भविष्य

16 एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशींच्या लोकांना आर्थिक लाभ

Rama Shukla  |  Apr 13, 2020
16 एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशींच्या लोकांना आर्थिक लाभ

मेष – आईची तब्येत सुधारेल

आज तुमच्या आईची तब्येत सुधारणार आहे. स्वभावात चिडचिडेपणा वाढेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. कुंटुबासोबत गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. 

कुंभ – जोडीदाराच्या वडिलांमुळे समस्या वाढतील

आज तुमच्या जोडीदाराच्या वडिलांमुळे काही समस्या निर्माण होणार आहेत. घरातील लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या. वाहन चालवणे सध्या टाळा. नवीन योजना आखा. एखादी आनंदाची बातमी मिळेल. 

मीन-  कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. व्यवसायासाठी करावा लागणारा प्रवास रद्द करावा लागेल. जोडीदाराच्या नात्यात गोडवा वाढेल. 

वृषभ –  नात्यातील गोडवा वाढेल

आज तुमच्या नात्यातील गोडवा वाढणार आहे. विरोधकांचा त्रास कमी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नियोजित कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

मिथुन – दुर्लक्षपणामुळे नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पुन्हा नीट होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. विरोधकांचा त्रास जाणवणार आहे. 

कर्क – आर्थिक लाभ होण्याची शक्यता 

आज व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातून प्रगती होणार आहे. घरातून काम करताना जोडीदाराची साथ मिळेल. परदेशात जाण्याचा योग आहे.

सिंह – कामाच्या ठिकाणी बदल होतील

आज कामाच्या ठिकाणी काही बदल होतील. व्यवसायातील कामे अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांनी मन निराश होईल. जोडीदारासोबत घरात एखाद्या मंगल कार्याच्या आयोजनाची तयारी कराल. 

कन्या –  तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज एखाद्या अज्ञात भितीमुळे मन निराश होण्याची शक्यता आहे. तणाव वाढण्याची शक्यता आहे. इतरांच्या मदतीने आनंद मिळेल. कौटुंबिक समस्या एकमेकांशी बोलून सोडवा. वाहन चालवताना सावध राहा. 

तूळ – मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील

आज व्यवसायातील कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होणार आहेत. सध्या प्रवासाला जाणे टाळा. सहकाऱ्यांसोबत व्हिडियो कॉलने नवीन योजना आखा. सामाजिक उत्सव अथवा कार्यक्रमात सहभागी होऊ नका.

वृश्चिक –  नियोजिक लक्ष्य साध्य करण्यात यश 

आज ठरवल्याप्रमाणे तुमची कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला वापर कराल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. 

धनु – मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता 

आज तुमचे एखादे मौल्यवान सामान तुटण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट येऊ शकते. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत तुमचे छंद जपण्यात यश मिळेल. 

मकर – जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल

आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. मुलांची कर्तव्ये  पूर्ण करण्यात यश मिळेल. मित्रांसोबत बाहेरगावी जाण्याचा बेत रद्द करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

 

अधिक वाचा –

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

Read More From भविष्य