बॉलीवूड

संगीताचा ‘बाजार’ न मांडणाऱ्या संगीत दिग्दर्शक खय्याम यांचं निधन

Dipali Naphade  |  Aug 19, 2019
संगीताचा ‘बाजार’ न मांडणाऱ्या संगीत दिग्दर्शक खय्याम यांचं निधन

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक खय्याम यांचं सोमवारी रात्री मुंबईच्या सुजॉय हॉस्पिटलमध्ये निधन झालं. खय्याम 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खय्याम यांची तब्बेत बिघडली असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. 16 ऑगस्टला खय्याम यांची तब्बेत अतिशय खराब झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचं वय तर होतंच पण त्याचबरोबर बऱ्याच गंभीर लंग इन्फेक्शनने खय्याम ग्रासले होते. मिळालेल्या माहितीनुसार, खय्याम यांचं रात्री 9.30 च्या सुमारास कार्डियाक अरेस्टनं निधन झालं. लंग इन्फेक्शन आणि वयामुळे त्यांचं शरीर खूपच थकलं होतं. साधारण 21 दिवस ते हॉस्पिटलमध्ये भरती होते. मोहम्मद जहूर खय्याम हे दीर्घकाळापासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू असतानाच त्यांचं निधन झालं. 

खय्याम यांनी दिलं बॉलीवूडला न विसरता येणारं संगीत

Instagram

खय्याम यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकाच्या वाटचालीला 1947 मध्ये सुरुवात केली. पण साधारण दहा वर्षानंतर प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. तर प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात त्यांनी संगीत दिलेला ‘उमराव जान’ हा चित्रपट कायमच स्मरणात राहणार आहे. आजही त्यांचं संगीत तितकंच तरूण वाटतं. कभी कभी आणि उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. खय्याम यांनी दोन वर्षांपूर्वीच आपल्या 90 व्या वाढदिवसाला साधारण 12 कोटींची रक्कम ‘खय्याम प्रदीप जगजीत ट्रस्ट’ यांना दान केली होती. 

OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor

प्रसिद्ध व्यक्तींनी वाहिली श्रद्धांजली

खय्याम हे मोठं व्यक्तिमत्व होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी खय्याम यांना सोशल मीडियावर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, ‘सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम साहेब यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या अविस्मरणीय संगीताने गाणी अमर केली आहेत. त्यांच्या अप्रतिम योगदानासाठी चित्रपट आणि कला जगत हे नेहमीच त्यांचं ऋणी राहील. दु:खाच्या या वेळी त्यांच्या चाहत्यांच्या भावना मी समजू शकतो’

‘साजणा’ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन

एका युगाचा अंत, लता मंगशेकर यांचं ट्विट

लता मंगेशकर यांनीदेखील महान संगीतकार खय्याम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी ट्विट केलं आहे की, ‘महान संगीतकार आणि अत्यंत चांगल्या मनाचा माणूस खय्याम साहेब आज आपल्यात नाहीत. हे ऐकून मला अत्यंत दु:ख झालं आहे जे मी व्यक्तही करू शकत नाही. खय्याम साहेबांबरोबर एका युगाचा अंत झाला आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत आहे.’

खय्याम यांची काही प्रसिद्ध गाणी

दिल चीज क्या है आप मेरी – उमराव जान

कभी कभी मेरे दिल में – कभी कभी

नूरी – नूरी

तेरे चेहरे से नजर नहीं हटती – कभी कभी

बहारो मेरा जीवन भी सवारो – आखरी खत

वो सुबह कभी तो होगी – फिर सुबह होगी

करोगे याद तो हर बात – बाजार

ए दिल ए नादान – रझिया सुलतान

और कुछ देर ठेहेर – आखरी खत

प्यार का दर्द है – दर्द

भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर

Read More From बॉलीवूड