Recipes

सुकामेव्याचा वापर करून तुमचं नेहमीचं जेवण करा चविष्ट

Trupti Paradkar  |  Jul 24, 2020
सुकामेव्याचा वापर करून तुमचं नेहमीचं जेवण करा चविष्ट

तुमच्या स्वयंपाकघरात एक असा सुकामेवा आहे जो सर्व प्रकारच्या जेवणात स्वाद आणू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? सुकामेवा म्हटलं की अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी असे विविध प्रकार डोळ्यांसमोर येतात. या सर्वच सुक्यामेव्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येतो. पण आज आम्ही तुम्हाला अक्रोडाचा वापर स्वयंपाकात कसा करायचा हे सांगणार आहोत. अक्रोड हा एक उत्कृष्ट सुकामेवा आहे शिवाय अक्रोडमुळे तुमच्या अन्नातील पोषण मुल्येही वाढू शकतात. अक्रोडचा वापर पिठात टाकून तुम्ही चविष्ट ‘बनाना ब्रेड’ बनवू शकता. ‘हेल्दी सॅलेड’ पासून ते अगदी ‘ब्रेडवर स्प्रेड बटर’ तयार करण्यासाठीही तुम्ही अक्रोड वापरू शकता. तुमच्या लंच प्लेटला एक आकर्षक, टेस्टी आणि क्रंची करण्यासाठी अक्रोडचा वापर जरूर करा. आम्ही तुमच्यासोबत अक्रोडचा वापर कसा करायचा आणि त्यासाठी काही खास रेसिपीज शेअर करत आहोत. या रेसिपीज आपल्यासोबत शेफ संज्योत कीर (Chef Sanjyot Keer) यांनी शेअर केलेल्या आहेत. 

Shutterstock

सॅलडसाठी –

अक्रोड सर्व प्रकारच्या सॅलडमध्ये एक छान क्रंचीनेस निर्माण करतं. तुम्ही तुमच्या आवडत्या ग्रीन सॅलडमध्ये ते वापरू शकता किंवा कापलेल्या कॅलिफोर्निया अक्रोडांसोबत चविष्ट वाल्डोर्फ सॅलड बनवू शकता. तसंच तुम्ही काही अक्रोड हलके भाजून तुमच्या आवडत्या भाज्यांमध्ये व चुरडलेल्या फेटा चीजमध्येही वापरू शकता.

डाळ, भाजी आणि सूपसाठी-

अक्रोडांची क्रिमी पेस्ट तयार करून तुम्ही तुमची एखादी भाजीची ग्रेव्ही अथवा सूप्स दाट करू शकता. यासाठी तुम्हाला थोडे कॅलिफोर्निया अक्रोड आणि थोडे ऑलिव्ह ऑइल (लसूण आणि मिरच्या पर्यायी आहेत) एकत्र मिक्सरमध्ये वाटून जाडसर पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवावी लागेल.  तुम्ही जेव्हा कधी सूप, पास्ता किंवा ग्रेव्ही बनवणार असाल तेव्हा त्याचा थोडासा वापर करा. तुम्ही अक्रोडाचा वापर करून टोमॅटोसोबत सॉस तयार करू शकता, तुमच्या आवडत्या डिशेस बनवण्यासाठी मटणाला पर्याय म्हणून तुम्ही अक्रोड वापरू शकता किंवा एक चविष्ट, कुरकुरीत कॅलिफोर्निया अक्रोडचा क्रस्ट बनवून तुमच्या आवडत्या फिश डिशसोबत खाऊ शकता. 

इव्हनिंग स्नॅक्ससाठी –

जेवणासोबत मधल्या वेळी लागणारी भुक स्नॅक्समुळे भागवली जाते. अक्रोडातील फॅट्स आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. म्हणूनच अक्रोड स्नॅकसाठी वापरल्याने तुमच्या शरीराला पोषक घटक मिळू शकतात. यासाठी एक मूठभर अक्रोड दोन जेवणांच्या मध्ये खा. ज्यामुळे तुमचे पोट कायम भरलेले राहील. अती भुक न लागल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहू शकेल. यासाठी तुम्ही अक्रोड थोडेसे रोस्ट करून ते मसालेदार स्नॅक्स बनवू शकता.

गोड पदार्थांसाठी –

बेक केलेल्या पदार्थांमध्ये अक्रोडांचा वापर अत्यंत उत्तमरित्या करता येतो. आज संध्याकाळसाठी बनाना ब्रेड किंवा चॉकलेट ब्राऊनी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अक्रोड नक्कीच उपयोगी पडतील. अक्रोडमुळे डेझर्टला मस्त कुरकुरीतपणा येतो आणि महत्त्वाचं म्हणजे अक्रोड चॉकलेटसोबत छान लागतात. तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर कॅलिफोर्निया अक्रोड मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवा आणि खाण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही याचा हनी वॉलनट बारही बनवू शकता.

तेव्हा जेव्हा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल किंवा मस्त काहीतरी चमचमीत खावंसे वाटेल असेल तेव्हा अक्रोड स्वयंपाकासाठी बिनधास्त वापरा. कारण अक्रोड खाण्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल. 

 

अक्रोड पासून तयार करा या रेसिपीज

आम्ही तुमच्यासोबत काही अक्रोड रेसिपी शेअर करत आहोत ज्या करणं अतिशय सोपं आहे.

हनी वॉलनट बटर

 

साहित्य –

कृती –

1. ओव्हन 150°C ला प्रीहीट करा. छोट्या बेकिंग शीटवर अक्रोड ठेवा आणि 10 मिनिटे टोस्ट करा. थंड होऊ द्या. 

2. फूड प्रोसेरमध्ये घाला आणि जाड पेस्ट बनवा. उरलेले साहित्य त्यात मिसळा आणि मऊ होईपर्यंत प्रोसेस करा. 

 

 

 

वॉलनट पार्सली पेस्तो

साहित्य –

कृती

1. पार्सली धुवा, कोरडी करा आणि पाने खुडून घ्या. 

2. लसूण सोला आणि बारीक कापून घ्या. 

3. चीज किसून घ्या. 

4. अक्रोड बारीक करून घ्या. अक्रोडांची जाड पेस्ट झाल्यावर त्यात पार्सली, लसूण, चीझ आणि ऑलिव्ह ऑइल घाला आणि पुन्हा एकदा नीट बारीक करून घ्या.

क्रंची कोकोनट-वॉलनट बटर

साहित्य –

कृती –

1. खोबरे कोरड्या पॅनमध्ये सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. थंड होऊ द्या. 

2. अक्रोड आणि मीठ मिश्रण क्रीमी होईपर्यंत ३-४ मिनिटे ब्लेंडरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये दळून घ्या. 

3. भाजलेले खोबरे घालून नीट मिश्रण करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि शेफ संज्योत कीर (Chef Sanjyot Keer)

अधिक वाचा –

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश (Maida Recipes In Marathi)

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

Read More From Recipes