आजकाल सर्वजण फिटनेसबाबत फारच जागरुक असतात. ज्यामुळे व्यायामासोबत विशिष्ठ डाएट प्लॅन फॉलो केले जातात. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणी दिवसभरात ठराविक वेळेत आणि ठराविक पदार्थ खातं तर कुणी आहारात काटेकोर बदल करतं. असं म्हणतात तुम्ही जितकं खाणार तितकं तुमचं वजन वाढत जाणार. पण असं मुळीच नाही कारण हा सर्वांच्या मनात डाएटबाबत असलेला एक गैरसमज आहे. दिवसभर उपाशी राहूनही काही जणींचं वजन कमी होत नाही उलट जास्तच वाढत जातं. कारण तुम्ही दिवसभरात किती वेळा खाता याबरोबरच काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे. काही आहारतज्ञ्ज सांगतात की, दिवसभरात फक्त दोनच वेळा जेवा तर काही जण सांगतात की दिवसभरात दर दोन दोन तासांनी खा. खरंतर तुमच्या शरीरप्रकृतीला कोणतं डाएट सूट होतं हे पाहूनच तुम्ही यापैकी कोणतेही डाएट सुरू करू शकता. जर तुम्हाला यापैकी कोणतंही डाएट फॉलो करायला जमणार नसेल तर दिवसभरात कमीत कमी पाच ते सहावेळा थोडं थोडं खा.योग्य पोषण होण्यासाठी दिवसभरात सकाळचा नास्ता आणि दोन वेळच्या जेवणाच्या मध्येदेखील खाणं गरजेचं आहे.
Shutterstock
दिवसभरात दोनपेक्षा जास्तवेळा खाणं का आहे गरजेचं
जरी तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असलं तरी शरीराला पुरेसं पोषण मिळणं तितकंच गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही कितीही वेळा खा मात्र त्यातून शरीराला किती पोषकतत्त्व मिळत आहेत याचा अंदाज घ्या. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर हाय कॅलरिज अन्नपदार्थ दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने कमी प्रमाणात खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. ज्यामुळे तुमचं पोट भरतं आणि मेटाबॉलिझमही सुधारतं शिवाय यामुळे तुम्हाला सतत भुक लागत नाही. भुक कमी लागल्यामुळे तुम्ही अपत्थकारक पदार्थ कमी खाता आणि तुमचं वजन नियंत्रणात राहतं. जर तुम्ही दोन ते तीन तासांनी थोडंसा आहार घेतला तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. दर तीन ते चार तासांनी तुमचं पोट रिकामं होतं ज्यामुळे तुम्हाला पुन्हा भुक लागल्यावर तुम्ही पौष्टिक पदार्थ खाऊ शकता. मात्र जेव्हा दोन वेळ पोटभर जेवता आणि मधल्या काळात बराच वेळ काहीच खात नाही तेव्हा तुम्हाला सतत भुक लागल्यासारखं वाटू लागतं. मग तुम्ही पुन्हा काहितरी खाण्याचा विचार करू लागता. सारखी सारखी तीव्र भुक लागणं तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी टाकते. कारण अशी तीव्र भुक लागल्यामुळे तुम्ही जे हाताला मिळेल ते पथ्यकारक अथवा अपत्थकारक असा कोणताही विचार न करता खाता. याउलट तुम्हाला दर दोन ते तीन तासांनी आपल्याला खायचं आहे असा विचार केल्यावर तुम्ही खाण्याबाबत नीट प्लॅनिंग करता. तुम्हाला कधी, काय खायचं आहे याचं व्यवस्थित नियोजन केल्यामुळे तुम्ही चांगले आणि पौष्टिक पदार्थ खाता.
Shutterstock
आहारात समावेश करा या पदार्थांचा
दिवसाची सुरूवात कोणत्या पदार्थापासून करावी –
सकाळचा नास्ता नेहमी पौष्टिक आणि भरपूर करावा. नारळपाणी, फळांचा रस, पोहे , उपमा, थालीपीठ, पेज, डोसा, इडली अशा पोट भरणाऱ्या पौष्टिक पदार्थांनी दिवसाची सुरूवात करा. ज्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल.
तुमच्या आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ असावेत –
सॅलेड, फळं, पनीर, मासे, अंडी, सूप, हिरव्या भाज्या, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारची कडधान्य, ओट्स, मका, ज्वारी, नाचणी सारखी तृणधान्य तुमच्या आहारात असायलाच हवे.
कोणते पदार्थ खाणे टाळाल –
प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड, पॅक्ड फूड आणि बाहेरील खाद्यपदार्थ, साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा.
मुबलक पाणी पिणं महत्त्ताचं –
पाणी शरीरासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण पाण्यावाटे शरीराली टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)
हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे ‘नॅचरल स्वीटनर्स’