मेष – थकवा आणि आळस जाणवेल
आज दिवसभर तुम्हाला थकवा आणि आळस जाणवेल. एखादी बाहेरची व्यक्ती तुमची आज मदत करेल. महत्त्वाचे काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी ठरेल.
कुंभ – आरोग्य सुधारेल
आरोग्य उत्तम असेल. आईच्या तब्येतीचे रिपोर्ट चांगले येतील. त्यामुळे घरात वातावरण आनंदाचे असेल. व्यावसायिक कामासाठी प्रवास करावा लागेल. सामाजिक कार्यक्रमात मित्रांची भेट होईल. आर्थिक जोखिम घेऊ नका. खेळात प्राविण्य कमावण्याची संधी आहे.
मीन- जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका
आज तुमच्या जोडीदाराला तुमच्या भावनिक साथीची गरज असेल. मुलांच्या करिअरची चिंता सतावेल. धुर्त लोकांपासून सावध रहा. तुमचे गुपित कोणाला सांगू नका. व्यावसायिक भागिदारीत भांडणे होतील. रागावर नियंत्रण ठेवा. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल
वृषभ – भाग्योदयाचा योग
आज तुमच्या राशीत भाग्योदयाचा योग आहे. आज तुम्ही जे काम कराल ते पूर्ण होईल. व्यावसायिक योजना सफळ होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. जोडीदाराची साथ मिळाल्याने एखाद्या समारंभात सहभागी व्हाल.
मिथुन – जोडीदाराची साथ मिळेल
आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. प्रभावशाली लोकांशी भेट होईल. इतरांच्या मदतीमुळे यशस्वी व्हाल. देणी घेणी सांभाळून करा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
कर्क – महत्त्वाचा निर्णय घेऊ नका
आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना कठीण मेहनत घ्यावी लागेल. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.
सिंह – रखडलेले पैसे परत मिळतील
आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतील. सासरच्या लोकांंकडून एखादे महागडे गिफ्ट मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. वडील अथवा एखादी वडिलधारी व्यक्तीकडून तणाव मिळेल. सामाजिक कार्यात मन रमवा.
कन्या – कामाच्या ठिकाणी दबाव राहील
आज विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया घालवू नये. अभ्यासात मन रमवा. कामाच्या ठिकाणी दबाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. दुर्लक्षपणाने काम करू नका. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढेल.
तूळ – तुमची चिडचिड होऊ शकते
विनाकारण खर्च वाढल्याने आज तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढणार आहे. इतरांमुळे तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल. अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबध सुधारतील. राजकारणात रस वाढणार आहे. कौटुंबिक साथ चांगली मिळेल.
वृश्चिक – प्रिय व्यक्तीची भेट होईल
आज तुमची तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. मुलांसोबत फिरायला जाल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. व्यावसायिक भागिदारी फायद्याची असेल. देणी घेणी सावधपणे करा. रखडलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
धनु – कामात यश मिळेल
आज तरूणांना कामात मनासारखे यश मिळणार आहे. व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम आणि चांगले बदल होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. मित्रांसोबत फिरायला जाल.
मकर- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
आज तुमचे एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रॉपर्टीमध्ये तोटा होऊ शकतो. कोर्ट कचेरीसाठी धावपळ करावी लागेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. धार्मिक कार्यात मन रमवाल. देणी घेणी करताना सावध रहा.
अधिक वाचा
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar