आरोग्य

थायरॉईडवर घरगुती उपचार करण्यासाठी या तेलांचा करा वापर

Trupti Paradkar  |  Feb 3, 2021
थायरॉईडवर घरगुती उपचार करण्यासाठी या तेलांचा करा वापर

थायरॉईड अनियंत्रित होणं ही आजकाल अनेकांना जाणवणारी समस्या आहे. जीवनशैली विकारामध्ये थायरॉईड असतुंलनाचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे यासाठी फार घाबरण्याची नक्कीच गरज नाही. मात्र या समस्येमुळे चयापचयाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. गळ्यात एखाद्या फुलपाखराच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या थायरॉईड ग्रंथीमध्ये असंतुलन झाल्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो. यावर औषधोपचार, व्यायाम आणि काही घरगुती उपाय हाच उपाय आहे. काही घरगुती इसेंशिअल ऑईल्सचाही या समस्येला नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.

लवंग तेल

लवंग तेलाचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात. त्यापैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे थायरॉईड नियंत्रित ठेवणे. ज्यांना हायपोथायरॉडिझम आहे त्यांच्यासाठी लवंग तेल फायदेशीर आहे. कारण लवंग तेलामुळे तुमचा मानसिक ताण, चिंता, काळजी कमी होते. यासाठी झोपण्यापूर्वी थोडंसं लवंगाचं तेल तुमच्या हात, पायाचे तळवे, मान आणि पोटावर चोळा. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट होण्यास मदत होईल.

पुदिना तेल

पुदिना अॅंटि इनफ्लैमटरी आहे. ज्यामुळे पुदिना खाण्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो आणि शरीराला थंडावा जाणवतो. पुदिन्याचं  तेलही तुम्ही  थायरॉईडवर उपचार करण्यासाठी वापरू शकता. कारण या तेलामुळे तुमच्या शरीरावर येणारी सूज आणि दाह कमी होतो. शिवाय तुमच्या शरीराला थंडावा मिळाल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यात थोडं पुदिना तेल मिसळून अंघोळ करू शकता. 

चंदन तेल 

चंदन तेल त्याच्या सुंगध आणि थंडाव्यासाठी ओळखलं जातं. चंदनातील औषधी गुणधर्मामुळे शरीराच्या अनेक समस्या कमी होतात. म्हणूनच थायरॉईडवरही तुम्ही हे तेल अवश्य वापरू शकता. चंदनाच्या तेलाने अंगाला मालिश तेल्यामुळे तुमचा ताण. तणाव, चिंता दूर होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. चिंता, काळजी वाढल्यामुळे थायरॉईड ग्रंथीचं कार्य बिघडतं. मात्र चंदनाच्या तेलामुळे तुमचं मन शांत होतं आणि चिंतेपासून मुक्तता मिळते. 

लवेंडर ऑईल

लवेंडर तेलात असे काही खास औषधी गुणधर्म असतात की ते काही आरोग्य समस्यांवर एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. लवेंडर तेलाचा वापर केल्यास चिंता काळजी असतानाही तुम्हाला शांतात आणि निवांत झोप मिळू शकते. या तेलातील अॅंटि इन्फ्लैमटरी गुणधर्म तुमच्या शरीराची सूज जर आणि  जळजळ कमी करतात. जर तुम्ही हायपर थायरॉईडचे रूग्ण असाल तर या तेलाच्या मालिशचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

या इन्शेशिअल ऑईल्ससोबतच नारळाचे तेलही थायरॉईडवर परिणामकारक ठरते.थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन झाल्यास दररोज सकाळी उपाशीपोटी नारळाचे तेल पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय नारळाचे तेल नियमित पिण्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते.  दररोज एक चमचा नारळाचे तेल पिण्याची सवय लावल्यास हळूहळू याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. नारळाच्या तेलामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते. नारळाच्या तेलात बनवलेले पदार्थ तितकंच बॉडीफॅट शरीराला पुरवतात जितक्याची शरीराला गरज असते.  नारळाच्या तेलातील पदार्थांमुळे पोट भरलेले राहते आणि सतत भुक लागत नाही. यासाठी थायरॉईड असलेल्या लोकांनी आहारात नारळाच्या तेलाचा समावेश जरूर करावा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही (Thyroid Symptoms In Marathi)

हॉर्मोनल असतुंलनामुळे का वाटतं थकल्यासारखं

निरोगी राहण्यासाठी नियमित प्या ‘नारळपाणी’

Read More From आरोग्य