अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न, खरेदी केलं 8 बीएचके घर

अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न, खरेदी केलं 8 बीएचके घर

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने घराघरात पोहचलेली अर्चना अर्थात अंकिता लोखंडेचं नाव नक्कीच सर्वांना माहीत आहे. नुकतंच ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातूनही अंकिताने आपला अभिनय दाखवून दिला. अंकिता आणि सुशांतच्या अफेरचीदेखील खूपच चर्चा होती. पण त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता खूपच तुटली होती. सुशांतच्या आठवणीतून बाहेर येत अंकिताने पुन्हा एकदा आपणही कोणत्याही बाबतीत कमी नाही हे दाखवून दिलं आहे. मात्र आता चर्चा आहे ती अंकिताच्या लग्नाची. काही दिवसांपूर्वीच अंकिताचा तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनबरोबरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अंकिता आणि विकी लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता ही गोष्ट सिद्धही होत आहे.


विकीबरोबर खरेदी केला 8 बीएचकेचा बंगला


अंकिता गेले कित्येक महिने विकी जैनला डेट करत आहे. मणिकर्णिकाच्या प्रमोशनच्या वेळी तिने हे मान्यही केलं आहे. तर काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या लग्नात अगदी आनंंदात नाचताना आणि किस करताना या दोघांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. अंकिताला नेहमीच कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पण अंकिता आणि विकीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण आता या जोडीने शहरामध्ये 8 बीएचकेचा बंगला खरेदी केल्याची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर दोघंही या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याचवर्षी अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. अर्थात या दोघांनीही या गोष्टीला पुष्टी दिली नसली तरीही लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


ankita vicky FB


डिसेंबरमध्ये करणार लग्न


यावर्षी डिसेंबर अथवा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये अंकिता आणि विकी लग्न करणार असल्याचं सध्या वृत्त आहे. अंकिता आणि विकी या दोघांच्याही घरच्यांची या लग्नाला परवानगी असून लग्नानंतर दोघेही या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विकी आणि अंकिता सध्या बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. विकी जैन अंकिताबरोबर अनेक पार्टीज मध्येही दिसतो. शिवाय अंकिता विकीबरोबर असते तेव्हा खूपच आनंदी असते. त्यांचं फ्रेंडसर्कलदेखील एकच आहे.

3 वर्ष जुनं आहे नातं


अंकिताचं ब्रेकअप झाल्यानंतर मागील 3 वर्षांपासून अंकिता आणि विकी एकत्र आहेत. अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘नातं खूपच गरजेचं असतं. विशेषतः लग्नाचं नातं. लग्न हे माझं नेहमीच स्वप्न होतं. पण वेळेनुसार आपल्या प्राथमिकता आयुष्यात बदलत जातात. आता मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे.’ तर एका मुलाखतीत आपण विकीबरोबर नात्यात असून खूप आनंदी असल्याचंही अंकिताने सांगितलं होतं. विकी बिलासपूरमधील उद्योगपती असून अतिशय चांगला मुलगा असल्याचंही अंकिता म्हणाली होती. सध्या लग्नाचा कोणताही प्लॅन नसून लग्न करणार असेल तेव्हा मी नक्की सांगेन आणि लग्नाचं आमंत्रणही देईन असंही तिने सांगितलं आहे. प्रेम आपल्यासाठी महत्त्वाचं असून आपला प्रेमावर विश्वास असल्याचंही तिने सांगितलं होतं.  सध्या अंकिताचे चाहते तिच्या आणि विकीच्या लग्नाची वाट पाहत आहेत हे नक्की. त्यामुळे आता अंकित आणि विकी आपल्या लग्नाची नक्की कधी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram


अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल


मणिकर्णिकामधील 'झलकारी बाई' साकारण्यासाठी अंकिता लोखंडेनं घेतलं 'हे' खास प्रशिक्षण


तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई