भविष्य

12 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल

Trupti Paradkar  |  Aug 9, 2019
12 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल

मेष – नवीन योजना सुरू कराल

आज तुमचे मन एखाद्या नव्या योजनेत रमणार आहे. कामाच्या ठिकाणी नाविण्य आणण्याचा प्रयत्न कराल. भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांचा  फायदा होईल. जोखिमेची कामे करू नका.

कुंभ – मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या मुलांना पोटदुखी अथवा त्वचेच्या समस्या येऊ शकतात. राजकारणातील लोकांची मदत फायदेशीर ठरेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणार आहे. क्रिडा क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराची भावनात्मक साथ मिळेल.

मीन- जोडीदाराशी नाते मजबूत होईल

आज तुमचे तुमच्या जोडीदाराशी नाते मजबूत होणार आहे. जवळच्या लोकांमुळे आज तुम्हाला प्रसन्न वाटेल. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी प्रभावित होतील. पदोन्नतीची संधी मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. 

वृषभ – एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे.

एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे. एखादा अज्ञात भितीमुळे व्यवसायातील रस कमी होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. बिघडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होऊ शकते. 

मिथुन – आईचे आरोग्य सुधारेल

आज तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. एखाद्या राजकीय पक्षात जोडले जाण्याची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होणार आहे. जोडीराच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना सावध रहा. मित्रांशी भेट होऊ शकते. 

कर्क – प्रेमसंबंधांमध्ये कटूपणा येईल

आज तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीमुळे तुमच्या घरातील शांती भंग होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक व्यस्तता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याचा योग आहे. विनाकारण खर्च करू नका. वादविवादांपासून दूर रहा. 

सिंह – डोळे किंवा डोके दुखण्याची शक्यता आहे

आज अपुऱ्या झोपेमुळे तुमचे डोके किंवा डोळे दुखण्याची शक्यता आहे. एखादे कार्य पूर्ण झाल्यामुळे तुमच्या सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदारासोबत नाते सुदृढ होण्याची  शक्यता आहे. 

कन्या – उत्पन्नाची नवी साधने मिळतील

आज तुमच्या उत्पन्नाची नवी साधने वाढणार आहेत. नवीन आणि फायदेशीर कामे मिळतील. विरोधक नमणार आहेत. घरातील लोकांच्या छोट्या मोठ्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. सामाजिक कार्यात जाण्याची संधी मिळेल. प्रवासाचा योग आहे. 

तूळ – नातेसंबंध दृढ होतील

आज घरातील वयस्कर लोकांच्या मदतीने कौटुंबिक संपत्तीचे वाद मिटणार आहेत. नातेसंबंध दृढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीतून फायदा होणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होईल.

वृश्चिक – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणा र नाही. स्पर्धा परिक्षेचा निकाल चांगला लागणार नाही. व्यवसायात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते-संबंध सुधारण्यात यश मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा.

धनु – प्रॉपर्टीतून धनलाभ होईल

आज तुम्हाला प्रॉपर्टीतून धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. व्यावसायिक कामांमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

मकर- नवीन काम सुरू करताना सावध रहा

आज एखादे नवे काम सुरू करताना सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. आरोग्य आणि मानप्रतिष्ठा सांभाळण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. वाहन चालवताना सावध रहा.

 

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

Read More From भविष्य