मातृदिन प्रमाणे पितृदिनही जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फादर्स डेला मुलं आपल्या प्रेमळ वडिलांना खास भेटवस्तू देतात आणि आनंद आणि उत्साहात त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. नुकतंच पितृत्व लाभलेल्या पित्यासाठी फादर्स डे खूप महत्त्वाचा असू शकतो. असे नवपिता या दिवशी स्वतःच्या वडिलांकडून पितृत्वाचे धडे घेऊ शकतात. कारण आई प्रमाणे बाबा होणं हीदेखील एखाद्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना असू शकते. यंदा सर्वच सण समारंभ आणि सेलिब्रेट केल्या जाणाऱ्या अशा खास दिवसांवर कोरोना महामारीचे सावट परसले आहे. मात्र तरिही या खास दिवशी तुमच्या लाडक्या बाबांसोबत ऑनलाईन माध्यमातून तुम्ही फादर्स डे साजरा करू शकता. यासाठी सोशल मीडियावर बाबांना द्या या खास फादर्स डेच्या शुभेच्छा (Fathers Day Wishes In Marathi) आणि फादर्स डे निमित्त भेटवस्तू. तसंच हा दिवस खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करण्यासाठी जाणून घ्या पितृदिनाची माहिती (father day information in marathi) इतिहास आणि बाबांचे आपल्या जीवनात असलेलं महत्त्व.
Table of Contents
पितृदिनाचा इतिहास (History Of Father’s Day)
History Of Father’s Day
पितृदिनाचा संबध हा थेट मातृदिनाशी आहे. कारण सर्वात प्रथम जगभरात मातृदिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. मातृदिनाचा इतिहास 1860 या दशकाशी संबधित आहे. अमेरिकेत 1914 सालापासून मातृदिनासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येऊ लागली. मात्र यामुळे पितृदिन साजरी करण्याची मागणी होऊ लागली. कारण जर एका पालकासाठी एखादा खास दिवस साजरा केला जात असेल तर दुसऱ्या पालकाचाही या आनंदावर तितकाच हक्क आहे. ज्यामुळे पुढे 5 जुलै 1908 मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये फादर्स डेसाठी 362 पित्यांचा सन्मान करण्यात आला. हे सर्व पिता आधीच्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात मरण पावले होते. अशा पद्धतीने पितृत्वाचा सन्मान करणारा फादर्स डेसाठी पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुढे अमेरिकेत सोनारा स्मार्ट डोड नावाच्या एका स्त्रीने पितृदिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली. कारण सोनारा एक अशी मुलगी होती जिच्या वडिलांनी तिच्यासह सहा भावंडांना एकट्याने सांभाळलं होतं. त्यामुळे तिला तिच्या वडिलांना योग्य सन्मान मिळावा असं वाटत होतं. सोनाराद्वारे दाखल करण्यात आलेल्या पिटिशननंतर एक वर्षात वॉशिग्टंनमध्ये 19 जून 1910 मध्ये पहिल्यांदा पितृदिन साजरा केला गेला. त्यानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पितृदिन साजरा करण्याची पद्धत सुरू जाली. पुढे एका मोठ्या आंदोलनानंतर 1972 मध्ये पितृदिनासाठी राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली.
पितृदिन साजरा करण्यास सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ साठ वर्षांनंतर अमेरिकेत पितृदिनासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली. मात्र त्यासाठी अनेक आंदोलने यासाठी करावी लागली. या काळात मातृदिन आणि पितृदिन वेगवगळा साजरा करण्याऐवजी एकच पालक दिन साजरा करावा असा विचारही पुढे आला. तर काही पुरूषांना पितृदिन साजरा करण्यात काहीच रस नव्हता. कारण त्या काळात अनेक घरात फक्त वडीलच एकटे कमावणारे होते. ज्यामुळे भेटवस्तू, चॉकलेट अथवा फुलांवर आपल्याच कमाईतून खर्च केला जावा ते त्यांना मान्य नव्हते.
दुसऱ्या विश्व युद्धानंतर पितृदिन साजरा करण्याबाबत सकारात्मक दृष्टीने पाहण्यात येऊ लागलं. या संघर्षात विक्रेत्यांनी पुढाकार घेत भेटवस्तू दिल्या जाणाऱ्या या सुट्टीच्या मागणीला उचलून धरलं. कारण त्यानिमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार होती. पुढे पितृदिन नोकरी करणाऱ्या सर्व पित्यांसाठी देशभरात पितृत्वाचा सन्मान करणारा एक दिवस झाला.
वाचा – वडिलांसाठी भावनिक कोट्स
पितृदिनाचे महत्त्व (Significance Of Father’s day)
जगभरात निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या दिवशी पितृदिन साजरा केला जातो. मात्र अनेक देशांमध्ये आजही जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पितृदिन साजरा केला जातो. नुसार यंदा 20 जून 2021 ला भारतातही पितृदिन साजरा केला जाणार आहे. पितृदिन हा एक महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण दिवस आहे. कारण या दिवशी मुलांना वडिलांची खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करता येते. वडील मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. जरी त्यांनी आईप्रमाणे बाळाला पोटात सांभाळले नाही अथवा त्याला जन्म देण्यासाठी प्रसूतीवेदना सहन केल्या नाही तरी ते त्यांच्या संगोपनाची खूप मोठी जबाबदारी आयुष्यभर स्वीकारतात. मुलांच्या जीवनात त्यांना वेळोवेळी मानसिक आधार आणि आर्थिक सहकार्य करण्यात वडिलांचा मोठा वाटा असतो. मातृदिनाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर पितृदिन साजरा केला जातो. मुलं या दिवशी वडिलांच्या त्यांच्या आवडीची भेटवस्तू, ग्रिटिंग कार्ड, फुले, चॉकलेट देतात आणि त्यांचे मनापासून आर्शीवाद घेतात. भारतात तर आईवडिलांशी मुलांचा घनिष्ठ संबध असतो. कारण भारतात मुलं मोठी झाल्यावरही आईवडिलांसोबत राहण्याची परंपरा आहे. ज्यामुळे अगदी लहानपणापासून ते स्वतः पालक होईपर्यंत मुलांवर वडिलांचे छत्र कायम असते. ज्यामुळे पितृदिन हा भारतात एक सण अथवा समारंभापेक्षा नक्कीच कमी नाही.
कसा करावा साजरा पितृदिन (How To Celebrate Father’s Day)
How To Celebrate Father’s Da
पितृदिन कसा साजरा करावा याच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.
- काही मुलं वडिलांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू, कार्ड अथवा फुलं देतात.
- तुम्ही तुमच्या बाबांसाठी स्वतः ग्रिटिंग कार्ड बनवू शकता अथवा गिफ्टचे पॅकिंग स्वतःच्या हाताने करून त्यावर बाबांसाठी प्रेमळ शुभेच्छा लिहू शकता.
- वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवणं ही देखील एक छान कल्पना असू शकते. कारण त्यातून तुम्ही तुमचे वडिलांबद्दल असेलेले प्रेम व्यक्त करू शकता.
- तुम्ही प्रतिभावंत असाल तर लाडक्या फादर्स डेसाठी कविता तयार करून ती त्यांच्यासमोर सादर करा
- बाबांनी आयु्ष्यभर तुमच्या आवडीनिवडींचा विचार केला जर तुमच्या बाबांना फिरण्याची आवड असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या फेव्हरेट डेस्टिनेशनवर एक पिकनिक अरेंज करा.
- वडिलांना थोडासा विरंगुळा म्हणून तुम्ही त्यांच्या आवडत्या रेस्टॉंरंटमध्ये लंच अथवा डिनरसाठी नेऊ शकता.
- वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरात अथवा शक्य असल्यास घराबाहेर एखादी पार्टी आयोजित करा आणि त्यामध्ये त्यांच्या आवडत्या लोकांना आमंत्रित करा.
- जर लॉकडाऊन अथवा कोरोनामुळे घराबाहेर सेलिब्रेट करणं शक्य नसेल तर वडिलांची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी या खास दिवशी त्यांना दिवसभर मदत करा.
- वडिलांपासून दूर राहत असाल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल माध्यमावर बाबांसोबत हा खास दिवस साजरा करा.
पितृदिनाबाबत काही महत्त्वाची तथ्य (Facts About Father’s Day)
पितृदिनाची माहिती, महत्त्व आणि इतिहास जाणून घेताना प्रत्येकाला या खास गोष्टी माहीत असालायच हव्या.
- पितृदिन साजरा करण्याची संकल्पना अमेरिकेत सोनोरा स्मार्ट डोड यांनी मांडली.
- सोनोराचे वडील विल्यम जॅकसन स्मार्ट यांनी पत्नीच्या निधनानंतर एकट्याने तिच्यासह सर्व भावंडाचे संगोपन केले होते.
पहिली पितृदिन 19 जून 1010 साली अमेरिकेत साजरा करण्यात आला. - 1966 नंतर राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन यांनी जन्मदात्या पित्याचा सन्मान करणाऱ्या पितृदिनाची घोषणा केली ज्यानंतर जूनच्या तिसऱ्या रविवारी पितृदिन साजरा केला जाऊ लागला.
- सहा वर्षानंतर 1972 मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी कायद्यामध्ये या दिवसाची गणना करत पितृदिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.
- काही देशांमध्ये आजही पितृदिन 19 जूनला साजरा केला जातो. मात्र भारत, अमेरिका, ग्रीस, फ्रान्स, जपान, कॅनडा आणि चीनमध्ये पितृदिन जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
- आईप्रमाणेच वडिलांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका असते. तेव्हा पितृदिन हा वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सर्वोत्तम संगोपनाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade