पालकत्व

परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश | Exam Wishes In Marathi | Best Of Luck In Marathi Sms

Dipali Naphade  |  Nov 12, 2021
Exam Wishes In Marathi

परीक्षा म्हटलं की आधीच डोक्याला ताण येतो. परीक्षा कोणतीही असो परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश (Exam Wishes In Marathi) आपण नेहमीच देत असतो. अशाच परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी (Best Wishes For Exam In Marathi) आपल्या प्रियजनांना तुम्ही परीक्षा शुभेच्छा संदेश पाठवू शकता. 10 वी ची परीक्षा (10th Exam Wishes In Marathi) असो अथवा 12 वी ची परीक्षा (12th Exam Wishes In Marathi) असो परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश देण्यासाठी काही खास संदेश (Best Of Luck In Marathi) आपण या लेखातून देऊ शकतो. 

12 वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा (12th Exam Wishes In Marathi)

12th Exam Wishes In Marathi

12 वी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणाचा मार्ग. सगळ्या परीक्षार्थींना परीक्षेच्या वेळी खूपच ताण आलेला असतो. परीक्षेमध्ये नक्की काय प्रश्न येतील आणि आपल्याला पुढे कसे गुण प्राप्त होतील या तणावाखाली विद्यार्थी असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी 12 वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश (Best Of Luck Message For Exam In Marathi)

1. परीक्षेसाठी तू संपूर्ण प्रयत्न कर आणि देव नक्कीच तुला यश मिळवून देईल. माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या बरोबर आहेतच. तुला 12 वी च्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

2. तुझ्या या महत्त्वाच्या परीक्षेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा! उत्तमोत्तम यश प्राप्त करावेस हीच सदिच्छा!

3. टेन्शन घेणे थांबव आणि तू जे काही केलं आहेस ते उत्तमच असणार. स्वतःवर विश्वास ठेव. तू या परीक्षेसाठी तयार आहेस याची मला खात्री आहे. काळजी कधीच करू नकोस. ऑल द बेस्ट!

4. 12 वी ची परीक्षा आहे त्यामुळे काहीही घाबरून जाण्याची गरज नाही. तू व्यवस्थित अभ्यास केला आहेस. त्यामुळे तुला उत्तम गुण मिळतील. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा!

5. परीक्षेअगोदर केलेल्या तुमच्या सर्व मेहनतीला योग्य असा गुणरूपी पुरस्कार मिळावा. तुला सर्वाधिक गुण मिळतील आणि तू तुझे यश कायम नक्की करशील असा माझा आशीर्वाद आहे. बेस्ट ऑफ लक!

6. आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच परीक्षा असते आणि यामध्ये तू उत्तमरित्या उत्तीर्ण होशीलच. तुला परीक्षेसाठी शुभेच्छा!

7. परीक्षा असली तरीही मनात काहीही गोंधळ होऊ देऊ नकोस. तू तुझे 100 टक्के देशीलच याची मला खात्री आहे. बेस्ट ऑफ लक (Best Of Luck In Marathi)

8. मला विश्वास आहे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक पाऊल व्यवस्थित उचलले आहे. कधीही कोणताच गोंधळ होऊ देऊ नका कारण कठोर परिश्रम नेहमीच फळाला येतात! बेस्ट ऑफ लक!

9. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कोणत्याही आव्हानाची भीती बाळगण्याची गरज नाही. मी तुला तुमच्या परीक्षेसाठी यश मिळावे याच शुभेच्छा देत आहे! बेस्ट ऑफ लक!

10. आपली कलागुण परीक्षेद्वारे नक्कीच मोजले जाऊ शकत नाही परंतु आपले समर्पण आपण प्राप्त केलेल्या गुणांद्वारे नेहमीच समोर येते. तुला नक्कीच यश मिळेल हा माझा आशीर्वाद आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा!

अधिक वाचा – Birthday Wishes And Quotes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Papa Birthday Wishes In Marathi

10 वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा (10th Exam Wishes In Marathi)

10th Exam Wishes In Marathi

भविष्यासाठी पुढे काय करायचं यासाठी सर्वात पहिला पडाव म्हणजे दहावीची परीक्षा. दहावीची परीक्षा ही आपल्याकडे प्रत्येक मुलासाठी खूपच महत्त्वाची मानली जाते. 10 वी च्या परीक्षेसाठी खास शुभेच्छा संदेश  (Best Of Luck In Marathi Sms)

1. तू चांगली तयारी केली आहेस, ही महत्त्वाची परीक्षा आहे. तुला सर्व काही माहीत आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नकोस. रात्रभर आराम कर. थोडी विश्रांती पण घे आणि परीक्षेसाठी सज्ज हो. परीक्षेसाठी शुभेच्छा!

2. तू तुझं नशीब स्वतःच्या हाताने घडविण्यासाठी जात आहेस हेच लक्षात ठेव. परीक्षेत यशस्वी होशील अशीच इच्छा!

3. मला आशा आहे की तुला परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे.  संशय घेण्यास कधीही जागा देऊ नकोस. मी आशा करते की तू हा सल्ला नक्की मानशील आणि परीक्षेसाठी तो आचरणातही आणशील. बेस्ट ऑफ लक!

4. उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे, सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

5. खूप शिका आणि मोठे व्हा. सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक परीक्षेसाठी शुभेच्छा!

6. 10 वी च्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा 

7. दहावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ऑल द बेस्ट!

8. Best of Luck in Advance! उद्यापासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एक दिवस अगोदर हार्दिक शुभेच्छा! कर धाडस शेवटी नशीब आपलं

9. घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. परीक्षा फत्ते करून ये. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

10. ही फक्त परीक्षा आहे आणि अशा अजून परीक्षा बाकी आहेत. त्यामुळे अजिबात ताण घेऊ नकोस. परीक्षेसाठी शुभेच्छा!

परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश (Best Wishes For Exam In Marathi)

परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश (Best Wishes For Exam In Marathi)

परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश देणे आता सोशल मीडियामुळे अधिक सोपे झाले आहे. तुम्हालाही आपल्या प्रियजनांना असे परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी संदेश (Best Wishes For Exam In Marathi) पाठवायचे असतील तर तुम्ही या लेखाचा नक्की वापर करा. 

1. परीक्षेसाठी तू संपूर्ण प्रयत्न कर आणि देव तुला नक्की यश देईल. माझ्या शुभेच्छा आहेतच. ऑल द बेस्ट!

2. माझ्याकडून तुला परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

3. तू तुझे सगळे प्रयत्न पणाला लाव आणि ही परीक्षा दे. तुला यश नक्कीच मिळेल. परीक्षेसाठी शुभेच्छा!

4. तुला परीक्षेत उत्तम गुणवत्ता मिळो हाच आशीर्वाद. परीक्षेसाठी शुभेच्छा!

5. ही परीक्षा तुला अत्यंत सोपी जावो आणि तुला उत्तम गुणप्राप्ती होवो या शुभेच्छा

6. या परीक्षेत तुला उत्तम यश प्राप्त व्हावे याच सदिच्छा. परीक्षेसाठी शुभेच्छा!

7. तुझ्या परीक्षेसाठी तुला शुभेच्छा!

8. नेहमी सकारात्मक राहा. यश मिळेलच. परीक्षेसाठी शुभेच्छा!

9. परीक्षा आहे म्हणून भांबावून जाऊ नकोस. उत्तम तयारी झाली आहे त्यामुळे यश मिळेलच. परीक्षेसाठी शुभेच्छा!

10. शांत राहून पेपर लिही. घाईगडबड करू नकोस. परीक्षेसाठी शुभेच्छा!

अधिक वाचा –लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश | Best Get Well Soon Message In Marathi

बेस्ट ऑफ लक (Best Of Luck In Marathi Sms)

Best Of Luck In Marathi Sms

आपल्या आजूबाजूला अनेक परीक्षार्थी असतात. त्यांना त्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश. 

1. परीक्षा म्हटलं की ताण येणारच. पण तो ताण न घेता शांत राहून पेपरवर लक्ष केंद्रित कर. यश मिळेलच. बेस्ट ऑफ लक!

2. परीक्षा म्हणजे काही राक्षस नाही. शांत राहा आणि व्यवस्थित आठवून पेपर लिहा. परीक्षेसाठी शुभेच्छा!

3. तुझ्या परीक्षेसाठी गुड लक!

4. वर्षभर केलेला अभ्यास तुझ्यासाठी नक्कीच चांगला ठरेल. परीक्षेसाठी शुभेच्छा!

5. परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

6. तू या परीक्षेसाठी खूपच मेहनत घेतली आहेस आणि आता ती मेहनत पेपरमध्ये उतरवण्याची वेळ आली आहे. उत्तम यश मिळव. परीक्षेसाठी शुभेच्छा!

7. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ तुला नक्कीच मिळेल. परीक्षेसाठी शुभेच्छा!

8. तू नक्कीच या परीक्षेत सफल होशील मला पूर्ण खात्री आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा!

9. परीक्षा कोणतीही असो तुला यश मिळेलच. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. 

10. तुझे सर्व प्रयत्न फळाला येवोत हीच अपेक्षा. परीक्षेच्या शुभेच्छा!

परीक्षेसाठी कोट्स (Exam Quotes In Marathi)

Exam Quotes In Marathi

परीक्षा म्हटलं की एक वेगळाच ताण असतो. परीक्षा म्हणजे नक्की काय आणि ती प्रत्येक माणसासाठी वेगळी ठरू शकते. असेच काही परीक्षेआधी वाचण्यासाठी स्वामी समर्थ कोट्स नक्की वाचा.

1. खूप कमी दिवस राहिले आहेत. खूप जोमाने अभ्यास करा. बाकी सगळ्या गोष्टींकडे करा दुर्लक्ष, मग ते बाहेर जाणे असो किंवा अजून काही कारण त्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे. सध्या फक्त ध्येयावर करा लक्ष केंद्रित. 

2. ताण असेल तर काही हरकत नाही, तो असलाच पाहिजे थोडा तरी. कारण परीक्षेला त्याशिवाय काही मजा रहात नाही. मला माहीत आहे तुला उत्तम गुण मिळतील. ऑल द बेस्ट

3. कोणत्याही वर्घाची परीक्षा पहिल्यात फटक्यात उत्तीर्ण व्हावी हीच सदिच्छा

4. जे या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्या सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. मन लाऊन अभ्यास करा आणि यात फक्त उत्तीर्ण नाही तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल अशी इच्छा. तुम्ही होणारच उत्तीर्ण अशी मला खात्री आहे 

5. परीक्षेच्या दिवसात झोप पूर्ण घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की रोज रात्रभर अभ्यास केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल तर तसं काही नसतं. तुमच्या मेंदूला पण थोड्या आरामाची गरज लागते. परीक्षेच्या वेळी तुम्ही आजारी पडणे योग्य नाही. अभ्यास असा करा की, परीक्षा उत्तमच जाईल. 

6. दुसरे कसे अभ्यास करत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका ,आपला एक वेगळा दिनक्रम तयार करा, जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल. लक्ष केंद्रित करा आणि द्या परीक्षा. परीक्षेच्या शुभेच्छा. 

7. फक्त तुम्ही अभ्यासाला सुरवात करा आता बाकी कसलाच विचार करू नका सगळी मजा झाली आता काही दिवस करा अभ्यासावर लक्ष केंद्रित. परीक्षेसाठी शुभेच्छा! 

8. नकारात्मक विचार डोक्यात आणू नका. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

9. परीक्षा कठीण असते हे खरं आहे. पण सोप्या गोष्टी केल्या तर मग आयुष्यात राहिलंच काय. परीक्षा द्यायला व्हा तयार. 

10. आयुष्य चांगलं व्हायला हवं असेल तर परीक्षा आहे गरजेची. व्हा सज्ज आणि द्या परीक्षा. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक संदेश (Best Of Luck Message For Exam In Marathi)

Best Of Luck Message For Exam In Marathi

परीक्षेसाठी तुम्हाला आपल्या मुलांना द्यायचे असतील संदेश तर नक्की वाचा हा लेख. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक संदेश (Best Of Luck Message For Exam In Marathi) खास तुमच्यासाठी. 

1. परीक्षा कुठलीही असो त्याला सामोर जाण महlत्त्वाचं आहे.,बाकी कोणताचा विचार आता करू नका. काही दिवस आपला संपूर्ण वेळ हा अभ्यासासाठी द्या. कारण तुम्हाला तुमच्या आई -वडिलांचे नाव गर्वाने उंच करायचं आहे हे लक्षात ठेवा. बेस्ट ऑफ लक!

2.  परीक्षेत उत्तीर्ण तर तुम्ही होणारच. पण तुम्हाला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तुमच्या आई -वडिलांच्या चेहर्यावर ते हसू फुलवायचे आहे. ऑल द बेस्ट

3. परीक्षा म्हणजे आयुष्याचा छोटासा भाग असतो. पण तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आई-वडील एवढं खर्च करतात आपल्यावर शिकण्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी एवढी परीक्षा उत्तीर्ण करायलाच हवी. या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

4. मेहनत करा यश मिळेलच. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

5. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

6. जास्त ताण घेऊ नका तुमच्या मेंदूला जे वाचलेलं आहे ते लक्षात ठेवणं कठीण होऊन जातं, म्हणून तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या आणि परीक्षेसाठी शुभेच्छा!

7. तुझ्या पंखांवर विश्वास ठेव आणि परीक्षेसाठी तयार हो. परीक्षेसाठी शुभेच्छा!

8. हिंमत ठेव आणि ही परीक्षा नक्की पार पडेल. परीक्षेसाठी शुभेच्छा!

9. तुम्ही या परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल. परीक्षेसाठी शुभेच्छा!

10. नशीबही तुमच्या मेहनतीसमोर हरेल, तुम्ही या परीक्षेसाठी नक्कीच तयारी केली आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा!

परीक्षेसाठी मजेशीर कोट्स (Exam Funny Quotes In Marathi)

परीक्षेसाठी मजेशीर कोट्स (Exam Funny Quotes In Marathi)

परीक्षेसाठी येणारा ताण कमी करायचा असेल तर काही मजेशीर कोट्स लिहून द्या परीक्षेच्या शुभेच्छा. असेच काही मजेशीर कोट्स (Exam Funny Quotes In Marathi) . 

1. परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न मुंग्यांना कसे माराल ? उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या. हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा. मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका. तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील

2. त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी कर ज्यांना वर्षभर अभ्यासाला वेळ नाही मिळाला त्या नाजूक हाताना शक्ती दे.

3. ज्यांनी फ्री मेसेज स्किमला कधीही वाया नाही जाऊ दिलं. त्या डोळ्यांना परीक्षेमध्ये प्रकाश दे ,जे दिवस रात्र नेटवर बसून वीक झाले आहेत, त्यांना परीक्षेत यश मिळू दे. 

4. त्या गरीब मुला-मुलीना मदत कर, जे रात्र भर मधुर गप्पा मारत बसले आणि अभ्यास नाही करू शकले. त्यांना तू देवा मदत कर.

5. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण. परीक्षा..दिवे पण लागतात..फटाके पण फुटतात..बँड पण वाजतो आणि घरचे आरती पण ओवाळतात.

परीक्षेसाठी खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही वापरू शकता या लेखातील खास संदेश. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. 

Read More From पालकत्व