केस

केसांच्या या ॲसेसरीजमुळे केसांना होऊ शकते दुखापत

Leenal Gawade  |  Nov 8, 2021
केसांसाठी या ॲसेसरीज वापरु नका

सुंदर केस हे आपल्या सगळ्यांना आवडतात. केसांची काळजी घेण्यासाठी आपण केसांसाठी चांगले प्रॉडक्ट आणि केसांची निगा राखतो. केस सुंदर दिसण्यासाठी किंवा ते फ्लॉन्ट करण्यासाठी आपण केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करत असतो. केसांच्या हेअरस्टाईल करताना आपण केसांच्या ॲसेसरीज वापरत असतो. केसांच्या काही ॲसेसरीज या केसांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे केसांना दुखापत होऊ शकते. अशावेळी कोणत्या हेअर ॲसेसरीज नेमक्या वापरु नयेत हे आपण जाणून घेऊया.

रबर बँड

केस बांधण्यासाठी खूप जण रबर बँडचा वापर करतात. काही रबर बँड केसाला लावल्यामुले केस तुटण्याची शक्यता असते. केसांना रबर बँड लावल्यामुळे केस तुटतात. त्यामुळे बाजारात केस न तुटणाारे आणि केसांना हानी न पोहोचवणारे रबर बँड अजिबात वापरा. जे केसांना चांगले ठेवतात. त्यामुळे केसांसाठी चांगले रबर वापरा. केसांना रबर लावल्यानंतर असे रबर पटकन काढू नका. त्यामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. आता रबर बँड वापरताना तुम्ही केसांची काळजी घ्यायला हवी.

टिकटॅक पीन्स

टिकटॅक पीन्स

केसांसाठी टिकटॅक पीन्स हे देखील कधीकधी त्रासदायक ठरु शकतात. अनेकदा केसांमध्ये या पीना अडकतात. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टिकटॅक पीन्सचा वापर करताना तुम्ही कोणत्या पीना निवडायला हव्यात ते देखील जाणून घेऊया. टिकटॅक पीन्सचा खूप जण अगदी रोजच्या रोज करतात. या पीन्स लावल्यानंतर केस तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे पीन्स न वापरलेले बरे!  जर तुम्हाला अशा पीन्स वापरायच्या असतील तर तुम्ही या पीन्स वापरुन झाल्यानंतर तुम्ही अगदी अलगद काढा.

हेअर बँड

केसांना खूप जणांना हेअर बँड लावायला आवडते. केसांसाठी हेअर बँड लावल्यानंतर अनेकदा हेअर लाईन मागे जाण्याची शक्यता असते. बाजारात वेगवेगळे हेअर बँड मिळतात. कपड्याचे असलेले हेअरबँड हे केसांना लावल्यानंतर हेअरलाईन मागे जाण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नाही तर त्यामुळे केस तुटतात देखील. त्यामुळे हेअर बँड लावतानाही तुम्ही नेमका कोणता आणि किती वेळासाठी लावावा हे पाहा.

यावेळी लावू नका ॲसेसरीज

केसांसाठी ॲसेसरीज वापरायच्या असतील तर त्याचा त्रास केसांना कसा होऊ शकतो हे आपण जाणून घेतले आहे. पण केसांसाठी त्याचा वापर कधी करु नये हे जाणून घेऊया 

  1. ओल्या केसांवर कधीही कोणत्या ॲसेसरीज वापरु नका. कारण त्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. 
  2. केसांवर मशीन्स किंवा कोणतीही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही केसांवर ॲसेसरीज लावताना केसांची काळजी घ्या. 

आता केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या काही गोष्टी लक्षात ठेवा.

अधिक वाचा

लांबसडक आणि घनदाट केस हवे मग आजच बदला या सवयी

निरोगी केसांसाठी करा घरगुती हेअर मास्कचा उपयोग

औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठीत | Medicinal Plants Information In Marathi

Read More From केस