मनोरंजन

Good News: जय भानुशाली झाला बाबा.. घरी आली नन्ही परी

Leenal Gawade  |  Aug 20, 2019
Good News: जय भानुशाली झाला बाबा.. घरी आली नन्ही परी

सेलिब्रिटी कपल जय भानुशाली आणि माही वीज आई-बाबा झाले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. काहीच दिवसांपूर्वी जयला तुला काय हवं? असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने मुलगी हवी असल्याचे सांगितले होते. त्याची हीच इच्छा पूर्ण झाली असून त्याच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. त्याने त्याच्या मुलीचा Cute फोटोही शेअर केला आहे.

Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’

माही आणि जयचा आनंद गगनात मावेनासा

instagram

माही आणि जय हे असं सेलिब्रिटी कपल आहे जे अनेकांना आवडतं. ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमधून त्यांनी केमिस्ट्री सगळ्यांनाच पाहायला मिळाली होती.या दोघांच्या लिंक अपच्या चर्चा फार आधीपासूनच होत्या. 2011 साली या दोघांनी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण  होतील. आणि त्यांच्या नात्याला 10 वर्ष…त्यांच्या आयुष्यातील या नव्या व्यक्तीच्या येण्याने दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या दोघांनी काही खास फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. दोघांनी एकच फोटो शेअर केला असला तरी या नव्या पाहुण्याप्रती असलेली वेगवेगळी भावना व्यक्त करुन दाखवली आहे. 

Good News : अनुष्का – विराटच्या घरी येणार नवा पाहुणा

मे मध्ये दिली होती गोड बातमी

Instagram

जय भानुशाली आणि माही वीज यांनी त्यांच्याकडे नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी मे महिन्यात एका पोस्टच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये माही वीजचे जन्म वर्ष आणि जय भानुशालीचे जन्मवर्ष आणि त्यापुढे 2019 मध्ये दोन लहान बुटांचे जोड ठेवण्यात आले होते. हा एक फोटोच त्यांच्या फॅन्सना गोड बातमी कळण्यास पुरेसा होता. 

जयला हवी होती मुलगी

Instagram

जय भानुशाली शुटींगमध्ये व्यग्र असला तरी तो माही वीजला योग्य वेळही देत होता. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून ही दोघांची जबाबदारी होती. त्यामुळे जयच्या इन्स्टाग्रामवर माहीचे फोटो आणि व्हिडिओ कायमच दिसायचे. त्यामुळे तिच्या फॅन्सना ती अगदी सुदृढ असल्याची माहिती मिळत होती. तिचा 9 महिन्यांच्या प्रवासात ती जयपासून कधीही दूर गेली नाही. जयला ताय हवे असे विचारण्यात आल्यावर त्याने मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. आता जयची हीच इच्छा पूर्ण झाली आहे.

Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर

माहीने घेतला ब्रेक

जर तुम्ही माहीचा करीअर ग्राफ विचाराल तर तिने आतापर्यंत फार मालिकांमध्ये काम केले नाही. तिने तिच्या करीअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. ‘तू तू है वही’ या रिमिक्स गाण्यामध्ये माही दिसली होती. त्यानंतर ती दिसली मालिकेत. ‘लागी तुझसे लगन’ या मालिकेत तिने नकुशाची भूमिका साकारली होती. तिला या मालिकेत कुरुप दाखवण्यात आले होते. त्यानंतर ती रिअॅलिटी शोमध्ये दिसली. लाल इश्क, झलक दिखला जा, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यामध्येही ती दिसली होती.

जय सध्या सुपर सिंगरमध्ये व्यग्र

जय सध्या सुपर सिंगरचे होस्टींग करत आहे. कयामत या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेतून तो पुढे आला.त्याने अभिनयासोबतच होस्टींगची जबाबदारी चांगली पेलली. त्याने हेट स्टोरी 2, लिला, देसी कट्टे या चित्रपटांमधून काम केले आहे. 

आता या गोड कपल्सच्या घरात गोड परी आली म्हटल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असणार हे मात्र नक्की!

Read More From मनोरंजन