आली असं समजावं. वडिलांच्या मूक प्रेमाची किंमत ते असताना बऱ्याच अभागी लोकांना कळत नाही आणि मग ते अचानक आयुष्यातून निघून गेले की पायाखालची जमीन सरकते. कारण वडील नावाचा आधारवडच आयुष्यातून निघून गेलेला असतो. ज्यांना वडील नसल्याचे दुःख पचवावे लागते, त्यांचे दुःख शब्दांत मांडता येत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी बाबांची आठवण येते आणि ती पोकळी कशानेही भरून निघत नाही. 

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे. तुम्ही गेलात आणि आमचा आधारच गेला. रोज आम्हाला पोरकं वाटतं!बाबा, तुमची खूप आठवण येते!

बाबा, तुम्ही मला आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला. पण तुमच्या जाण्याने आयुष्यातला आनंदच हरवला. I Miss You बाबा… 

बाबा, मी आयुष्य तर जगत आहे, पण तुम्ही गेल्यानंतर आयुष्यात आनंद मात्र राहिला नाही. लोकांना कधी कळणार की बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…

बाबा, तुम्ही माझ्याबरोबर नसलात तरीही मला खात्री आहे की, तुमचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी तुम्ही माझं संपूर्ण जग होतात. तुम्ही गेलात आणि माझं सगळं जग कोलमडलं.  I Miss You बाबा… 

तुमच्यामुळेच माझी या जगात एक ओळख आहे. मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळेच! पण तुम्हीच नाहीत म्हटल्यावर माझी ओळखच हरवली आहे असं वाटतंय! बाबा, तुमची खूप आठवण येते. 

जेव्हा मी तुमच्याबद्दल विचार करत नाही असा एक सेकंदही जात नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच तुमची आठवण येईल. I Miss You बाबा… 

तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल बाबा. तुमची खूप आठवण येते. 

 बाबा तुम्ही आमच्या बरोबर नसलात तरी मला आशा आहे की तुम्ही स्वर्गातून खाली बघत आहात आणि माझ्यावर लक्ष ठेवत आहात, मला नेहमीप्रमाणे सुरक्षित ठेवत आहात. मला तुमची खूप आठवण येते. 

बाबा, जेव्हा मी तुम्हाला गमावले तेव्हा माझे आयुष्यच बदलले. आयुष्यात मागचे विसरून पुढे जाणे खूप कठीण आहे आणि मी हे करू शकत नाही. I Miss You बाबा… 

बाबा तुम्ही आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखे वडील मिळाले.. मला तुमची खूप आठवण येते!

पूर्वी मुलं आणि वडील यांचं नातं तितकं जवळचं  नव्हतं. किंबहूना प्रेम करायला अन् काळजी घ्यायला आई आणि योग्य वळण लावायला अन् योग्य धाकासाठी , आधारासाठी व कुठलाही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी वडील अशी विभागणी होती.  त्या काळात मुलं आणि मुलीसुद्धा वडिलांना घाबरत असत. आताची मुलं बाबाशी कितीही मोकळेपणाने वागत असली  तरी काही चुकीचं करताना जर त्यांना “बाबाला नाव सांगेन हं तुझं” असं म्हटल्यावर धाक वाटतोच. शेवटी पीढी कोणतीही असो … काळानुसार  कितीही बदल झाले तरी वडिल आणि मुलं ह्यांचं नातं बदलू शकत नाही व बदलू शकणारही नाही.  पूर्वीच्या मुलांसाठीही आपले वडिल आदर्श असत व आताच्या मुलालाही आपला बाबाच रोल मॉडेल  व बेस्ट सुपरहीरो वाटतो ह्यात शंका नाही. बाबांविषयीच्या भावना शब्दांत व्यक्त करण्यासाठी वाचा हे वडिलांसाठी भावनिक कोट्स (Emotional Quotes On Father In Marathi). 

अधिक वाचा –
130+ आई बाबा स्टेटस मराठी 
खास वडिलांवर कविता आणि चारोळ्या

भावनिक आठवण कोट्स मराठी

Read More From Dad