Diet

हृदयरोग ते त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय, रोज खा हिरवे मटार

Harshada Shirsekar  |  Jan 10, 2020
हृदयरोग ते त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय, रोज खा हिरवे मटार

मटार पनीर, बटाटा मटार पनीर यांसारख्या भाज्यांची चव वाढणाऱ्या हिरव्या मटाराचं हिवाळ्यात सर्वाधिक सेवन केलं जातं. बऱ्याच जणांना कच्चे मटार खाण्याचीही सवय असते. हिरव्या मटारमध्ये पौष्टिक गुणधर्मासहीत फायबर, अँटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण देखील भरपूर असते. तर हृदयसंबंधित रोग आणि कॅन्सर असणाऱ्या रुग्णांसाठी मटार खाणं फायदेशीर ठरते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आहारामध्ये मटारचा समावेश केल्यास आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो.

(वाचा : अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आहात हैराण, करा ‘हे’ उपाय)

1.हृदयासाठी फायदेशीर

मटारमध्ये प्रचंड प्रमाणात फायबर असतं. हे पोषकघटक तुमच्या हृदयाला कित्येक  प्रकारच्या आजार-रोगांपासून दूर ठेवण्याचं काम करते. आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा मटारचं सेवन करावे. यामुळे हृदयविकाराचे झटके यांसारख्या गंभीर आजारांचा त्रास कमी होण्यात मदत होते.

(वाचा : वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय)

shutterstock

2. वजन घटवण्यास होते मदत

हिरव्या मटारमध्ये जीवनसत्त्व क, मॅगनिझ, कॉपर, फॉस्फरस आणि फोलेट यांसारखे  पोषकतत्त्व असतात. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्धा कप मटारमध्ये केवळ 62 कॅलरी असतात, ज्यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहत आणि वजनात देखील समतोल राखण्यास मदत होते.

(वाचा : चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव)

3. पचन प्रक्रिया सुधारते

‘व्हिटॅमिन सी’मुळे आपली पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत होते. हिरव्या मटारमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चा समावेश असतो. हिरवा मटारमुळे पचन प्रक्रियेसह पोटाच्या कॅन्सरचा देखील त्रास कमी होण्यास मदत होतो. 

shutterstock

4. कोलेस्ट्रॉल

हिरव्या मटारच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये समतोल राखलं जातं. यामुळे तुमच्या हृदयाचंही संरक्षण होतं. बद्धकोष्ठतेच्या त्रासावरही मटार फायदेशीर आहेत.  

5. हाडांना मिळते बळकटी

हाडांच्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे कॅल्शिअम महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे प्रोटीन देखील आवश्यक आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे कमकुवत हाडांचं आरोग्य सुधारणं कठीण होतं. हिरव्या मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे, त्यामुळे हाडे बळकट होण्यास मदत होते.

shutterstock

6. त्वचेच्या समस्या होतात कमी

तुम्ही त्वचेच्या समस्यांमुळे हैराण असाल तर हिरवे मटार खाण्यास सुरुवात करा. कारण हिरव्या मटारमुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच हिरव्या मटारची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. त्वचा सुंदर आणि नितळ होईल. शरीराच्या भाजलेल्या भागावर मटारची पेस्ट लावल्यास तुम्हाला थंडावा मिळेल.  

 

7. केसगळती कमी होते

मटारमध्ये असलेल्या ‘व्हिटॅमिन सी’मुळे केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय केस मऊ, घनदाट आणि मजबूत देखील होतात.

(वाचा : सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम)

बहुतांश जणांना मटार सोलून त्याचे दाणे फ्रीजमध्ये ठेवतात. पण असं करणं चुकीचं आहे. कारण यामुळे मटारमधील पोषकतत्त्वं निघून जातात. अशा मटारचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Diet