Friends

FRIENDSHIP DAY SPECIAL : आयुष्यात मित्र असतात खूपच खास पण…

Leenal Gawade  |  Aug 2, 2021
मैत्री टिकवताना

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा  FRIENDSHIP DAY/मैत्री दिन साजरा केला जातो. आयुष्यात एक मित्र तरी असावाच लागतो जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कायम तत्पर असतो. हा मित्र तुमच्या प्रत्येकवेळी आजुबाजूला नसला तरी तुमच्या आयुष्यात आलबेल आहे की नाही याची खबर ठेवतो. तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला ओरडायलाही कमी करत नाही. तुम्ही काही चांगलं करत असाल तर तुमची तारीफ करुनही थकत नाही. मैत्रीच्या अनेक व्याख्या सगळ्यांनी केलेल्या असल्या तरी देखील सर्वसाधारणपणे केवळ फायदा न पाहता तुमच्याही निखळ प्रेम करणारी व्यक्ती ही तुमच्या आयुष्यातील बेस्ट मित्र असू शकते. तुमच्याही आयुष्यात असा एक मित्र असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत असे मुळीच वागू नका की ज्यामुळे तुमची मैत्री दावणीला लागेल 

Friendship Day Quotes In Marathi – मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

सौजन्य : Instagram

मैत्रीचा फायदा घेऊ नका

मैत्रीत सगळं काही माफ असतं हे खरं असलं तरी देखील मैत्रीत अनेकदा एखादी व्यक्ती कारण नसताना दुसऱ्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा फायदा घेतला जातो. हा फायदा पैशांचा नाही तर मानसिक सुद्धा असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा मानसिक फायदा घेणे हे नेहमी चुकीचे. एखादी व्यक्ती जर तुमच्यावर खूप जास्त विश्वास ठेवत असेल तर अशा तुमच्या मित्रांसोबत तुम्ही त्या मैत्रीचा फायदा चुकीच्या गोष्टींमध्ये घेऊ नका. तुमच्या जवळच्या मित्राला तुमच्या मनात चालणारी वाईट गोष्टसुद्धा माहीत असते. त्यामुळे  असे करताना तुमच्या मित्राचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या
(उदा. खूपवेळा तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीची नावडती गोष्ट असूनही तुम्ही तीच चुकी वारंवार करता तेव्हा मैत्री दावणीवर लागते)

असा साजरा करा मैत्री दिन, बेस्ट फ्रेंडसोबत पाहा हे भन्नाट मराठी चित्रपट

खोटं बोलू नका

कोणत्याही नात्यात खोटं बोलून अजिबात चालत नाही. मैत्री दोघांची असो वा मोठ्या ग्रुपची. जर तुम्ही त्यातील एका सदस्याशी खोटं बोलत असाल तरी देखील मैत्रीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. खूप जणांच्या गटामध्ये एकाशी आपली मैत्री अधिक असू शकते हे अजिबात नाकारता येत नाही. कारण हा सर्वसाधारणपणे मानवी स्वभाव आहे. तुमची ग्रुपमध्ये एकाशीच मैत्री आहे हे अजिबात दिसता कामा नये. मैत्री टिकवताना एकमेकांशी खोट बोलावं लागेल अशी परिस्थिती अजिबात निर्माण करु नका. त्यामुळेही खूप वेळा अडचणी निर्माण येतात.
(उदा. एखादी व्यक्ती जर तुमच्यावर खूप विश्वास ठेवत असेल पण तुमच्या स्वत:च्या फायद्यासाठी जर तिच्याशी खोटं बोलत असाल तर ते अजिबात चांगले नाही.)

चांगला आणि योग्य सल्ला द्या

प्रत्येक जण काहीना काही चुका आयुष्यात करतच असतं. कोणी चुकत नाही असे मुळीच होत नाही. कधीकधी इमोशनल होऊन चुकीच्या मार्गावर जाणारे लोकंही तुम्ही नक्कीच पाहिले असतील. तर तुमचा जवळचा मित्र त्याच्या आयुष्याशी निगडीत चुकीचा असा निर्णय घेऊ पाहात असेल तर त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी जी मदत करता येईल ती करा. कारण कधी कधी चुकीच्या मार्गाने जाताना तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवला तर तुम्ही त्याला योग्य सल्ला योग्य वेळी द्याल असे होईल

आता मित्र असणे गरजेचे नाही ती मैत्री जपणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आयुष्यात एक मित्र असावा पण तो असा

नाती जपताना… येऊ शकतात या अडचणी

Read More From Friends