DIY सौंदर्य

गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

Dipali Naphade  |  Oct 7, 2019
गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

आपण आपल्या चेहऱ्याची नेहमीच काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या ओठांनाही जपतो. खरं तर अनेक वेगवेगळ्या लिपस्टिक लावून ओठांचा मूळ गुलाबी रंग बऱ्याचदा त्यातील केमिकल्समुळे निघून जातो. पण मग अशावेळी गुलाबी ओठ कायम तसंच राहावे असं वाटत असेल तर नक्की काय करायला हवं असा आपल्याला प्रश्न पडतो. बऱ्याचदा ओठ कोमल राहण्यासाठी आणि गुलाबी राहण्यासाठी अनेक मॉईस्चराईजर अथवा क्रिम्सचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? घरातील तुमच्या नेहमीच्या मसाल्यातील असा एक पदार्थ आहे जो तुमच्या ओठांचा गुलाबी रंग तसाच ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. वेलची हा असा पदार्थ आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमचे ओठ गुलाबी ठेवायला मदत होते. नक्की याचा उपयोग कसा करायचा जाणून घेऊया – 

1. वेलचीने ओठांची त्वचा होते चमकदार

Shutterstock

वेलचीमध्ये अनेक अँटिसेप्टिक आणि अँटिबॅक्टेरियल तत्व आढळतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील संक्रमण दूर होण्यासाठी वेलचीचं नियमित सेवन केल्याने तुमच्या त्वचेवरील रोग नष्ट होतात. तसंच वेलचीच्या सेवनाने तुमच्या ओठांची त्वचा चमकदार होते. चमकदार ओठ यामुळे आपला मुळचा गुलाबी रंग आणतात. 

2. ड्राय ओठांना करतं गुलाबी

Shutterstock

कोरडे ओठ ही समस्या बऱ्याच जणांना असते. तुमचे ओठ ड्राय झाल्यामुळे ओठ अधिक वाळतात आणि कोरडे पडतात. तसंच त्यामुळे ओठ फाटतात आणि त्यातून रक्त येऊ लागतं. पण या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एक बारीक वेलची वाटून त्यामध्ये लोणी मिसळा. ही पेस्ट तयार करून तुम्ही तुमच्या ओठांवर लावा. ही पेस्ट काही काळ तशीच ठेवा आणि मग ओठ व्यवस्थित हलक्या हाताने धुवा. असं केल्याने तुमच्या ओठांवर गुलाबीपणा येतो. 

Perfect Pout साठी ट्राय करा ‘या’ सोप्या 5 Tricks!

3. वेलची ओठांच्या त्वचेची घेते काळजी

वेलचीचा सुगंध आणि त्याचा स्वाद दोन्ही अप्रतिम असतं. वेलची खाण्याने तोंडातील दुर्गंध दूर होतो. पण वेलची नित्यनियमाने खाल्ल्यास, वेलचीमुळे तुमचे ओठ अधिक चमकदार होतात. तसंच वेलची त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते. वेलची ही तुमच्या ओठांप्रमाणेच तुमच्या शरीरासाठीदेखील तितकीच फायदेशीर ठरते. 

कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर करा रामबाण आणि सोपे उपाय

4. वेलची स्क्रब केल्याने होता ओठ गुलाबी

Shutterstock

वेलची आणि मध हे कॉम्बिनेशन गुलाबी ओठांसाठी उत्कृष्ट ठरतं. तुम्ही मधामध्ये वेलची पावडर मिसळून तुम्ही व्यवस्थित ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. हे स्क्रब केल्याने तुमच्या ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध आणि वेलचीमुळे तुमच्या ओठांवर चांगलं स्क्रब होतं आणि तुम्ही नेहमी लावत असलेली लिपस्टिक असं केल्याने ओठांवर निघून जाते. 

5. आरोग्य सुधारतं त्यामुळे ओठ राहतात गुलाबी

दररोज तुम्ही जेव्हा वेलची खाता तेव्हा तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ खराब बाहेर पडतात आणि त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे तुमचे ओठ गुलाबी राहण्यासाठी याची मदत होते. गुलाबी ओठांसाठी वेलचीचा वापर करणं तसं तर जास्त लोकांना माहीत नाही. बरेच जण मॉईस्चराईजरचा वापर करण्यात येतो. पण वेलचीमध्ये असणाऱ्या अँटिसेप्टिक तत्वामुळे ओठ अधिक मऊ आणि मुलायम राहण्यासाठी फायदा होतो. 

ओठ काळे पडले असतील तर करा 10 घरगुती उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य