आपलं जग

Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही

Aaditi Datar  |  Jul 8, 2019
Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही

असं म्हणतात की, हर घर कुछ कहता है…. जगभरातील अनेक मानसोपचार तज्ञ्जांचंही हेच म्हणणं आहे की, आपल्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम आपल्या व्यक्तीमत्त्वाबद्दल बरंच काही सांगतो. ज्यामध्ये आपलं घर आणि अगदी ऑफिसचाही समावेश आहे. काहीजणांना त्यांच्या आसपास अगदी जास्तीत जास्त स्वच्छता आवडते तर काहीजणांना पसाऱ्यातच धन्यता वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या या स्वच्छतेबाबतच्या सवयीही तुमच्या मानसिक स्थितीबद्दल बरंच काही सांगतात. चला जाणून घेऊया कोणत्या सवयी तुमच्याबद्दल काय सांगतात ते. 

1. कपाटात कोंबलेलं सामान

तुमच्यापैकी अनेकजण असतील ज्यांचं कपाट अगदी महिनोमहिने आवरलेलं नसतं. घर चांगलं दिसावं म्हणून हेच लोक कपाटात सगळं सामान अक्षरक्षः कोंबून ती बंद करून ठेवतात आणि जेव्हा काही सामानाची गरज लागते तेव्हा यांची पंचाईत होते. असं घर पाहिल्यावर खूप स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतं पण जसं तुम्ही किचन, खोल्या आणि बाथरूममधील कपाट पाहालं, तसं त्यातील अव्यवस्थितपणा निदर्शनास येईल. अशा लोकांचं व्यक्तीमत्त्व खूपच नाटकीय असतं. ते बाहेरून तर स्वतःला अगदी परफेक्ट दाखवतात पण आतून मात्र त्यांचं सत्य काही दुसरंच असतं.

2. जुनाट घर

अनेक लोक आपल्या घरात वर्षानुवर्ष त्याच परिस्थितीत राहत असतात. अशा लोकांच्या घराच्या भिंतीवरून रंग उडालेला असतो, टाक्या खराब झालेल्या असतात आणि लाद्याही अगदी जुनाट दिसत असतात. पण तरीही लोक ते सर्व बदलून घेण्यात विश्वास ठेवत नाहीत. अशी लोक भविष्याबाबत फक्त स्वप्नरंजन करत असतात. ते स्वप्न पाहतात की, हे सगळं अचानक बदलेल आणि त्यामुळेच ते सद्य परिस्थितीबाबत काहीही करत नाहीत. अशा लोकांकडे आयुष्याबाबत कोणताही योग्य प्लॅन नसतो. 

                                                         वाचा – Vastu Shastra For Pooja Room In Marathi

3. कामाच्या ठिकाणीही पसारा

घरात काम करताना पसारा करणं ठीक आहे. पण काही जणांच्या ऑफिस टेबलवरही अस्ताव्यस्त सामान पसरलेलं असतं. कोणतीही वस्तू नीट जागेवर नसते. पण आश्चर्य म्हणजे अशी लोक बरेचदा क्रिएटीव्ह आणि टॅलेंटेड असतात. जर तुम्हालाही काम करताना काही लिहीण्याची, पेटींग करण्याची किंवा कोणतंही दुसरं काम करण्यामुळे तुमच्या टेबलवर पसारा होत असले तर दुसऱ्यांना आवडो न आवडो हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे. अशा लोकांमध्ये भरपूर कलागुण असतात. तसंच यांच्याकडे अनेक नाविन्यपूर्ण कल्पनाही असतात.

4. अस्ताव्यस्त बाथरूम

जर कोणाचं बाथरूमही अस्ताव्यस्त असेल तर जसं कपडे भरून वाहणारी लॉन्ड्री बॅग, पाणी भरलेलं सिंक इ. अशी लोकं सगळे खराब कपडे लाँड्री बॅगमध्ये भरून त्याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना ते धुण्याचा कंटाळा असतो. याबाबतीत ते टाळाटाळ करत असतात. ते फक्त अस्वच्छ कपडे धुण्यातच टाळाटाळ करत नाहीत तर आयुष्याच्या अनेक बाबतीतही आळशी असतात. त्यांच्याकडे  नेहमी काही ना काही कारण असतं ज्यामुळे ते टाळाटाळ करत असतात. 

5. कमी सामान असलेलं घर

काही लोकांकडे गेल्यावर असं वाटतं की, इथे कोणी राहतच नाही. ना त्यांच्याकडे जास्त फर्निचर असतं ना किचनच काही सामान. अशा लोकांच्या घराकडे पाहून वाटतं की, ते घरी फक्त त्यांचा थकवा दूर करण्यासाठी येतात. त्यांचं घर घरासारखं वाटतंच नाही. असं घर त्यांच्या मेंदूची स्थिती दाखवतं. अशा व्यक्ती अपरिपक्व असतात. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं घरसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. तसंच पुढच्या वेळी एखाद्या व्यक्तीबाबत विचार करताना त्याच्या घराची परिस्थितीही ग्राह्य धरायला हरकत नाही. 

हेही वाचा –

Vaastu Tips : घरातील दिशेनुसार करा या रोपं आणि झाडांची लागवड

वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

Read More From आपलं जग