डोळे सुंदर असतील तर तुमचा संपूर्ण चेहरा उठून दिसतो. डोळे सुजलेले किंवा डोळ्यांखाली काळं झालं असेल तर असा चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. वय कितीही असतो काहींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. त्यामुळे त्यांचा चेहरा प्रसन्न दिसतो. त्यांचे डोळे हेच आकर्षण बिंदू होतात. तुमचेही डोळे कोणत्याही वयात आकर्षक दिसावे असे वाटत असतील तर तुम्ही काही फेस योगा (Face Yoga) फॉलो करायला हवा. डोळ्यांचा मसाज करण्याच्या काही ट्रिक तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. चला जाणून घेऊया डोळे आकर्षक दिसण्यासाठी असा करा डोळ्यांचा मसाज
दोन बोटांचा मसाज
अंगठ्याच्या बाजूची दोन बोट घेऊन ती डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या बाजूने ओढायची आहेत. असे करताना डोळ्यांना नखं लागणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. आपण विक्टरीचे चिन्ह दाखवण्यासाठी ज्या दोन बोटांचा उपयोग करतो. तिच बोट तुम्हाला डोळ्यांभोवती ओढायची आहेत. असे करताना तुम्ही डोळे बंद केले तरी चालू शकतील. बोटं ओढून तुम्हाला कानापर्यंत घेऊन जायची आहेत. तुम्हाला जर यामध्ये थोडे सोपेपणा आणायचा असेल तर तुम्ही कोणतेही लाईट फेस मसाज ऑईल घेऊन बोटांना लावायचे आहे. त्यामुळे डोळ्यांना इजा देखील होणार नाही.डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी हा मसाज फारच फायदेशीर आहे
डोळ्यांखाली करा डॅब
डोळ्यांखाली डॅब करणे म्हणजे अगदी हळुवारपणे तुम्हाला दोन बोटांनी डॅब करायचे आहे. असे केल्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळण्यास मदत मिळेल. असे करताना तुम्ही एखादी संख्या ठरवा. म्हणजे तुम्ही 10 आकडे म्हणे पर्यंत असे करणार असे. डोळ्यांखाली डॅब केल्यामुळे तुम्हाला लगेचच डोळ्यांचा थकवा गेल्यासारखा दिसेल. मेकअप करण्यापूर्वी किंवा कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्याला लावताना तुम्हाला असे करायचे आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांखालचा भाग हा अधिक चांगला दिसू लागेल.
आयब्रोज धरा चिमटीत
डोळ्यांना अधिक चांगला दाखवणारा भाग म्हणजे तुमचे आयब्रोज. हे आयब्रोज म्हणजेच तुमच्या आयलीडच्या बरील त्वचा घट्ट असेल तर डोळे छान मोठे दिसतात. अशावेळी तुम्हाला आयब्रोज चिमटीत धरायचे आहेत. आयब्रोजला जास्त चिमटा बसणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे असे करताना तुम्ही थोडी काळजी घ्या. आतल्या बाजूने सुरुवात करा. आतल्या बाजूने चिमटा काढत बाहेरच्या बाजूला यायचे आहे. तुम्ही डोळ्यांना असे करताना थोडेसे बेबी ऑईल किंवा फेस सीरम लावले तरी देखील चालू शकेल.
डोळ्यांना वरच्या दिशेने ओढा
आता याचा शब्दश: अर्थ घेऊ नका. कारण तुम्हाला कोणताही डोळ्यांचा मसाज हा अगदी नाजूक हातांनीच करायचा असतो. हा मसाज करण्यासाठी तुम्हाला चारही बोटांचा उपयोग करुन कपाळ आणि डोळ्यांच्या भाग हळूच वर ओढायला घ्यायचा आहे. अगदी अलगदपणे तुम्हाला हे करायचे आहे. असे करताना तुम्हाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
महिन्याभरात तुम्ही असे कराल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांकडील भागात नक्कीच बदल झालेला दिसेल.