Diet

ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे

Harshada Shirsekar  |  Nov 12, 2019
ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे

करिअरमधील स्पर्धा, खासगी आयुष्यातील दगदग, यातून येणारा ताणतणाव, घडाळ्याच्या काट्याप्रमाणं धावणारा अगदी रोजचाच दिवस… या सर्व धकाधकीमुळे आपलं स्वतःच्या आहार आणि प्रकृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. पण शरीररूपी यंत्र सुरू राहण्यासाठी सकाळपासूनच खाण्यापिण्याचं वेळापत्रक आपण आखून ठेवणं गरजेचं आहे. कारण वेळीच योग्य पद्धतीनं डाएट करण्यास सुरुवात केली नाही तर तुम्हाला आरोग्यासंबंधित गंभीर परिणाम भोगावे लागतील. निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात डाएट अतिशय महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रक्तगटानुसार काय खावं आणि काय खाऊ नये, हे निश्चित केल्यास याचा आरोग्यास अधिक फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रत्येक रक्तगटाचा (Blood Group) स्वतंत्र असा एक स्वभाव असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील रक्तगटाशी संबंधित असतात.

कोणकोणते आहेत रक्तगट?

A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह

(वाचा : डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं)

 

 

‘O’ रक्तगटासाठी प्रोटीनयुक्त डाएट सर्वात उत्तम

‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांनी प्रोटीनयुक्त डाएट घ्यावा. डाळ, मांस, मासे, फळांचा आपल्या आहारात समावेश करावा. कडधान्य आणि डाळींसह डाएटमध्ये फळांचंही प्रमाण वाढवावं.

(वाचा : काय आहे स्पृहा जोशीचा डाएट फंडा)

 

‘A’ रक्तगटासाठीचा डाएट

ज्यांचा रक्तगट ‘A’ आहे, त्यांनी आपल्या डाएटसंदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त मासे, डाळींवरही अधिक भर द्यावा. जर वजन घटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर ऑलिव्ह ऑईल, डेअरी उत्पादनं, मका आणि मासे हे पर्याय आहारासाठी उत्तम आहेत.

– काय खाऊ नये?

‘A’ रक्तगट असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक यंत्रणा संवेदनशील असते. यामुळे त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. निरोगी आरोग्यासाठी मांस खाण्याचं प्रमाण कमी करावं लागेल, कारण ते पचण्यास जड असतं. त्यामुळे जर तुमचा ब्लड ग्रुप ‘A’ असेल तर चिकन-मटणाचं सेवन कमी करावं.

(वाचा : करिनाने तैमूरसाठी तयार केलाय खास ‘डाएट प्लॅन’)

‘B’ रक्तगट असणारे आहेत नशीबवान

‘B’ रक्तगट असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण तुम्हाला आहारातून काहीही वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. हिरव्या पाल्याभाज्या, फळ, मासे, मटण आणि चिकन असे सर्व काही तुम्ही खाऊ शकता. कारण ‘B’ रक्तगट असणाऱ्यांची पचन प्रक्रिया प्रचंड चांगली असते. यामुळे त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. शिवाय ही लोक दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडे इत्यादींचंही भरपूर प्रमाणात सेवन करू शकतात. पण आपण काय खात आहोत, यावर योग्य नियंत्रण असणंही आवश्यक आहे.

‘AB’ रक्तगट असणाऱ्यांचा असा असावा डाएट

‘AB’ रक्तगट असणारी माणसं फार क्वचितच आढळतात. ज्या गोष्टी रक्तगट ‘A’ आणि ‘B’ साठी वर्ज्य करण्यास सांगण्यात आलेल्यात आहेत, त्याच सर्व सूचनांचं ‘AB’ रक्तगट असणाऱ्यांनीही पालन करावं. तसंच या लोकांनी फळ आणि भाज्यांचे अधिक प्रमाणात सेवन केलं पाहिजे. अंडी खाणं देखील त्यांच्या आरोग्यास अत्यंत लाभदायक ठरेल. दूध, दुग्धजन्य पदार्थ, लोणी यांसारख्या पदार्थ अपायकारक ठरणार नाहीत. पण दुसरीकडे मांसाहार मात्र कमी करावा लागेल.

असं असावं आहाराचं नियोजन

शक्यतो सकाळचा नाश्ता करणं कधीही टाळू नये. पौष्टिक घटकांचाच यामध्ये समावेश करण्यात यावा. कारण सकाळच्या नाश्त्यावर आपली संपूर्ण दिवसभराची ऊर्जा टिकून असते. त्यामुळे नाश्ता भरपेटच असावा. यानंतर दुपारचं जेवणही वेळेतच होणं अतिशय आवश्यक आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर संध्याकाळही थोडंसं खावं. पण रात्रीचा आहार काळजीपूर्वक हलक्या स्वरुपातील असावा. महत्त्वाचे म्हणजे दिवसभरात जवळपास अडीच लीटर पाणी प्यावे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet