मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज तुमच्या भागिदारीच्या व्यवसायामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आईवडीलांचे सहकार्य मिळेल.
कुंभ – कौटुंबिक समस्या सुटतील
आज तुमच्या कौटुंबिक समस्या सुटणार आहेत. अचानक एखादी आनंदाची बातमी मिळेल. नवीन व्यवसायिक संबंध मजबूत होतील. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. प्रभावशाली लोकांची भेट होईल.
मीन – नवीन रोजगाराच्या संधी मिळतील
आज तुम्हाला नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना खेळात करियर करण्याची संधी मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
वृषभ -दिवसभर उत्साही वाटेल
आज तुम्हाला दिवसभ उत्साही वाटेल. आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विरोधकांना नमवण्यात यश मिळेल. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल.
मिथुन – व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा तणाव वाढणार आहे. प्रवासाला जाणे टाळा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कर्क – कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल
आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हवर जाण्याची संधी मिळेल.
सिंह – जोडीदाराच्या आरोग्याबाबत सावध राहा
आज तुमच्या जोडीदाराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दिनक्रम नियमित ठेवा. अचानक धनलाभ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
कन्या – भावंडांची साथ मिळेल
आज तुमच्या भावंडांची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी व्हाल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमची प्रशंसा करणार आहेत.
तूळ – मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळेल
आज व्यवसायात चढ – उतार येण्याची शक्यता आहे. पदोन्नतीत अडथळे येण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. मन निराश राहील. कुटुंबाच्या साथीने कठीण कामे पूर्ण कराल.
वृश्चिक – मौल्यवान भेटवस्तू मिळेल
आज तुमचा दिवस अगदी आनंदात जाणार आहे. एखादी मौल्यवान भेटवस्तू भेट स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. घरात महागडे सुखसाधन खरेदी करण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत वेळ चांगला जाईल.
धनु – दुर्लक्षपणा केल्याने चांगली संधी गमवाल
आज तुम्ही एखादी चांगली संधी गमवणार आहात. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. आर्थिक बाजू मजबूत असेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील.
मकर – वृद्धांचे आरोग्य चांगले राहील
आज तुमच्या घरातील वृद्ध मंडळींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश राहील. विद्यार्थ्यांना आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळणार आहे. व्यवसायातील कामे पूर्ण होतील. अध्यात्मिक रस वाढणार आहे.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje