भविष्य

15 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळेल वाहनसुख

Rama Shukla  |  Sep 12, 2019
15 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळेल वाहनसुख

मेष – घरातील वृद्धांची तब्येत बिघडेल

आज तुमच्या घरातील वृद्ध मंडळींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. 

कुंभ – व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता

आज व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. मनासारखे यश मिळवण्यासाठी कामात बदल करा. तुमचे चांगले काम तुमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येणार आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. 

मीन – प्रॉपर्टी व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्हाला प्रॉपर्टीच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादी किंमती वस्तू तुटण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासाच्या योजना सध्या टाळाव्या लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार आहे. कौटुंबिक एकजूट वाढणार आहे. 

वृषभ – गरजेच्या वेळी मित्रमंडळी दूर जातील

आज तुमच्या गरजेच्यावेळी मित्रमंडळी लांब जाणार आहेत. शंका-कुशंकांमुळे तणाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. जोखिमेच्या कार्यापासून दूर राहा. अनियोजित खर्च वाढणार आहेत. 

मिथुन – मानसिक तणाव वाढण्याची शक्यता

आज तुम्हाला  एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिक प्रवास करावा लागण्यामुळे निराश व्हाल. धुर्त लोकांपासून सावध रहा. 

कर्क – भेटवस्तू मिळतील 

सासरच्या लोकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वारसाहक्क मिळू शकतो. शैक्षणिक स्पर्धेत चांगले यश मिळणार आहे. भावनांच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेऊ नका. देणी-घेणी सांभाळून करा. 

सिंह – प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल

आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होणार आहे. भविष्यात या गोष्टीचा फायदा होणार आहे. भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. मित्रांच्या मदतीने बिघडलेली  कामे पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. 

कन्या –  विद्यार्थ्यांना करिअरबाबत समस्या येतील

आज मुलांच्या भविष्याबाबत नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना करिअरविषयी समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. धार्मिक कार्यातील श्रद्धा वाढणार आहे. 

तूळ – वाहन सुख वाढणार आहे

आज तुम्हाला व्यवसायात नवीन कामे मिळणार आहेत. वाहन सुखात वाढ होणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील कौशल्यामुळे अधिकारी खुश होणार आहेत. प्रवासादरम्यान तुमचे ध्येय तुम्ही साध्य करणार आहात. 

वृश्चिक – कामाच्या ठिकाणी केलेला दुर्लक्षपणा त्रासदायक ठरेल

आज विद्यार्थ्यांचा निकाल विपरित येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी केलेला दुर्लक्षपणा त्रासदायक ठरू शकतो. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रियकरासोबत नाते दूरावण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 

धनु – आईच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या आईला पोटात गॅस अथवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी योग्य समतोल राखण्यात समस्या येतील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि  धनसंपत्ती वाढणार आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. 

मकर – नवीन व्यावसायिक संबंध मजबूत होतील

आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमात खास व्यक्तीला भेटणार आहात. या व्यक्तीबाबत तुमच्या मनात विशेष भावना असतील. व्यवसायात नवीन संबंध मजबूत होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. 

 

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

Bappa ला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दाखवा हा नेवैद्य

Read More From भविष्य