आरोग्य

जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या नवमातांनी कोणती फळे खावी

Trupti Paradkar  |  Mar 31, 2020
जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या नवमातांनी कोणती फळे खावी

बाळंतपणानंतर प्रत्येक आईसाठी बाळाचं संगोपन हेच प्रथम प्राधान्य असतं. स्तनपान हे बाळाच्या योग्य वाढ आणि विकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आईच्या दूधातून बाळाचं पोषण आणि विकास योग्य पद्धतीने होते. म्हणूनच बाळाला कमीत कमी सहा महिने स्तनपान देण्याचा सल्ला प्रत्येक नवमातेला दिला जातो. एवढंच नाही तर स्तनपान देणाऱ्या मातेचा आहारदेखील बाळासाठी पोषक असाच असावा. आहारात नेहमीच फळांना एक महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. कारण फळांमधील पोषकतत्वं प्रत्येकासाठी महत्त्वाची असतात. यासाठी जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या मातेने कोणती फळे खावीत आणि कोणती फळे खाऊ नयेत. 

स्तनपान देणाऱ्या मातेने कोणती फळे खावी –

स्तनपानाच्या काळात मातेच्या स्तनात पुरेसं दूध निर्माण होणं गरजेचं असतं. यासाठी स्तनपान देणाऱ्या मातेच्या आहारात ही फळं असायलाच हवी. 

पपई –

पपई हे एक सुपरफ्रूट आहे. कारण यामध्ये अनेक पोषकतत्वं दडलेली आहेत. फायबर्स आणि मिनरल्स भरपूर असल्यामुळे पपई खाणं सर्वांच्याच फायद्याचं आहे. मात्र स्तनपान देणाऱ्या मातेने कच्चा पपई खाल्यास तिला चांगला फायदा होऊ शकतो. कारण कच्च्या पपईमध्ये Galactagogues भरपूर असतं. ज्यामुळे नवमातेच्या स्तनांमध्ये भरपूर दुधाची निर्मिती होते. यासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांनी कच्चा पपई स्मूदी अथवा सॅलेडच्या स्वरूपात जरूर खावा. 

Shutterstock

केळी –

केळ्यात भरपूर फायबर्स  असल्यामुळे ते पचनासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. बऱ्याचदा बाळंतपणानंतर महिलांना बद्धकोष्ठतेचा  त्रास जाणवतो मात्र केळं खाण्यामुळे तुमची ही समस्या कमी होऊ शकते. शिवाय केळ्यामधील पोटॅशियम आणि इतर पोषक घटकांमुळे स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला चालना मिळते. म्हणून केळ्याचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा. 

Shutterstock

अंजीर –

अंजीरमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. शिवाय अंजीर हे फायबर्स भरपूर असल्यामुळे पचनासाठी उपयुक्त असं फळ आहे. अंजीरमधील व्हिटॅमिन्स के आणि बी 6 मुळे नवमातेचं चांगलं पोषण होऊ शकतं. ज्यामुळे तिच्या अंगावरील दुधात वाढ होते. 

Shutterstock

चिकू –

चिकूमध्ये इतर फळांपेक्षा सर्वात जास्त कॅलरिज असतात. ज्यामुळे ते स्तनपान  करणाऱ्या महिलांसाठी उत्तम फळ आहे. बाळंतपण आणि स्तनपान यामुळे तुमच्या शरीराची झालेली झीज चिकू खाण्यामुळे भरून निघू शकते. म्हणूनच हेल्दी राहण्यासाठी बाळंतपणानंतर महिलांनी चिकूचा आहारात समावेश करणं फार गरजेचं आहे.  

वाचा – गरोदर पहिला महिना लक्षणे

Shutterstock

अॅवोकॅडो –

अॅवोकॅडो हे सर्वात जास्त पोषक घटक असलेलं एक फळ आहे. भारतीय नसलं तरी आजकाल भारतातील सर्व बाजारपेठेत ते सहज उपलब्ध आहे. जर तुम्ही नवमाता असाल तर तुमच्या बाळाच्या पोषणासाठी तुम्ही अॅवोकॅडो खाणं गरजेचं आहे. अॅवोकॅडोमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे तुमचे पोषण चांगलं होतं. शिवाय यामुळे तुमच्या बाळाच्या केसांची वाढ, दृष्टी आणि ह्रदयाचा विकास चांगला होतो.

Shutterstock

याचप्रमाणे नवमातांनी काही  फळे चुकूनही काही दिवस खाऊ नयेत. ही फळं पोषक असली तरी स्तनपानाच्या  काळात ती तुमच्या आहारासाठी योग्य नाहीत. तेव्हा लिंबू, चेरीज, किवी, स्टॉबेरीजसारखी फळं या काळात खाणंच योग्य राहील.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत ‘हे’ ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

Read More From आरोग्य