मनोरंजन

‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित,सुहृद वार्डेकर-सायली मुख्य भूमिकेत

Harshada Shirsekar  |  Jan 27, 2020
‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित,सुहृद वार्डेकर-सायली मुख्य भूमिकेत

एक विशेष दिवस असला की त्या विशेष दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी अनेक योजना केल्या जातात. असाच एक खूप स्पेशल दिवस फेब्रुवारी महिन्यात येतो आणि तो दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम सुहृद वार्डेकर आणि मराठी चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी सायली संजीव यांचा चित्रपट ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुहृद आणि सायली यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून पसंतची पावती मिळवली आहे. दोघेही पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ या चित्रपटातून नात्यांच्या अनेक बाजू आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आपली किंवा परकी असा भेदभाव न करता प्रत्येक नात्यात मायेची, प्रेमाची भावना असते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. 

(वाचा : लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा)

सायली संजीव आणि सुहृद यांच्यासह गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिले आहे. गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुद्ध  वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे. ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ 14 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

(वाचा : परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल)

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

(वाचा : समंदर में नहाकर…, दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

‘चंद्रमुखी’
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहीत करणारी सौंदयवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन