भविष्य

11 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या आयुष्यातील अडचणी होतील दूर

Rama Shukla  |  Aug 9, 2019
11 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या आयुष्यातील अडचणी होतील दूर

मेष – धुर्त लोकांकडून फसवणूक होईल

कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात धुर्त लोकांकडून फसविले जाण्याची शक्यता आहे. कर्ज घेताना सावध रहा. काही रखडलेली कामात समस्या येतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय  अथवा नोकरीमधील आव्हाने वाढतील. 

कुंभ – मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल

आज तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांचा त्रास कमी होईल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. एखाद्या खास व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. 

मीन- नवीन योजना आखाल

आज तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा मिळणार आहे. एखादी नवीन योजना आखाल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल.

वृषभ – आरोग्य सुधारेल

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. राजकारणात प्रतिस्पर्धीच्या पुढे जाण्यात यश मिळणार आहे. जोडीदारासोबत आज सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासाचा योग आहे. 

मिथुन – कौटुंबिक ताणतणावाची शक्यता

घरात छोटे – मोठे वाद होण्याची शक्यता आहे. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा. जोखिमेच्या कामापासून दूर रहा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. 

कर्क – शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल

एखाद्या बातमीमुळे शारीरिक अथवा मानसिक थकवा जाणवेल. विनाकारण दगदग केल्यामुळे निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

सिंह – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे

आज व्यवसायात महत्त्वाची कामे मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. वादग्रस्त विषय टाळल्यामुळे समस्या वाढू शकतात. रचनात्मक कार्यात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळेल.

कन्या – विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील

आज तुमची नवीन लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमच्या मनातील भावना आज इतरांसोबत व्यक्त करण्यात तुम्हाला यश येईल. ज्यामुळे तुमचे मन आज आनंदी राहणार आहे. देणी घेणी करताना सावध रहा. विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करण्याची गरज आहे.

तूळ – व्यवसायात समस्या येतील

आज तुम्हाला व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक – पैशांसबंधी एखादी चांगली बातमी मिळेल

आज तुमचे भाग्य तुमच्यासोबत आहे. पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. महत्त्वाची आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराला परदेशी जाण्याचा योग मिळेल. धुर्त लोकांपासून सावध रहा.

धनु – उत्पन्नाचे साधन कमी होईल

अधिक मेहनत करून पण फळ जास्त मिळणार नाही. एकत्र सर्व कामे करण्याचा प्रयत्न करू नका. दुर्लक्षपणामुळे महत्त्वाच्या कामात चूक होण्याची शक्यता आहे. अधिकारी निराश होऊ शकतात. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.

मकर- वातावरणातील बदलांमुळे आजारी पडाल

आज आरोग्याकडे  दुर्लक्ष करू नका. कारण वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. रखडलेली कामे सहज पूर्ण करा. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. 

 

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

 

Read More From भविष्य