DIY सौंदर्य

कपाळावर पिंपल्स येण्याची कारणं आणि उपाय

Leenal Gawade  |  Jun 11, 2021
कपाळावर पिंपल्स येण्याची कारणं आणि उपाय

 

 

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची ठिकाणं प्रत्येकाची वेगवेगळी असतात. काहींना गालावर काहींना हनुवटीवर तर काहींना कपाळावर पिंपल्स येतात. कपाळावर येणाऱ्या पिंपल्सचा त्रास हा खूप जणांना असतो. पण यामागेही काही कारणं असतात जी तुम्हाला माहीत असायला हवी. पिंपल्स येण्यामागे जशी कारणे असतात तशीच कारणे ही कपाळावर पिंपल्स येण्यामागे असतात. खूप जणांचा चेहऱ्यावरील इतर भाग हा गुळगुळीत आणि छान असतो. फक्त कपाळाचाच भाग पिंपल्सने भरलेला असतो. तुम्हालाही कपाळावर असे मोठेमोठे पिंपल्स येत असतील तर जाणून घेऊया कपाळावर पिंपल्स येण्याची काही कारणं आणि त्यावर सोपे असे उपाय

आयब्रोजनंतर तुम्हालाही येतात का पिंपल्स

कपाळावर म्हणून येतात पिंपल्स

instagram

 

पिंपल्स येण्याची सगळयांची कारणं ही वेगळी असतील पण सर्वसाधारणपणे या कारणांमुळे कपाळावर पिंपल्स येऊ शकतात. 

  1. केसात कोंडा झाला असेल तर त्या कोंड्यामुळे कपाळावर पिंपल्स येण्याचा त्रास खूप जणांना होतो. 
  2. केस धुण्याचा खूप जण कंटाळा करतात. अशावेळी केसामध्ये राहिलेला तेलकटपणा त्वचेमध्ये उतरला तरी देखील पिंपल्सचा त्रास होण्याची शक्यता असते. 
  3. पिरेड्सच्या आधी खूप जणांना पिंपल्स हे संकेत देत असतात. अशावेळीही खूप जणांना कपाळावर मोठे मोठे पिंपल्स येतात. 
  4. जर तुम्ही आयब्रोजनंतर फोरहेड करत असाल म्हणजेच कपाळावरील केस काढत असाल तरी देखील तुम्हाला कपाळावर पिंपल्स येण्याचा त्रास होऊ शकतो. 
  5. खूप जण चेहऱ्यावर कोणतेही क्रिम लावताना ते कपाळावर लावत नाही. त्यामुळे कपाळाला कोणत्याही प्रकारच्या स्किन ट्रिटमेंट मिळत नाही. अशावेळीही कपाळावर खूप जणांना पिंपल्स येण्याचा त्रास होतो. 

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनमध्ये असं वापरा ग्लिसरीन

या उपायांनी घालवा पिंपल्स

Instagram

 

आता कपाळावर पिंपल्स येण्याची ही काही सर्वसाधारण कारणं वाचल्यानंतर जाणून घेऊया सोपे उपाय

  1. जर तुम्हाला केसात असलेल्या कोंड्यामुळे कायम कपाळावर पिंपल्स येत असतील तर तु्म्ही चांगला अँटी डँडरफ शॅम्पू वापरा. याच्या वापरामुळेही तुमच्या केसातील कोंडा कमी होऊन तुम्हाला पिंपल्सचा त्रास होणार नाही. 
  2. केस सतत तेलकट होत असतील तर अशांनी स्वच्छतेमध्ये अजिबात दिरंगाई करु नये किमान दोन दिवसांनी चांगल्या शॅम्पूने केस धुवावे. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळेल. तुम्हाला हळुहळू हा त्रास कमी झालेला दिसेल. 
  3. आयब्रोज केल्यानंतर जर तुम्हाला या भागामध्ये पिंपल्स येण्याचा त्रास होत असेल तर आयब्रोज केल्यानंतर तुम्ही त्या भागी थोडा बर्फ चोळा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. जर असे करुनही तुम्हाला बारीक बारीक पुरळ दिसत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी अॅलोवेरा जे लावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. 
  4. पिरेड्सच्या आधी संकेत देणारे असे हे पिंपल्स तुम्हाला आले असतील तर तुम्ही त्यावर काहीही करु नका. पिंपल्स आल्यानंतर तुम्ही त्यावर काहीही इलाज करु नका. त्याऐवजी तुम्ही गरम पाणी प्या. तुमचे आरोग्य त्या दिवसात चांगले ठेवा. हे पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करु नका. कारण हे पिंप्स आपोआप बरे होतात.

आता तुम्हाला कपाळावर पिंपल्स आले असतील तर तुम्ही ते कशामुळे आलेत हे जाणून घेत पिंपल्सची काळजी घ्या.

मोठे पिंपल्स येतात, अशी घ्या काळजी पिंपल्स जातील पटकन 

Read More From DIY सौंदर्य