Diet

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

Trupti Paradkar  |  Aug 17, 2020
वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

अळीवच्या बिया आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. अळीवच्या बियांना काही लोक हलीम असंही म्हणतात. बऱ्याचदा बाळंपणात अथवा थंडीच्या दिवसांमध्ये अळीवचे लाडू केले जातात. अळीव पेज आणि मिठाईच्या पदार्थांमध्येही वापरले जातात. अळीवाने फक्त तुमचे वजन कमीच होते असं नाही तर नियमित अळीव आहारात असेल तर तुमचे वजन पुन्हा वाढतही नाही. अनेक आरोग्य तज्ञ्जही वजन कमी करण्यासाठी आहारात अळीव समाविष्ठ करण्याचा सल्ला देतात. हलीममुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय अळीवमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे वजन लवकर आणि योग्य पद्धतीने कमी होते आणि सोबत शरीराचे पोषणही होते. 

Instagram

अळीवामधील पोषक घटक-

अळीवाच्या बियांमध्ये कॅलशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, प्रोटिन्स, लोह, फॉलिक अॅसिड आणि फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. यामध्ये असलेल्या या पुरेशा पोषक मुल्यांमुळे तुमचे पोट सतत भरलेले आणि शांत राहते. ज्यामुळे तुम्हाला  वारंवार भुक लागत नाही. तुमच्या भुकेचे हॉर्मोन्स अळीवामुळे संतुलित राहतात. अती प्रमाणात न खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. शिवाय या मध्ये असलेल्या प्रोटिन्समुळेही तुमचे वजनही कमी होण्यास मदत होते.

Instagram

वजन कमी करण्यासाठी अळीवाचा वापर-

अळीवाचा वापर बऱ्याचदा दूध, खीर, पेज, लाडू, मिठाई यात केला जातो. मात्र वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही गोडावर नियंत्रण ठेवणार असाल तर तुम्ही अळीव यापेक्षा जरा निराळ्या पद्धतीने नक्कीच खाऊ शकता. आधीच सांगितल्या प्रमाणे नारळाचे पाणी अथवा सॅलेडमधून तुम्ही अळीव आहारात घेऊ शकता. सॅलेड आणि अळीव हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन ठरेल. कारण यामुळे तुमच्या पोटात पुरेसे फायबर्स जातील. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न पचण्यास मदत होईल अर्थात जास्तवेळ ते तुमच्या पोटात राहील्यामुळे तुमची भुक शांत राहील आणि तुम्ही अयोग्य आहार घेणार नाही.ज्यामुळे याचा फायदा तुम्हाला वेटलॉस करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी तुमच्या हेल्दी ड्रिंक्स, ज्युस, स्मूदी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये या सुपरसिड्सचा जरूर समावेश करा. अळीवामध्ये फॅट्सचे प्रमाण जवळजवळ नगण्य आहे. 

अळीवाचे फायदे –

अळीवाच्या बिया लालसर रंगाच्या आणि अंडाकृती आकाराच्या असतात. डायरिया, कफ, अस्थमा या आजारांव अळीव फायदेशीर ठरतं. कारण ते शक्तीवर्धक आणि पोषक असते. बाळंतपणानंतर अळी व खाण्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांच्या दुधात वाढ होते. अळीवामुळे मधुमेह, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता या सारख्या आरोग्य समस्या नियंत्रित राहतात. अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अॅनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांना अळीवाचा चांगला फायदा होऊ शकतो. अळीव या तेलबिया असल्यामुळे त्यांच्या  सेवनाने अनेक त्वचारोगही बरे होऊ शकतात. मात्र ते उष्ण असल्यामुळे गर्भवती महिलांनी अळीवाचे सेवन करू नये कारण अळीवामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

जाणून घ्या कलौंजीचे आरोग्यदायी फायदे (Benefits of Black Seeds In Marathi)

वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर घरगुती उपचार (Home Remedies For Frequent Urination)

लवंग आहे औषधीय, लवंग खाण्याचे फायदे काय आहे जाणून घ्या (Lavang Benefits)

Read More From Diet