DIY सौंदर्य

फ्रुट क्युबस बनवा आणि मिळवा सुंदर त्वचा

Leenal Gawade  |  Oct 5, 2021
फ्रुट्स क्युबचा असा करा वापर

व्हिटॅमिन्सनी युक्त असलेल्या फळांमध्ये असे काही घटक असतात जे त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरतात. फळांचा वापर प्रत्यक्ष करता येत नसेल तर त्यांचे क्युब्स तयार करुन तुम्ही त्याचा वापर त्वचेसाठी करु शकता. फळांचा अर्क काढून तो त्वचेला लावायचे म्हटले की, खूपच कष्ट पडते. पण त्यापेक्षा तुम्ही जर एकदाच फळांचा रस काढून तो अशापद्धतीने साठवून ठेवला तर त्याचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. मुळात बर्फ आणि फळांचा रस असे दुहेरी फायदे तुम्हाला यामुळे मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही सुंदर त्वचा हवी असेल तर कोणत्या फळांचे फ्रुट क्युबस तुम्ही बनवायला हवे ते जाणून घेऊया.

पपई

Instagram

व्हिटॅमिन्स C ने युक्त असे पपई हे फळ तुम्हाला इन्स्टंट ग्लो देण्यासाठी फारच फायद्याचे आहे. त्यासाठी पपई खाल्ल्यानंतर सालांना लागलेला किंवा उरलेला गर काढून तो चांगला स्मॅश करा. आईस ट्रेमध्ये हा गर घालून तो सेट करायला ठेवा. हल्ली बाजारात लहान लहान आईस ट्रे मिळतात. त्यामध्ये तुम्ही हा गर सेट करु शकता. ज्यावेळी तुम्हाला बाहेर जायचे आहे त्याच्या आदल्या रात्री सगळ्या विधी करुन झाल्यानंतर चेहऱ्याला पपईचा क्युब चोळत राहा. त्यामुळे चेहऱ्याला चमक मिळते. थकवा दूर होतो आणि थंडाव्यामुळे त्वचा टोन्ड होण्यास मदत मिळते. 

या फळांच्या साली आरोग्यासाठी असतात फायदेशीर

कलिंगड

त्वचेला थंडावा देण्यासाठी जर तुम्हाला काही मसाज करायचा असेल तर तुम्ही कलिंगडाचा उपयोग करु शकता. कलिंगडाचा गर आणि त्यामध्ये असलेले पाणी बऱ्यापैकी राहते. ते फेकून न देता तुम्ही कलिंगडाचा रस ट्रेमध्ये सेट करायला ठेवा. कलिंगडाचा रस चांगला सेट झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करु शकता. खूप थकवा चेहऱ्यावर आला असेल आणि त्वचेवरील तजेला कमी झाला असेल तर तुम्ही कलिंगडाचा क्युब चेहऱ्यावर लावू शकता.

स्ट्रॉबेरी

Instagram

अँटीऑक्सिडंट घटक असलेले स्ट्रॉबेरी हे देखील त्वचेसाठी फारच फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरीचा सीझन असेल त्यावेळी तुम्ही स्ट्रॉबेरीचा क्रश घेऊन तुम्ही त्याचे क्युब बनवायला घ्या. त्यासाठी स्ट्रॉबेरी हाताने क्रश करायला घ्या. ते क्रश केल्यानंतर तुम्हाला ते ट्रेमध्ये ओतायचे आहे. त्यानंतर तयार क्युब्स घेऊन तुम्ही चेहऱ्याला चोळावे. पिंपल्स किंवा त्चचेवर सुरकुत्या आल्या असतील तर तुम्ही हे क्युब त्वचेला लावू शकता. त्यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत मिळेल .

फ्रुट्स क्युबचे फायदे व उपयोग

फ्रुट्स क्युब बनवत असाल तर त्याचे फायदे जाणून घेणेही गरजेचे आहे.  तसेच त्याचा वापर कसा करायचा ते देखील जाणून घेऊया 

  1. फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि घटक त्वचेला मिळतात. 
  2. स्टोअर किंवा बर्फ सेट केल्यामुळे बर्फाचा फायदा हा त्वचेला मिळतो. बर्फामुळे त्वचेवरील पोअर्स कमी होण्यास मदत मिळते. 
  3. फ्रुट्स क्युबचा वापर आठवड्यातून एकदा तरी करायला हवा. त्यामुळे त्वचेला आराम मिळण्यास मदत मिळते. 

आता तुमच्यासाठी फ्रुट क्युब्सचा नक्की वापर करा.

बर्फाच्या पाण्याने धुवा चेहरा, जाणून घ्या फायदे

Read More From DIY सौंदर्य