Travel in India

मेरा देश बदल रहा है…. महिला डब्यावर दिसणार आधुनिक महिला

Leenal Gawade  |  May 27, 2019
मेरा देश बदल रहा है…. महिला डब्यावर दिसणार आधुनिक महिला

रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर महिला डबा ओळखायचा म्हटलं तर डब्यावर असलेले चित्र आपल्या कामी येते. डोक्यावर पदर घेतलेली ही महिला डब्यावर दिसली की, तो महिला डबा आहे असे समजावे. पण आता तुम्हाला याच महिला डब्यावर आधुनिक महिला दिसणार आहे. हे चित्र म्हणजे बदलेल्या महिलांचे प्रतीक आहे असे समजायला काहीच हरकत नाही. त्यामुळेच तर मेरा देश बदल रहा है….आगे बढ रहा है हे आज आवर्जून  म्हणावेसे वाटते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हा बदल लवकरच केला जाणार आहे.

तुमचा आवडता रणवीर सिंह बनणार गुज्जू भाई

 

आता घुंगट नाही तर दिसणार मॉर्डन स्त्री

पश्चिम रेल्वेकडून हा नवा बदल सुचवण्यात आला असून तुम्ही पाहात असलेल्या चित्रात तुम्हाला दिसेलच की, यात फॉर्मल ड्रेसमधील महिला केस मोकळे सोडून आणि आत्मविश्वाने उभी असलेली दिसत आहे. हल्लीची मॉर्डन स्त्रीही अगदी तशीच आहे नाही का? 2019 मध्ये जगताना आपण आपल्या बाजूला अनेक अशा समृद्ध महिला पाहतो ज्या स्वत:ला सिद्ध करुन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. असे असताना रेल्वेवर महिला डब्याची ओळख अशी का? म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे. आता लवकरच सगळ्या डब्यांवर तुम्हाला नवी तडफदार, आत्मविश्वासाने समृद्ध आणि ओठांवर स्मित असलेली महिला दिसणार आहे.

कुणाल खेमूच्या वाढदिवसाला तिच्या चिमुकलीने गायलं गाण आणि केला बर्थडे स्पेशल

ठिकठिकाणी लावणार पोस्टर्स

महिला डबा सुशोभित करण्याचे काम मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहेच. महिला डब्याचा नवा लोगो तयार करताना महिलांना अधिकाधिक प्रेरणा मिळावी यासाठीही काही बदल सुचवण्यात आले आहेत. महिला डब्यांच्या लोगो व्यतिरिक्त तुम्हाला या डब्यांमध्ये कर्तबगार महिलांचे पोस्टर्सदेखील दिसणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, महिला क्रिकेटर मिताली राज, अंतराळवीर कल्पना चावला अशा कर्तबगार महिलांचा समावेश असणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रवास करताना तुम्हाला एका वेगळ्या वातावरणात प्रवास केल्यासारखा वाटेल, असा विश्वास रेल्वेला आहे. शिवाय या नव्या बदलामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा रेल्वेला देखील आहे.

गोंधळ होऊ नये म्हणून हे करणार बदल

आता इतकी वर्ष महिला डबा हा डोक्यावर पदर घेतलेल्या महिलेमुळे ओळखला जातो. आता हा नवा बदल केल्यानंतर पुरुषांना तो डबा चुकून आपला वाटू नये यासाठी मागे मारण्यात आलेल्य तिरप्या रेषा अधिक गडद करण्यात येणार आहे. गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अपंग डब्यावर असलेले पिवळे पट्टे गडद करण्यात येणार आहे.

मुंबईत अंकिता लोखंडेने घेतलं आलिशान बंगला.. वाचा काय आहे बंगल्याची खासियत

महिला डब्यात केले बदल

महिला डब्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक बदल करण्यात आले आहे. महिला डब्यात आरसा लावण्यापासून ते पूर्ण डबा गुलाबी करेपर्यंत अनेक बदल करण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील अनेक डब्यांमध्ये छान पेंटिगदेखील करण्यात आले आहे. त्याला देखील अनेक महिलांनी पसंती दिली. शिवाय महिलांना प्रवास करताना सुरक्षित वाटावे म्हणून महिला डब्यात कॅमेरेदेखील बसवण्यात आले. त्यामुळे आता हा नवा पण सध्याच्या महिलांचे नेतृत्व करणारा हा फोटो महिलांना कसा वाटतो हे हा बदल केल्यानंतर कळेलच.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From Travel in India