फॅशन

तुमच्या कोणत्याही आऊटफिटवर घालता येतील हे #Clearheels, एकदा नक्की ट्राय करा

Leenal Gawade  |  Jan 28, 2020
तुमच्या कोणत्याही आऊटफिटवर घालता येतील हे #Clearheels, एकदा नक्की ट्राय करा

जर तुम्हाला हिल्स घालायला आवडत असतील तर सध्या सुरु असलेली एक फॅशन miss करुन अजिबात चालणार नाही. कारण सध्या या नव्या हिल्सचा ट्रेंड चांगलाच सुरु आहे. अनेक सेलिब्रिटीजना तुम्ही अशा प्रकारचे हिल्स घालताना हमखास पाहिले असेल. अगदी कोणत्याही कपड्यांवर तुम्हाला हे हिल्सचे प्रकार घालता येतात. जाणून घेऊया या नव्या फॅशनविषयी आणि तुम्ही कुठे खरेदी करु शकता हे#Clearheels हिल्स

2020 मध्ये नक्की ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज.. आाणि दिसा एकदम क्लासी

कोणत्याही वेअरवर आहेत एकदम फिट

Instagram

प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये कितीतरी चपलांचे प्रकार असतात. पण प्रत्येक चपलांचे प्रकार सगळ्याच प्रकारच्या कपड्यांवर चांगले दिसतात. म्हणजे मुळात पारदर्शक असल्यामुळे ते तुमच्या कोणत्याही रंगांच्या कपड्यावर चांगले दिसतात. शिवाय तुमचा लुकही त्यामुळे उठून दिसतो.

#Clearheelsहिल्समध्ये मिळतात हे प्रकार

Instagram

आता तुम्हाला हिल्सचे वेगवेगळे प्रकार माहीत असतील तर तुम्हाला हे सगळे पर्याय या हिल्सचे प्रकार मिळतात. म्हणजे तुम्हाला बॉक्स हिल्स, पेन्सिल हिल्स, वेजेसमध्ये असले प्रकार मिळू शकतील. आता तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार यांची निवड करायची आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालणार आहात त्यावर तुमची निवड अवलंबून असायला हवी.

अशी करा फॅशन

आता तुम्ही तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट असलेले #Clearheels  निवडले असतील तर तुम्ही नेमके कशावर ते घालू शकता ते आता जाणून घेऊया 

  1. जर तुम्ही कुडते किंवा ड्रेस घालणारे असाल तर तुमच्या स्टाईलला उठाव आणणारा असा हा प्रकार आहे.तुम्हाला अगदी फ्लॅट घालयाचे नसतील आणि तुमचे हिल्स दाखवायचे नसतील त्यावेळी तुम्ही हा प्रकार चीट म्हणून घालू शकता. 
  2. जर तुम्हाला पलाझो पँटस घालायच्या असतील आणि तुमची उंची जास्त नसेल तर तुम्ही हे चप्पल वापरायला हवेत. कारण या हिल्समुळे एक वेगळा ग्रेस मिळतो.
  3. वेस्टर्नवेअरचा विचार करता आपल्या सगळ्याच रंगाच्या कपड्यांवर हे सगळ्याच प्रकारच्या चपला चांगल्या दिसतात असे नाही अशावेळी तुम्हाला नॅरो बॉटम किंवा बेलवॉटम जीन्सवर या चपला घालता येतात. 
  4. तुम्ही जर शॉर्ट ड्रेस घालत असाल  तर यामध्ये मिळणारा एलिगेटर म्हणजे तुमच्या पायाच्या घोटापर्यंत येणारे हिल्स वापरु शकता. त्या दिसायला तितक्याच क्लासी दिसतात.
  5. ऑफिस, कॅज्युअल, पार्टी अशा सगळ्याच ठिकाणी हे शूज तुम्हाला उपयोगाला येतील. त्यामुळे तुम्ही एकाच हिल्समधून वेगवेगळ्या फॅशन सुद्धा करु शकता.

स्ट्रेट फिट पँटची फॅशन करताना नेमकी काय घ्याल काळजी (Straight Fit Pants In Marathi)

बजेटमध्ये मिळतील हे सँडल्सचे प्रकार

आता जर तुम्ही हे सँडल्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काही ठिकाणांहून याची खरेदी करु शकता.

Women White Heels Sandal

ज्यांना जास्त उंच हिल्स आवडत नाही त्यांच्यासाठी हा प्रकार चांगला आहे. तुम्हाला कमीत कमी  हिल्समध्ये हा प्रकार मिळतो. शिवाय हा तुमच्या बजेटमध्ये बसणारा सुद्धा आहे. 

Women Transparent Solid Sandals

आता जर तुम्ही व्हेज हिल्सच्या शोधात असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या चप्पल निवडण्यास काहीच हरकत नाही.

Women Transparent Solid Pumps

जर तुम्हाला पेन्सिल हिल्समध्ये चप्पल घालायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हा पर्यायसुद्धा आहे. जो तुम्हाला सहज घालता येईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

You Mgiht Like This:

बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स – Kolhapuri Chappal Designs

Read More From फॅशन