भविष्य

26 जुलै 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन नोकरीचा लाभ

Rama Shukla  |  Jul 24, 2019
26 जुलै 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन नोकरीचा लाभ

मेष – यश मिळेल

आज तुम्ही केलेल्या कामामुळे तुम्हाला यश मिळेल. रखडलेले पैसे आज परत मिळतील. काही लोक आज तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होतील. वाहन वेगाने चालवू नका.

कुंभ – तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज तुमच्यासाठी दिवस रोमॅंटिक नाही. व्यावसायिक काम आणि वैयक्तिक कामात समतोल साधा. तणाव वाढू शकतो. विनाकारण प्रवास करावा लागेल. जोखिमेचे कार्य करू नका. प्रवासाची योजना पुढे ढकलावी लागेल. वाहन चालवताना नियमांचे नीट पालन करा.

मीन- विनाकारण दगदग करावी लागेल

आज तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल. विनाकारण तुम्हाला दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी बदल करावे लागतील. विरोधकांचे प्रयत्न सफळ होणार नाहीत. वाद करणे टाळा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृषभ – जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल

आज तुमचा वेळ जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. घरात नवा पाहुणा येण्याचे संकेत आहेत. गुंतवणूक करताना विश्वासू व्यक्तीची  मदत घ्या. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. 

मिथुन – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भरकटणार आहे. यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आज प्रवास करणे टाळा. येणाऱ्या काळात चढ उतार येण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कर्क – शेअर बाजारात फायदा मिळेल

आज तुम्हाला शेअर बाजारात फायदा मिळेल. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील. नियोजित कामे पूर्ण होतील. परदेशी जाण्याचा योग आहे.

सिंह – चांगली संधी गमवाल

आज तुम्ही आळस आणि दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. नवीन लोकांशी मैत्री होईल. जोडीदाराच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. अध्यात्मिक रस वाढण्याची शक्यता आहे.

कन्या – आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

आज तुमच्या भाऊ  अथवा बहिणीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग करावी लागेल. अती उत्साह महागात पडेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाची साधने वाढतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात रूची वाढेल. देणी -घेणी करताना सावध रहा. वादविवाद करणे टाळा.

तूळ – कौटुंबिक साथ लाभेल

कठीण प्रसंगी तुमचे कुटुंब तुमची साथ देईल. प्रवास करताना सावध रहा. विरोधक नमतील. मुलांकडून  शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल.

वृश्चिक – नोकरी मिळण्याची शक्यता

आज  तुमची अभ्यास अथवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा वाढणार आहे. तरूणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वृद्धांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

धनु – लाभ कमी मिळेल

आज तुम्हाला व्यावसायिक लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढल्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. राजकारणात नवीन आव्हाने मिळतील. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार रहाल.

मकर – जुना आजार बरा होईल

आज तुमचा एखादा जुना आजार पूर्ण बरा होणार आहे. तुमचा दिवस आज आनंदाचा असेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे.

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य