पावसाळ्यात केसांची हालत अधिक खराब होते. कारण या हंगामात स्काल्पवर अधिक प्रभाव पडतो. पावसाचे पाणी हे प्रदूषित पाणी असते त्यामुळे हे पाणी तुमच्या स्काल्पसाठी अत्यंत नुकसानदायी ठरते आणि यामुळे स्काल्प अधिक खराब होतो आणि स्काल्पमध्ये खाज येऊ लागते. कधी कधी ही खाज इतकी वाढते की, स्काल्पची त्वचा खाजवल्याने खराब होते आणि त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. यामुळे स्काल्पवर पिंपल्सदेखील येतात. बरेचदा केस तुटतात, केस तुटण्याची कारणेही अनेक असतात. यासाठी बाजारात अनेक उत्पादने मिळतात. पण याचा घरगुती उपयाही आहे. घरगुती उपाय करणे अधिक सोपे आणि सोयीस्कर आहे. हेच घरगुती उपाय आम्ही डोक्यात खूप खाज येत असेल तर त्यासाठी या लेखातून सांगत आहोत. तुम्हीही याचा उपयोग करून घेऊ शकता.
कोरड्या केसांसाठी मेथीचे पाणी (Fenugreek Seeds Water For Dry Hair)
कोरड्या केसांची समस्या पावसाळ्यात अधिक होते. कोरड्या केसांमुळे गुंताही अधिक होतो. सतत पार्लरला जाणे परवडत नाही मग अशावेळी असे सोपे उपाय करणे घरी जमू शकते.
साहित्य
- 1 कप मेथीचे पाणी
- 1 मोठा चमचा मध
- 1 कप कोरफड जेल
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिल्यांदा तुम्ही 2 मोठे चमचे मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा
- सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यात मध आणि कोरफड जेल मिक्स करा
- आता हे मिश्रण वापरून स्काल्प स्वच्छ करा
- अर्धा तास तसेच केस ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा
तेलकट केसांचा स्काल्प स्वच्छ करण्यासाठी उपाय (Home Remedies For Oily Hair)
तेलकट केसांमुळे तुमचा लुक पटकन खराब होतो. चेहराही अगदी फिका दिसू लागतो. तसंच तेलकट केसांमुळे स्काल्पवर धूळ आणि माती चिकटून बसते. त्यामुळे हा सोपा इलाज तुम्ही करू शकता.
साहित्य
- 1 कप मेथीचे पाणी
- 1 मोठा चमचा लिंबाचा रस
- 1 कप ताक
बनविण्याची पद्धत
- मेथीचे पाणी, लिंबाचा रस आणि ताक हे मिश्रण एकत्र करा आणि तुमच्या स्काल्पला लावा
- अर्धा तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा
- तुम्हाला हवं असल्यास, केस धुताना तुम्ही माईल्ड शँपूचा वापर करू शकता
डॅमेज केसांसाठी उपाय (Home Remedies For Damaged Hair)
वाढते प्रदूषण आणि आपल्या खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना केसगळती, केस लवकर पांढरे होणे आणि केस डॅमेज होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही सोपा उपाय घरी करा आणि डोक्यात खाज येत असेल तर ती घालवा.
साहित्य
- 1 कप मेथीचे पाणी
- 1 कप आवळा, रीठा आणि शिकेकाई
- 1 लहान चमचा ऑलिव्ह ऑईल
बनविण्याची पद्धत
- मेथीचे पाणी, आवळा, रीठा आणि शिकेकाईचे पाणी तसंच ऑलिव्ह ऑईल व्यवस्थित मिक्स करून घ्या
- हे मिश्रण तुम्ही स्काल्पला लावा
- एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवा
- आठवड्यातून एकदा तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करू शकता
सूचना – तुम्हाला स्काल्पमध्ये कोणतेही इन्फेक्शन असेल तर कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टना दाखवणे गरजेचे आहे. तसंच तुम्हाला कोणतीही अलर्जी असल्यास, हे उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक