लाईफस्टाईल

संध्याकाळी काय खाऊ हा पडतो प्रश्न, मग खा हे हेल्दी पदार्थ

Leenal Gawade  |  Apr 5, 2019
संध्याकाळी काय खाऊ हा पडतो प्रश्न, मग खा हे हेल्दी पदार्थ

दुपारच्या जेवणानंतर साधारण एक 4 ते 5 दरम्यान भूक लागू लागते. अशावेळी अरबटचरबट खाण्याची इच्छा होते. मग दिवसभर बाहेर खायचे नाही असे ठरवूनही बाहेरचे खाल्ले जाते. वडापाव, फ्रँकी, मसाला डोसा, सँडवीज, पाणीपुरी, भेळ, भजी, मोमोज अशा काही पदार्थांवर ताव मारला जातो. हे पदार्थ चांगले किंवा वाईट असे आम्ही म्हणणार नाही. पण इतके नक्की की, हे पदार्थ 4 ते 5 दरम्यान खाल्लायमुळे ते पचत नाही. त्याचा परिणाम रात्रीच्या जेवणावर होतो. अशा या संध्याकाळच्या भुकेसाठी तुम्ही काय खायला हवे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला हायड्रेट

चणे-शेंगदाणे

संध्याकाळच्या या भुकेसाठी चणे- शेंगदाणे बेस्ट ऑप्शन आहे. चणे आणि शेंगदाणे खाल्ल्याने पोट तर भरतेच. शिवाय शरीराला आवश्यक असे लोह शरीराला मिळते. चणे- शेंगदाणे खाल्याने तुमची भूक देखील भागते. त्यामुळे मूठभर चणे- शेंगदाणे अशा भुकेच्या वेळेस आवर्जून खा.  

फळांची प्लेट

फळं ही शरीरासाठी नेहमीच चांगली. तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा दिवसातून फळे खाल्ली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.  संध्याकाळी भूक लागली की, मस्त फळं खा. या फळांमध्ये सफरचंद, कलिंगड, खरबूज,पपई, पेरु, द्राक्ष अशी फळं असू द्या. या फळांमुळे तुमचे पोटही भरते. शिवाय तुमच्या रात्रीच्या जेवणापर्यंत पोटही रिकामे होते.  म्हणजे तुमची रात्री जेवणाची इच्छाही मरत नाही. जर तुम्ही भरपूर फळं खाल्ली असतील आणि रात्री जेवायचे नसेल तरी चालू शकेल.

फ्रिजचे थंडगार पाणी पिताय, मग आधी हे वाचा

 शेव कुरमुरे

जर तुम्हाला अगदीच काही लाईट खायची इच्छा असेल तर शेव- कुरमुरे खाल्ले तरी चालतील. कुरमुऱ्याने भूक शमते. कारण कुरमुरे पोटात जाऊन फुगतात. त्यामुळे पुढील 2 ते 3 तास तरी भूक लागत नाही. कुरमुरे नुसते खायला कंटाळा येत असेल किंवा चव लागत नसेल तर तुम्ही त्यात शेवसुद्धा घालू शकता. मस्त शेव- कुरमुऱ्यावर ताव मारा आणि तुमचे पोट भरा.

मखाना

मखाना हा असा स्नॅक्सचा पदार्थ आहे. बिहारमध्ये मखान्याची शेती केली जाते. मखाना इतका पौष्टिक आहे की, डॉक्टरही मखाना खाण्याचा सल्ला देतात. मखानामध्ये प्रोटिन, विटॅमिन्स, कॅलशिअम्स आणि मिनरल असल्यामुळे त्याचे शरीराला भरपूर फायदे होतात. त्यामुळे तुमच्या संध्याकाळच्या आहारात मखाना खाल्ल्यास तुम्हाला त्याचे चांगले फायदे होऊ शकतील.

जिऱ्याचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

मसाला ओट्स

जर तुम्हाला ओट्स आवडत असतील. तर ओट्समधील मसाला हा ओट्स हा प्रकार संध्याकाळच्या या भुकेला खाण्यास काहीच हरकत नाही. ओट्स पोटभरीचे असतात. शिवाय शरीरासाठीही ते चांगले असतात. त्यामुळे छान एक बाऊल गरमागरम मसाला ओट्स करुन आवर्जून खा.

राजगिरा चिक्की किंवा लाडू

संध्याकाळच्या या वेळेत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. मग अनेक जण पेस्ट्रीकडे धाव घेतात. पण तुम्हाला जर काही गोड खायचे असेल तर थांबा तुमच्यासाठी राजगिरा चिक्की आणि लाडू हा छान पर्याय आहे. तुम्ही संध्याकाळच्या अशा भुकेला राजगिरा चिक्की किंवा लाडू खा.

आता जर तुम्हाला संध्याकाळी भूक लागली तर फार विचार कर नका आम्ही सांगितलेल्या किंवा तुम्हाला माहीत असलेल्या हेल्दी पर्यायाची निवड करा.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From लाईफस्टाईल