सौंदर्य

घरगुती उपायांनी घालवता येईल शरीरावरील टॅन

Leenal Gawade  |  Feb 25, 2019
घरगुती उपायांनी घालवता येईल शरीरावरील टॅन

डिसेंबर- जानेवारी महिना हा छान गुलाबी थंडीचा होता. अनेक ठिकाणी फेब्रुवारीमध्येही थंडी जाणवली. पण आता अंगाची लाही-लाही करणारा उन्हाळा जाणवू लागला आहे. आता उन्हाळा म्हटला की, उन्हाच्या झळा लागून त्वचा काळवंडण्याची भिती आलीच. जर त्वचा काळवंडलीच तर वारंवार पार्लरमध्ये जाऊन डि टॅन करायचा कंटाळा येतो. शिवाय डिटॅनिंग करुन घेणे खिशाला परवडतही नाही.विशेषत: तुमचे हात, पाय उन्हाशी थेट संपर्कात आल्यामुळे अधिक काळे पडतात.अशी  काळवंडलेली त्वचा निस्तेज आणि रुखरुखीत वाटू लागते. तुमची त्वचाही टॅन झाली असेल तर खाली दिलेले घरगुती उपायांनी तुमची त्वचा पूर्ववत होऊ शकेल.

वाचा – नैसर्गिकपद्धतीने आणा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो

टोमॅटोचा रस

सन टॅनिंगवर टोमॅटोचा रस हा चांगला उपाय आहे. अनेक जण टोमॅटोतील बिया तसेही खात नाही. त्यामुळे त्यातील गर तुम्हाला तुमच्या टॅन झालेल्या भागावर चोळायचा आहे. टोमॅटोमधील ब्लिचिंग एजंट तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. त्यामध्ये तुमच्या शरीरावरील ओपन पोअर्स लहान होतात. शिवाय ब्लिचिंग एजंटमुळे तुमची त्वचाही उजळू लागते. शक्य असल्यास आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा रस तुम्ही टॅन झालेल्या भागावर लावा. १५ मिनिटे हा रस वाळवून तुम्हाला थंड पाण्याने त्वचा धुवायची आहे. तुम्हाला तुमची त्वचा मुलायम वाटेलच. पण तुमचा रंग ही उजळल्यासारखा वाटेल. साधारण महिनाभर तुम्ही हे केले तर तुम्हाला हा फरक जाणवेल.

लिंबाचा रस

चेहऱ्याकरिता लिंबाचे पुष्कळ फायदे असतात. व्हिटामिन c हे शरीरासाठी किती आवश्यक असते हे तुम्हाला माहीत आहेच. लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी आहे. जे त्वचेसाठी आवश्यक असते. लिंबामध्येही ब्लिचिंग एजंट आहेत. पण टोमॅटोच्या रसाप्रमाणे लिंबाचा रस थेट लावणे चांगले नाही. कारण त्याने तुमची त्वचा जळजळू लागते. त्यामुळे लिंबाचा रस काढून त्यात थोडे पाणी घाला आणि मगच लिंबाचा रस टॅन झालेल्या भागाला लावा.

बहुगुणी लिंबाचे फायदे घ्या जाणून

बटाटा आणि लिंबाचा रस

बटाट्याचा रसदेखील टॅनिंगवर रामबाण उपाय आहे. एक बटाटा किसून त्यात तुम्हाला लिंबाचा रस घालायचा आहे. बटाटा आणि लिंबू या दोघांमध्ये ब्लिचिंग एजंट आहे. हा रस साधारण १५ ते २० मिनिटे तुम्हाला लावून ठेवायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने हात- पाय धुवन घ्या. अंग कोरडे करुन त्यावर चांगले मॉश्चरायझर लावा. हा रस तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच लावा. कारण त्यामुळे तुमची त्वचा शुष्क होऊ शकते.

ओट्स

ओट्स ज्याप्रमाणे सध्याच्या हेल्दी लाईफसाठी आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे ते तुमच्या त्वचेसाठीही चांगले आहे. थोडेसे ओट्स घेऊन त्यात तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्याची थीक पेस्ट करुन घ्यायची आहे. आणि ती तुम्हाला टॅन झालेल्या भागावर लावायची आहे. ओट्स तुमच्या शरीरावरील मृत त्वचा काढून टाकते. उन्हामुळे अनेकदा तुमची त्वचा मृत होऊ लागते. ही मृत त्वचा काढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. शिवाय ओट्समुळे तुमची त्वचा छान गुळगुळीत होते.

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स असे करता येतील कमी

विक्स वेपोरब

आता हा इलाज तुम्हाला जरा विचित्रच वाटेल. पण अनेकांनी विक्स हा सर्वोत्तम इलाज असल्याचे म्हटले आहे. विक्स हातावर चोळून तुम्हाला टॅन झालेल्या भागावर लावायचे आहे. काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या टॅन झालेल्या भागावर फरक पडलेला जाणवेल. त्यामुळे हा उपायही नक्की ट्राय करुन पाहा.

टीप- हे सगळे उपाय करत असताना त्याचा फरक जाणवण्यासाठी तुम्हाला थोडं थांबाव लागेल. एखादा बदल दिसण्यासाठी साधारण दोन आठवडे नक्कीच लागतात. शिवाय तुम्हाला रोज सनस्क्रिन लावून फिरायचे आहे. 

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From सौंदर्य