DIY फॅशन

खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी निवडा ही सुंदर फुले

Leenal Gawade  |  Sep 12, 2021
हेअरस्टाईलसाठी फुले

 एखादी हेअरस्टाईल करायची असेल तर आपण हजारो फोटो गुगल करुन शोधून काढतो. लग्नासाठी किंवा लग्नासारख्याच काही खास समारंभासाठी जर तुम्ही तयार होत असाल तर हेअरस्टाईल तर आलीच. कोणतीही हेअरस्टाईल ही फुलांशिवाय अपूूर्णच असते. साधारणपणे केसांमध्ये फुले घालताना मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाची फुले माळली जातात. पण या व्यक्तिरिक्तसुद्धा अशी काही फुले मिळतात जी तुमच्या हेअरस्टाईलला चार चाँद लावू शकतील. जाणून घेऊया खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी सुंदर फुले 

फुलांच्या डेकोरेशनच्या भन्नाट आयडियाज, वाचेल पैसा

जिप्सोफिला / बेबीस ब्रेथ

Instagram

पांढऱ्या रंगाची बारीक बारीक फुले तुम्ही आतापर्यंत तुम्ही खूप हेअरस्टाईलमध्ये पाहिली असेल. ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न हेअरस्टाईल अगदी कोणत्याही हेअरस्टाईलसाठी ही फुलं अगदी आवर्जून वापरली जातात. बारीक बारीक पांढऱ्या रंगाची ही फुलं फार महागही नाहीत. अगदी 30 रुपये जुडी वगैरे मिळू शकते. जर तुम्हाला अगदी नाजूक फुलं लावायची असतील किंवा अशी फुलं ज्यामुळे तुमच्या केसांना एक वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही बेबी ब्रेथची ही फुलं वापरु शकता.

फिक्कट रंगाची गुलाबाची फुलं

Instagram

गुलाबाची फुलं ही कोणाला आवडत नाहीत. पण केसांमध्ये गुलाब माळणे खूप जणांना आवडत नाही. कारण गुलाबाची फुलं खूप मोठी असतात. पण गुलाबांची फुलं हेअरस्टाईल करताना त्यांचा वापर योग्य पद्धतीने करणे देखील गरजेचे असते. हल्ली गुलाबाची फिक्कट रंगाची म्हणजे गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची फुलं वापरली जातात. ही फुलं हेअरस्टाईलमध्ये छान दिसतात. स्पेशली जे मोठे बन्स बांधतात अशांना तर अगदी आरामातच अशी फुलं माळता येतात. ही फुलं केसांमध्ये सुंदर दिसतात. यासोबत बेबी ब्रेथची फुलं लावून देखील हेअरस्टाईल करता येते. 

 पानसी

Instagram

पानसी नावाची फुलं ही हल्ली सगळीकडे मिळतात. अगदी पातळ अशी ही फुलं असतात.  यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग मिळतात. गुलाबी, जांभळ्या रंगाची ही फुलं दिसायला फारच सुंदर दिसतात. आंबाडा किंवा कोणत्याही हेअरस्टाईलमध्ये ही फुलं वापरता येतात. ही फुलं जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे ही फुलं निवडताना तुमचा कार्यक्रम किती वेळाचा आहे याचा देखील विचार करा की नेमक्या कितीवेळासाठी तुम्हाला ही फुलं घालायची आहेत. 

मोगरा

Instagram

मोगऱ्याची फुलं ही कधीच आऊट ऑफ फॅशन होऊ शकत नाही. मोगऱ्याची फुलं माळण्याची वेगवेगळी पद्धत आतापर्यंत तुम्ही पाहिली असेल. बहुतेकवेळा मोगऱ्याचा गजरा बनवून तोच माळला जातो. पण हल्ली त्याची वेगळी चादर किंवा मोगऱ्याची थोडी वेगळ्या पद्धतीची माळ बनवून ती देखील केसांना गुंडाळली जाते.  त्यामुळे अशी फुलं तुम्ही नक्की ट्राय करायला हवीत 

ऑर्किड्स

Instagram

ऑर्किड्स ही फुलं देखील खूप जणांना आवडतात. ही फुलं देखील अनेक हेअरस्टाईलसाठी वापरले जातात. ऑर्किड्समध्ये गडद रंगामध्ये मिळतात. पण हल्ली ऑर्किड्समध्येही वेगवेगळे रंग मिळतात. त्यामुळे तुमच्या साडीला किंवा लेंहग्याला मॅचिंग अशी फुलं निवडता येतात. त्यामुळे तुम्ही ही फुलं देखील तुम्ही वापरु शकता. 

आता खास कार्यक्रमांसाठी तुम्ही अगदी नक्कीच ही फुलं वापरा तुमची हेअरस्टाईल अगदी चांगली दिसेल.

जाणून घ्या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

Read More From DIY फॅशन