अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. या दिग्गज कलाकारांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे.
(वाचा : अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला…)
अभिनयाची जुगलबंदी
‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर सिनेमाची कहाणी आधारित आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. त्यात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांचाही समावेश आहे. हे दोन्ही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या इन्स्ट्टियूट ऑफ पावटॉलॉजीमध्ये मांडण्यात आला आहे.
(वाचा : ‘अर्जुन रेड्डी’सोबत काम करण्यास करण जोहर उत्सुक, दिली मोठी ऑफर)
‘सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं आहे.
(वाचा : सायना नेहवालच्या घरी पोहोचली परिणिती चोप्रा, आलू पराठ्यांवर मारला ताव)
त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीतील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल, असं सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी सांगितलं.
(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत)
प्रसाद नामजोशी यांनी यापूर्वी ‘रंगा पतंगा’ आणि ‘व्हिडिओ पार्लर’, तर सागर वंजारीनं ‘रेडू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या दोघांच्याही सिनेमांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
सिनेमाचं पोस्टर लाँच
काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आले होते. पोस्टरमध्ये एका फळ्यावर (blackboard) सिनेमाचं नाव लिहिले दाखवले गेले आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
हे देखील वाचा :
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade