DIY सौंदर्य

हातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा ‘हे’ सोपे उपाय

Dipali Naphade  |  Oct 15, 2019
हातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा ‘हे’ सोपे उपाय

कोणताही घरातील महत्त्वाचा कार्यक्रम अथवा सण हा हातावर मेंदी काढल्याशिवाय अपूर्णच वाटतो ना? हातावर गडद रंग आलेली मेंदी आणि त्याचा सुगंध आपल्या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवतो असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. हातावर मेंदी काढल्यानंतर त्याचा रंग गडद होईपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. हा गडद रंग कसा येईल यासाठी विविध उपाय आपण करून बघत असतो. पण काहीवेळा मेंदी रंगत नाही. मग आपला मूड ऑफ होतो. पण मेंदी काढल्यानंतर ती किती तास ठेवायची आणि जर कमी काळ ठेवायची असेल तर त्याचा रंग गडद होण्यासाठी तुम्हाला नक्की कोणते सोपे उपाय करता येतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्याला पण मेंदीचा रंग गडद करायचा असेल तर हे सोपे उपाय नक्की करून पाहा –

1. नीलगिरीचा वापर

Shutterstock

मेंदी काढण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचे हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्यावर नीलगिरी तेल लावा अथवा तुम्ही मेंदीच्या तेलाचाही प्रयोग करू शकता. यामुळे तुमच्या हातावरील मेंदी अधिक गडद होण्यास मदत मिळते. या तेलातील उष्ण गुणधर्मामुळे तुमची मेंदी जास्त गडद रंगते. 

अँटीबैक्टीरियल साबणाबद्दल देखील वाचा

2. मेंदीचा कालावधी

तुम्ही कितीही काहीही महत्त्वाचं काम असेल तर मेंदी लावल्यानंतर ते बाजूला ठेवा. तुम्ही मेंदी काढणार म्हणजे त्यामध्ये खूप वेळ जातो. कारण मेहंदी डिझाईन (marathi mehndi design) हे बारीक असतं. मग अशावेळी मेहनत फुकट घालवू नका ही एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदी हातावर काढल्यानंतर किमान 5 तास तरी काढू नये. मेंदीचा रंग हातावर व्यवस्थित उतरू द्यावा.

3. साखर आणि लिंबाचा रस

Shutterstock

मेंदी वाळल्यानंतर हातावरून सुकून पडायला लागते. अशावेळी ती हातावर तशीच टिकून राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे साधारण एक तासाने मेंदी वाळू लागली की, त्यावर लिंबाचा रस आणि साखर असं मिश्रण तयार करून तो रस लावावा. ज्यामुळे मेंदीला हाताला चिकटून राहण्यास मदत मिळते. मेंदी अधिक काळ हातावर राहिली तर अधिक गडद रंग चढतो. 

4. पाणी न लागण्याची घ्यावी काळजी

Shutterstock

मेंदीचा रंग तुम्हाला गडद हवा असेल तर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे पाणी लागू देऊ नये याची काळजी घ्यावी.  किमान तुमच्या हाताला 5-6 तास पाणी लागू देऊ नका. तसंच मेंदी काढतानादेखील पाण्याचा वापर करू नका. तुम्ही कोणत्याही कपड्याने अथवा हाताने करवडून मेंदी काढा. अशी मेंदी निघते. त्यासाठी पाण्याचा वापर केल्यास, तुमची मेंदी गडद होणार नाही हे लक्षात घ्या. 

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

5. उष्ण पदार्थांचा करावा वापर

तुम्हाला साधारण 5-6 तास मेंदी ठेवल्यानंतर काढल्यावर जर रंग फिका वाटत असेल तर त्वरीत तुम्ही त्यावर विक्स, बाम, आयोडेक्स अथवा मोहरीचं तेल यापैकी कशाचाही वापर करावा. हे हाताला चोळून तुम्ही साधारण पाच मिनिट्स तसंच राहू द्या. यामुळे मेंदी अधिक गडद होते. हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करणारे असल्याने मेंदी रंगण्यासाठी याचा उपयोग होतो. एक दिवसाने याचा रंग अधिक गडद होतो. 

6. लवंगेचा धूर अथवा लोणच्याचे तेल

मेंदी रंगवायची असेल तर मेंदी सुकत आल्यावर तुम्ही तव्यावर लवंग भाजून त्याचा धूरदेखील देऊ शकता. तुम्हाला जर इतके कष्ट करायचे नसतील तर तुम्ही त्यावर लोणच्याचे तेलदेखील लावू शकता. या दोन्ही पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमच्या मेंदीला अधिक गडद रंग मिळवून देऊ शकता. यामुळे मेंदीला 100 % गडद रंग प्राप्त होतो. 

हातावरची जुनी मेंदी काढण्यासाठी घरगुती उपाय

7. चुन्यावर रगडा हात

मेंदी लावलेल्या हाताने तुम्ही जर मेंदी काढल्यानंतर चुना रगडलात तर तुमच्या मेंदीला नक्कीच गडद रंग चढतो. तुम्हाला हा कदाचित थोडा विचित्र उपाय वाटू शकतो. पण चुन्यामध्ये अधिक उष्णता असल्यामुळे मेंदीचा रंग यामुळे अधिक गडद होण्यास मदत मिळते. फक्त यामध्ये अजिबात पाणी मिसळू नये याची काळजी घ्यावी. 

8. चादरीत हात गुंडाळा

Shutterstock

मेंदी सुकल्यावर तुम्ही झोपताना चादरीमध्ये हात गुंडाळून झोपा. याामुळे तुमच्या मेंदीला अधिक उष्णता मिळते आणि मेंदीचा रंग गडद होण्यासाठी मदत मिळते.मेंदी सुकल्यानंतर चादर खराब होण्याचा धोका नसतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. इतर कोणतेही उपाय जर तुम्हाला करायला कठीण वाटत असतील तर हा सर्वात सोपा उपाय आहे. 

9. सुकण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये

काही जणींना मेंदी काढल्यानंतर ती सुकवण्याची घाई असते. तेव्हा ड्रायरचा वापर करण्यात येतो. पण असं करू नये. मेंदी नैसर्गिक स्वरूपातच सुकू द्यावी. तरच त्याचा रंग हातावर व्यवस्थित चढू शकतो. 

10. कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस लावावी मेंदी

Shutterstock

मेंदी लगेच रंगत नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस मेंदी लावावी. मेंदीचा रंग हा साधारण एक ते दोन दिवसाने चढायला सुरुवात होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे ही सोपी गोष्ट लक्षात ठेवणं गरेजचं आहे. मेंदी लावून लगेच ती काढल्यास, तुम्हाला कधीही मेंदीचा गडद रंग दिसू शकणार नाही. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य