भविष्य

15 ऑगस्ट 2019 राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळेल मनासारखी नोकरी

Rama Shukla  |  Aug 13, 2019
15 ऑगस्ट 2019 राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळेल मनासारखी नोकरी

मेष – शिक्षणात अडचणी येतील

आज तुमच्या घरातील अडचणींंमुळे शिक्षणात अडथळा येईल. धार्मिक कार्यातील रस वाढेल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. देणी-घेणी सांभाळून करा.

कुंभ – दुर्लक्षपणामुळे कामे बिघडण्याची शक्यता

आज कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे तुमचे काम बिघडू शकते. व्यवसायिक प्रगती हवी असल्यास आळस करू नका. एखादे  काम रद्द होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

मीन – अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील सुखवस्तूंमध्ये वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने परदेशी जाण्याचा संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृषभ – वातावरणातील बदलांमुळे आजारी पडण्याची शक्यता

आज तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वातावरणातील बदलांमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग करू नका. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावध रहा. 

मिथुन – एखाद्या खास व्यक्तीशी होईल भेट

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. नवीन उद्योजकांशी भेट होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील.

कर्क – मनासारखी नोकरी मिळेल

आज युवकांना मनासारखी नोकरी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. एखाद्या खास कार्यक्रमांमुळे तुमच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळेल. 

सिंह – बजेट बिघडण्याची शक्यता आहे

आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू बिघडण्याची शक्यता आहे. सेल मध्ये शॉपिंग करणे टाळा. तुमचे बजेट बिघडू शकते. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. अध्यात्मातील रस वाढणार आहे. 

कन्या – मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल

आईच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. नात्यातील गोडवा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात यश मिळेल. राजकारणातील महत्त्वांकाक्षा पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुखमय असेल.

तूळ – प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे. कौतुक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. एखाद्या अव्यवहारिक घटनेमुळे मन निराश होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. रखडलेली पैसे मिळण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक – आईला कफाचा त्रास होऊ शकतो

आज तुमच्या मातेला कफ , खोकला या समस्या होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. व्यावसायिक योजना सफळ होतील. एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळा. 

धनु – भेटवस्तू अथवा पैसे मिळतील

आज तुम्हाला जोडीदार अथवा मित्रांकडून मौल्यवान भेटवस्तू अथवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कामे मिळतील. सामाजिक सन्मान अथवा धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात ओढ वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीसाठी दगदग करावी लागेल. 

मकर – भावंडांच्या मदतीने व्यवसायात वाढ

आज तुम्हाला मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. भावंडांच्या मदतीने व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक जोखिम घेऊ नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक समारंभात जोडीदारासोबत सहभाग घ्याल.

अधिक वाचा

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य