आपल्याकडे महिलांना असणारे साड्यांचे प्रेम हे सर्वज्ञात आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. इतकंच नाही तर साडी कशी नेसावी हेदेखील आता अनेकांना व्हिडिओ पाहून अथवा नियमित साडी नेसून कळतं. पण पैठणी ही अशी साडी आहे की, जी प्रत्येक महिलेला आपल्याकडे असायलाच हवी असं वाटतं. पैठणी साडी ही 100 वर्षापेक्षाही अधिक जुनी आहे. ही केवळ सहा यार्डाची साडी अथवा कपडा नाही तर त्याची जरी, सुंदरता आणि भव्यतेची ही कथा आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादमधील पैठण (Aurangabad Paithan) नगरात पैठणी (Paithani) या साडीचे निर्माण करण्यात आले. याचा इतिहास आणि याबाबत अधिक माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.
काय सांगतो 2000 वर्षांचा इतिहास
पैठणी साडीची उत्पत्ती ही सातवाहन राजवंशमध्ये झाली होतो, जे दुसऱ्या शताब्दी इसवी सन पूर्व अस्तित्वात होते. असे सांगण्यात येते की, ही साडी तयार करण्यासाठी चीनमधील अप्रतिम रेशीम धागे आणि शुद्ध जरीचा उपयोग करण्यात येत होता. तर स्थानिक ठिकाणी ही कातरण्यात येत होती. अशीही वेळ आली होती जेव्हा ही साडी बनविण्याचे थांबविण्यात आले आहे. पण 17 व्या शताब्दी पेशवाच्या राज्यात ही पैठणी पुन्हा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर या पैठणीला अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर पेशव्यांनी पैठणी विणणाऱ्यांना येवलामध्ये स्थान दिले आणि सध्या येवला हे पैठणीचे मुख्य उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. रेशम आणि सोन्याच्या धाग्यांनी ही साडी बनविण्यात येते.
काही वर्षांमध्ये झाला बदल
पारंपरिक सोन्याच्या धाग्यांनी आणि सिल्कने बनविण्यात येणाऱ्या या पैठणी तयार करण्यासाठी कमीत कमी 18 ते 24 इतके महिने लागतात. या पैठणी बनवताना पूर्वी कॉटन बेसचा वापर करण्यात यायचा मात्र आता सिल्कचा वापर करण्यता येतो. डिझाईन्समध्ये पारंपरिक कॉम्प्लेक्स पॅटर्न होता मात्र त्याची जागा आता मोठ्या बॉर्डर्सने घेतली आहे. तर कंटेम्प्ररी पैठणी साडीच्या कलर पॅलटमध्येही वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. पण याची वीण मात्र तशीच राहिली आहे. पण वेळेनुसार यामध्ये वेगवेगळे बदल झाले आहेत. पण काही पैठण्यांमध्ये आजही पारंपरिकता तशीच जपून ठेवण्यात आली आहे.
या साडीचे महत्त्व नक्की काय आहे?
पैठणी साडी हे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये कांजीवरम साड्यांना दर्जा आहे. तसंच साड्यांमधील महाराणी म्हणून महाराष्ट्रात पैठणीचे महत्त्व आहे. परंपरागत पैठणी साड्यांना खूपच महत्त्व आहे. प्रत्येक महिलेला आपल्या वॉर्डरोबमध्ये पैठणी असायलाच हवी असं नेहमीच वाटतं आणि त्यासाठी अनेक वर्ष पैसेही जमवले जातात. पैठणीचे डिझाईन्स पहिल्यापासूनच ठरविण्यात आलेले आहेत. पण प्रत्येक डिझाईनर हे आपले एलिमेंट्स जोडतात. तसंच विशिष्ट पॅटर्न आणि पारंपरिक गोष्टींचा वापर करून घेतात. पण पैठणी साडी विणताना धाग्यांची गणती समानच असते.
पैठणीच्या बाबतीतील ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही हा लेख शेअर करायला विसरू नका.