Fitness

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

Dipali Naphade  |  May 12, 2019
दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

आपल्या सगळ्यांना सर्वात जास्त काय महत्त्वाचं आहे आयुष्यात तर नक्कीच सर्वात पहिलं उत्तर असेल…झोप. खरं आहे ना. रात्री झोपूनही दिवसभरदेखील तुम्हाला जर झोप येत असेल तर ही नक्कीच एक समस्या आहे. तुम्ही घरी असलात किंवा ऑफिसमध्येही कोणतंही काम करत असाल आणि सारखी झोप येत आहे का? तर ही नक्कीच एक दिवसाची समस्या नाही. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या वेळी झोप येण्याची अनेक कारणं असू शकतात. पण तुम्ही जर रात्री व्यवस्थित झोपत असाल तरीही तुम्हाला दिवसभर झोप येत असेल तर नक्कीच तुम्हाला कोणता तरी आजार होण्याची शक्यता आहे. कमी झोप घेणं हे ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही तसंच खूप झोप येणंदेखील आपल्या आरोग्याला हानीकारक आहे. जाणून घेऊया यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स ज्यामुळे झोपेची समस्या सुटू शकेल.  

खाण्यापिण्याकडे द्या असं लक्ष

तुम्हाला रोज जर 7 ते 8 तास झोप येत असेल आणि तरीही दिवसभर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशावेळी शाकाहारी खाण्यावर भर द्यावा. तेही अतिशय संतुलित प्रमाणात हे खाणं गरजेचं आहे. भाजी जास्त शिजवू नका, थोड्या कच्च्याच राहू द्याव्यात. आयुर्वेदानुसार, जेव्हा तुम्ही जेवण शिजवता तेव्हा त्यातील सर्व ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळेच तुमचं शरीर अधिक आळशी होतं. तसंच तुम्ही रोज ताजी भाजी आणि ताजी फळं जास्तीत जास्त खावे. हे नियमित केल्यास, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.

चांगली झोप कशी मिळवावी याबद्दल देखील वाचा

रोज व्यायाम करा

तुम्ही आळशी असणंं हेदेखील याचं महत्त्वाचं कारण आहे. हा आळस काढून टाकण्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं आवश्यक आहे. रोज सकाळी वज्रासन करा आणि त्याचे फायदे जाणून घ्या. रोज चालण्याचा व्यायाम करा आणि थोडफार वॉर्मअपदेखील करा.  यामुळे तुमची झोप आणि आळस दोन्ही दूर होतील आणि तुम्ही मन लाऊन काम करू शकाल.

जेवल्यावर लगेच झोपू नका

जेवल्यावर लगेच बेडवर झोपू नका. असं केल्यामुळे शरीरावर चरबीबरोबरच सुस्तीदेखील वाढते. झोपण्यापूर्वी जेवण पचवण्यासाठी थोडा वेळ द्या. असं केल्यामुळे तुम्ही दिवसभर झोप येण्यापासून आणि जांभई देण्यापासून वाचू शकता.

चांगली झोप कशी मिळवायची ते देखील वाचा

झोप जबरदस्तीने रोखू नका

तुम्ही जर झोप जबरदस्तीने रोखलीत तर, तुमची शारीरिक आणि मानसिक कार्य थांंबतील. त्यामुळे तुम्ही असं करणं योग्य नाही. आपल्या शरीरासाठी तुम्हाला भरपूर झोप घ्यायला हवी. वास्तविक आपल्या शरीराला किती झोपेची आवश्यकता आहे हे तुम्ही किती काम करता यावर अवलंबून आहे. तुम्ही जितकी मेहनत करता त्याच हिशोबात जेवण आणि झोप या दोन्ही गोष्टी किती घ्यायला हव्यात हे ठरवायला हवं. असं केल्यास तुम्हाला सकाळी कोणत्याही प्रकरचा गजर लावायची गरज नाही आणि दिवसभर तुमची झोपही कमी होईल.

बडिशेपचं पाणी आहे फायदेशीर

साधारणतः 10 ग्रॅम बडिशेप ही अर्धा लीटर पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी जेव्हा उकळून पाव लीटर पाणी राहिल्यावर त्यात थोडंसं मीठ घालून सकाळ संध्याकाळ प्या. यामुळे झोप येणं कमी होईल आणि तुमचा आळसदेखील कमी होईल.

तुम्हाला हायपरसोम्निया तर नाही ना?

तुमचं रूटीन योग्य असेल आणि तुम्ही रोज 8 तास व्यवस्थित झोप घेत असाल आणि तरीही तुम्हाला सतत झोप येत असेल तर ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सतत झोप येणं हा एक आजार असण्याची शक्यता आहे, ज्याला हायपरसोम्निया असं म्हटलं जातं. यामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत झोप येत असण्याचा त्रास असतो. बऱ्याचदा अशी व्यक्ती बसल्या बसल्या झोपू शकते आणि या व्यक्तींना गाढ झोपही लागते.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

#WorldSleepDay : ‘या’ कारणामुळे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची असते गरज

 

Read More From Fitness