सौंदर्य

तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

Leenal Gawade  |  Mar 22, 2019
तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

‘पूर्वी माझे इतके केस गळत नव्हते. पण आता या नुसते  केस विंचरले तरी कंगव्यासोबत इतके केस येतात की, आता मला टक्कल पडेल की काय? किती चांगली तेल लावली तरी केसांवर काहीच फरक पडला नाही.फक्त पैसे फुकट गेले.’ अशा केसगळतीच्या तक्रारी महिला अनेकदा करत असतात. पण केस गळण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न ते कधीच करत नाही. तुम्ही २१ वर्षांचे असतानाचे केस आणि तिशी उलटल्यानंतरचे केस यामध्ये फरक पडत जातो. वयोमानानुसार तुमच्या शरीरात जितके बदल होतात. त्या सगळयाचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर होतो. आता अशा परिस्थितीला काही जणी अपवादही असतील कारण अनेक महिलांचे केस त्यांची पन्नाशी आली तरी चांगले असतात.  त्यांचे केस चांगले असण्यामागे असतो त्यांचा संतुलित ‘आहार’. आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी काय खायला हवे हे सांगणार आहोत.

तुम्ही काय खाता?

नोकरदार महिला, गृहिणी किंवा अगदी शाळा कॉलेजांमध्ये जाणाऱ्या मुलींना केसगळती होते. त्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्हाला विचार करायचा आहे तर तो तुम्ही काय खाता ? याचा.. कारण सध्याच्या फास्ट फूडच्या युगात अनेक महिलांना बाहेर खाण्यावाचून इलाज नसतो. त्यामुळे चमचमीत, तेलकट, तिखट असे पदार्थ खाल्ले जातात. ज्यातून शरीराला कोणतीही पोषकतत्वे मिळत नाही. साहजिकच तुमच्या केसांनाही त्याचा काहीच फायदा होत नाही.त्यामुळे तुम्हाला हे खाणे बंद करायचे आहे असे आम्ही सांगणार नाही पण ते कमी करुन त्यासोबत तुम्हाला काही चांगल्या गोष्टी खायला घ्यायच्या आहेत.

केस वाढवण्यासाठी आवश्यक आहार (Foods For Hair Growth In Marathi)

केसांच्या वाढीसाठी काय आवश्यक?

जर तुम्ही केसांच्या वाढीबाबत विचारत असाल तर केसासाठी व्हिटॅमिन  A, E, B(5), C, D आवश्यक असतात.यासोबतच ओमेगा ३, लोह आणि प्रोटीन आवश्यक असतात. (आता तुम्हाला यातून फार काही कळालं नसेल)

आता वळूया केसांसाठीच्या आहाराकडे

केसांसाठी सगळ्यात आवश्यक आणि महत्वाचे आहे ‘अंडी आणि दूध’.  दूधामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन असते जे शरीरासाठी आवश्यक असते. तर अंड्यामध्ये बायोटीन आणि प्रोटीन असते जे तुमच्या केसांना आवश्यक असते.उकडलेली अंडी, अंड्याची भुर्जी, अंड्याचे आम्लेट, अंड्याची कढी अशा कोणत्याही स्वरुपात तुम्ही अंडी खाऊ शकता.खूप जणांना दूध आवडत नाही.अशांनी मिल्कशेक, फ्लेवर पावडर घालून दूध प्यायला काहीच हरकत नाही.

मासिक पाळीत तुम्हालाही होतोय त्रास, मग करा हे उपाय

*जर तुम्ही शाकाहारी असाल तर दुधाचे सेवन करा. सकाळी आणि रात्री झोपताना एक ग्लासभर दूध प्या.

व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे तुम्हाला कोंडा होण्याची शक्यता जास्त असते. कोंडाही केसगळतीचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे रताळी,गाजर, भोपळा, पालक तुमच्या आहारात असू द्या. या शिवाय अंडी आणि लीव्हर कॉड ऑईललच्या गोळ्या शक्य असल्यास घ्या.

व्हिटॅमिन C तुमच्या शरीरासाठी किती आवश्यक आहे ते या आधीही आम्ही तुम्हाला सांगितले आहे. पण केसाच्या वाढीसाठीही व्हिटॅमिन C आवश्यक आहे. आवळा, संत्री.मोसंबी, लिंबू यांचे आहारात सेवन असू द्या.

उदा.  आवळा जर तुम्हाला नुसता खाणे शक्य नसेल. तर आवळ्याचा मोरावळा करुन खाल्ले तरी चालेल.काही गोड खायचे झाले तर मोरावळा तोंडात टाका.

७ दिवसात २ ते ६ किलो वजन कमी करेल असा डाएट प्लॅन

 केसांच्या वाढीसाठी मासे उत्तम काम करतात. माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेला ग्लो आणतातच शिवाय तुमचे केस वाढवण्यासही मदत करतात. कोळंबी, हलवा, बोबींल, पापलेट, शिंपल्या, खेकडे असे मासे खा. आठवड्यातून तीन वेळा मासे खा.

*माशांच्या बाबतीत सांगायचे झाले तर तळलेल्या माशांपेक्षा माशाची कढी जास्त खा.

केसांसाठी बकऱ्याचे मटण आणि कोंबडीचे चिकनही चांगले असते. पण तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल तर तुम्ही मटण आणि चिकन जास्त खाऊ नका.  त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते. ज्याचे विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात.

जर तुम्ही मासांहारी नसाल तर तुमच्यासाठीही  पर्याय . मासांहारी लोकांचे चिकन म्हणजे सोयाबीनची ओळख आहे. आहारात सोयाबीनचे फायदे आहेत. त्यामुळे याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात करू शकता. काहीजण गहू दळायला देताना त्यात सोयाबीन घालतात. याशिवाय सोयाबीनची ओली आणि सुकी भाजी, सोयाबीनचा पुलाव करुन खातात. तुम्ही सोयाबीन खात नसाल तर असे खाऊन पाहा.

तुम्हाला चमचमीत भाज्या आवडत असतील तर थोडे थांबा. कारण तुमच्या केसांसाठी तुम्हाला पालेभाजी खाणे मस्ट आहे. त्यामुळे तुम्ही चमचमीत भाजीसोबत पालेभाजीच खा. पालक, मेथी, लाल माठ,मुळा, शेपू या सगळ्या भाज्या आवडत नसतील तर केसगळती रोखण्यासाठी खा.

तुमच्या केसांसाठी बी जीवनसत्वे आवश्यक असतात. बदामामध्ये बी जीवनसत्व असते. याशिवाय सीफूड, हिरव्या भाज्या, अंडी यांच्यामध्येही बी जीवनसत्व असते.

केस पुन्हा येण्यासाठी गंंवाकुरही चांगले असते. तुम्हाला शक्य असेल तर गंवाकुर घरीच उगवा. अन्यथा जर तुम्हाला गंवाकुराचा रस रेडिमेड हवा असेल तर Wheatgrass Shots हा रस खरेदी करा. नाश्ता करण्यासाठी तुम्ही हा रस घेऊ शकता.

 हे टाळा

१. केसांना तेल लावत असाल तर ते दोन ते तीन दिवस डोक्यावर ठेऊ नका. त्यावर धूळ, माती जमा झाली की, तुमचे केस गळू लागतात.

२. केस धुतल्यानंतर लगेचच विंचरल्यामुळे केस तुटतात.

३. सतत केस धुणे टाळा. माईल्ड शँम्पूचा वापर करा.

४.केसांमध्ये घाम सुकवू नका. 

५. सतत कोंडा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यावर तातडीने इलाज करा.

Read More From सौंदर्य