लाईफस्टाईल

Valentine Day: पहली डेट खास बनविण्यासाठी स्पेशल डेटिंग टिप्स

Dipali Naphade  |  Feb 9, 2022
first-dating-tips-for-valentine-day

व्हॅलेंटाईन विक (Valentine Week) तर सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनविण्यास कपल्स अनेक दिवसांपासून तयारी करतात. आजकाल सोशल मीडियावर भरपूर लोक ऑनलाईन डेटिंगही करतात. अशावेळी पहिल्यांदाच कपल्स एकमेकांना भेटतात. पहिल्यांदाच डेटवर जाताना थोडी धकधक आणि भीती असते. त्यातही जर व्हॅलेंटाईनच्या आठवड्यात हा डेटिंगचा दिवस असेल तर अजूनच वेगळेपणा असतो. पहिल्यांदाच तुम्ही कोणाला भेटायला जाणार असाल आणि पहिली डेट जर तुम्हाला खास बनवायचा असेल तर तुम्ही काही टिप्स जाणून घ्यायल्या हव्यात. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची पहिली डेट नक्कीच लक्षात राहील अशी बनवू शकता.  

आऊटफिट

आपण जेव्हा पहिल्यांदाच कोणाला भेटायला जाणार असू तेव्हा आपली ड्रेसिंग स्टाईल नक्कीच चांगली असायला हवी. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या कपड्यांवरून झळकत असते. व्हॅलेंटाईन डे साठी तुम्ही लाल रंगाची निवडही करू शकता. लाल रंगाचे कपडे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. पण तुम्हाला भडक रंग नको असेल तर तुम्ही गुलाबी, काळा या रंगाचे कपडेही परिधान करू शकता. मात्र आपण अति ओव्हरस्टाईल तर नाही ना याची काळजी घ्या. तुम्हाला वन पिस आवडत नसेल तर तुम्ही पांढरा टीशर्ट आणि जीन्स अथवा जॅकेट स्टाईलदेखील यावेळी कॅरी करू शकता. 

गिफ्ट नक्की कॅरी करा 

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुमची पहिली डेट असेल तर ती अधिक चांगली होण्यासाठी आणि आयुष्यभर लक्षात राहील अशासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नक्की एखादे गिफ्ट घेऊन जा. तुम्ही अगदी महाग गिफ्ट घ्यायला हवे नाही. बजेटमधील गिफ्टही तुम्ही घेऊन जाऊ शकता. अगदी गुलाबाची फुलंही यादिवशी गिफ्ट म्हणून अधिक सुंदर वाटतात. गिफ्टमागील भावना महत्त्वाच्या. मात्र रिकाम्या हाताने जाणं नक्कीच योग्य नाही. 

अधिक मेकअप करू नका 

बऱ्याचदा गडद मेकअप केला की आपण अधिक सुंदर दिसतो असा अनेकांना गैरसमज असतो. पण पहिली डेट असेल तेव्हा नो मेकअप लुक करण्याला अधिक प्राधान्य द्या. तुम्ही सहसा न्यूड मेकअप करणे अधिक चांगले. लाईट मेकअपमध्ये तुमचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून येते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पहिल्यांदाच डेटवर जाणार असाल तर तुम्ही जितका शक्य आहे तितका कमी मेकअप करा. तुमचे नैसर्गिक सौंदर्य दिसणे अधिक चांगले ठरते. 

ऑर्डर करताना लक्षात घ्या आवड 

पहिल्यांदा डेटवर जाणार असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराची आवड लक्षात घ्या आणि त्यानुसार खाणे ऑर्डर करा. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदारालाही ऑर्डर करण्याची संधी द्या अथवा त्यांची आवड लक्षात घ्या. ऑर्डर येण्यापूर्वी तुम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. तसंच पहिल्या भेटीत एकमेकांना कम्फर्टेबल करणे गरजेचे आहे. त्यामुळे सहसा अल्कोहोलपासून दूर राहा. पहिल्या डेटमध्ये अल्कोहोलबाबत एकमेकांना विचारू नका. (पिण्यासाठी ऑफर देऊ नका)

परफ्युमचा करा वापर 

साधारण फेब्रुवारी महिन्यात अति गरम अथवा अति थंड नसते. पण तुम्ही जेव्हा पहिल्या डेटवर जाल तेव्हा नक्की परफ्युमचा वापर करा. लक्षात ठेवा की, प्रत्येक मुलीला वा मुलाला वेल ड्रेस्ड असणाऱ्या व्यक्ती आवडतात. त्यामुळे तुम्ही जाताना योग्य आऊटफिटसह फ्रेश परफ्युमचा वापर करा. फ्लॉवरी परफ्युम सर्वांना आवडतेच असं नाही. त्यामुळे याचा तुम्ही नक्की विचार करा. तसंच स्ट्राँग परफ्युमदेखील तुम्ही वापरू नका. 

कॉम्प्लिमेंट 

पहिल्या डेटवर गेल्यानंतर तुम्ही कसे दिसत आहात याबाबत तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचे असते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदारालाही कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका. कोणालाही प्रशंसा नक्कीच आवडते. त्यामुळे तुम्ही अगदी योग्य शब्दामध्ये ही प्रशंसा करा आणि तुमची डेट उत्तम करण्याचा प्रयत्न करा.

या टिप्समुळे नक्कीच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमची पहिली डेट असेल तर ती यशस्वी होईल यात शंका नाही. तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर नक्की शेअर करा आणि लाईक करा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल