Care

कोरोनामधून बरं होताना गळत असतील केस तर करा हे उपाय

Trupti Paradkar  |  May 9, 2021
कोरोनामधून बरं होताना गळत असतील केस तर करा हे उपाय

कोरोना संक्रमणाचा परिणाम आरोग्याप्रमाणेच शरीरातील अनेक अवयवांवर होतो. जसं की कोरोनामधून बरं होताना अशक्तपणामुळे मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. कोरोनाची लागण झाल्यानंतर रिकव्हर होणाऱ्या अनेकांमध्ये अशी लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाची प्रत्येक व्यक्तीवर निरनिराळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कोरोनाच्या काळात केस का गळतात याचे नेमके कारण कोणीच सांगू शकत नाही. ताप अथवा अशक्तपणामुळे केसांवर दुष्परिणाम होत असावा.  यासाठीच अशा लोकांनी घरीच घरगुती उपचार करावे ज्यामुळे त्यांचे केस गळणे कमी होईल. 

कोरोनातून बरं होताना केस गळण्यावर काय उपचार करावे –

कोरोनाच्या काळात केस का गळतात याचे कारण  जरी त्यावर घरगुती उपचार नक्कीच करता येऊ शकतात. कारण या उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. 

लसूण, कांदा आणि आल्याचा रस

कोरोनातून बरं होताना मोठ्या प्रमाणावर केस गळत असतील तर केसांना आलं, लसूण आणि कांद्याचा रस एकत्र करून लावा. हा रस लावल्यावर कमीत कमी एक ते दोन तास तो केसांमध्ये तसाच ठेवा. या तीनही पदार्थांमधील घटक पदार्थ या रसामध्ये असतात. ज्यामुळे केस गळणे कमी होऊन केसांची वाढ चांगली होते. 

नियमित हेअर ऑईल मसाज करा –

केस गळणे कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे केसांना नैसर्गिक तेल लावणे. नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल अशी नैसर्गित तेल केसांना लावून मसाज केल्यामुळे केसांचे पोषण कमी होते. ताप आणि अशक्तपणामुळे केसांचे पोषण कमी होते ज्यामुळे केस तुटक होतात आणि गळू लागतात. मात्र केसांना योग्य पद्धतीने तेलाने मसाज केल्यामुळे केसांना पुन्हा नैसर्गिक चमक मिळते. केस मजबूत झाल्यामुळे त्यांचे गळणे कमी होते.

हिना आणि मेथी पावडरचा करा वापर –

कोरोनामधून बरं होताना केस गळत असतील तर तुम्ही केसांवर केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्टचा वापर करता कामा नये. कारण अशा उत्पादनातील केमिकल्स केस आणि तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचे नाहीत. अशा वेळी केसांचे पोषण करण्यासाठी हिना, मेथी पावडर अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे फायद्याचे ठरेल. यासाठी एका भांड्यात हिना आणि मेथी पावडर मिसळून पाणी टाकून छान पेस्ट तयार करा आणि केसांच्या मुळांना ती लावा. वीस मिनीटांनी केस साध्या पाण्याने धुवा.

आहाराकडे लक्ष द्या –

तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि शरीरातील प्रत्येक अवयवांवर होत असतो. केसांच्या वाढीसाठी प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम गरजेचे असते. यासाठीच आहारात या घटक पदार्थ असलेल्या गोष्टींचा समावेश करा. अंडी, दूध, दही, मासे, कडधान्ये, सुकामेवा, पालेभाज्या खाण्यामुळे तुमच्या केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. केसांच्या वाढीसाठी या पदार्थांमधील अमिनो अॅसिड उपयुक्त ठरते. बऱ्याचदा अशक्तपणामुळे झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात अथवा पांढरे होतात. यासाठीच आहारात लोहयुक्त पदार्थ असायला हवेत. 

ताणतणावापासून दूर राहा –

केस गळण्यामागचे महत्त्वाचे कारण ताणतणाव देखील असू शकते. कारण ताणाचा थेट परिणाम  तुमच्या शरीरा आण केसांवर होतो. कोरोनाच्या काळात सतत वाटणाऱ्या भीतीमुळे हा ताण वाढू शकतो. कोरोना झालेल्या लोकांची अवस्था तर फारच बिकट असते. यासाठीच कोरोनातून बरं होताना ताणतणाव दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. योगासने, मेडिटेशन, नामजपामुळे तुमच्या मनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. 

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणं

केस ब्लीच करणं सुरक्षित आहे का

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा आंब्याची पाने

Read More From Care