खाणंपिण आणि नाइटलाईफ

आलं आणि लसूणचा कसा करावा पदार्थांमध्ये वापर

Dipali Naphade  |  Oct 20, 2021
ginger garlic paste

घरी तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा त्यामध्ये मसाले आणि हर्ब्स याचा खूप वापर करण्यात येतो. भारतीय खाण्यामध्ये सर्वात जास्त स्वाद हा मसाल्यांवर अवलंबून असतो आणि नॉनव्हेज अथवा पनीरचे कोणते पदार्थ असतील अथवा कोणतेही गेव्हीचे पदार्थ असतील तर त्यामध्ये आपल्याकडे हमखास आलं आणि लसूण वापरण्यात येते. इतकंच नाही तर रोजच्या पदार्थांमध्ये अर्थात भाजी अथवा आमटीमध्येही आलं आणि लसणीचा वापर करण्यात येतो. प्रत्येक रेसिपी जेव्हा तुम्ही करता अथवा वाचता त्यामध्ये 1 चमचा अथवा 2 चमचे आलं लसणीची पेस्ट वापरा असा उल्लेख सर्वांनाच आढळतो. आलं आणि लसणीचा किती आणि कशाप्रकारे वापर करावा याचा काही जणांना अंदाज येत नाही. तसंच आलं- लसूण पेस्ट बाजारातून घेतली तर आपल्याला हवा तसा त्याचा स्वाद येत नाही. त्यामुळे आलं आणि लसूणचा वापर कसा पदार्थांमध्ये करावा याबाबत काही सोप्या टिप्स.  

किती प्रमाणात आलं आणि लसूण वापरावं 

तुम्ही आलं आणि लसूणची पेस्ट बनवत असाल तर तुम्हाला एक भाग आलं आणि 2 भाग लसूण इतका असायला हवा. हा आलं आणि लसूण पेस्ट ठेवण्याचा योग्य पर्याय आहे. ही केवळ पेस्ट करू नका तर तुम्ही आलं आणि लसूण ठेचून पेस्ट करा जेणेकरून पदार्थांमध्ये स्वाद अधिक चांगला येतो. ग्रेव्ही बनवताना तुम्ही याचे इतके प्रमाण वापरावे.

अधिक वाचा – सोलून झाल्यावर आल्याचं साल फेकून न देता असा करा वापर

आलं लसूण वाटायची असल्यास

काही भाजींमध्ये पेस्ट स्वरूपात आलं आणि लसूण वापरणार असाल तर ते अजिबातच चांगला स्वाद देत नाही. त्यापेक्षा तुम्ही आलं आणि लसूण दोन्ही खलबत्तामध्ये घालून कुटून भाजीमध्ये घातल्यास,  त्याचा योग्य स्वाद येतो. तुम्ही जर आलं लसूण पेस्ट नुसतीच घातली तर भाजीला अधिक कडवटपणा येतो आणि त्याचा फ्लेवरही अधिक जाणवतो. त्यामुळे तुम्ही कुटून घातल्यास, अधिक चव मिळते. 

नॉनव्हेज बनवायचं असल्यास

नॉनव्हेज बनवताना आलं आणि लसूण पेस्ट तर वापरावी लागतेच. तुम्हाला आलं आणि लसणीचे प्रमाण समसमान ठेवावे लागते. मटण, मांस, चिकन मॅरिनेट करण्यासाठी ही रेसिपी तुम्ही वापरावी. माशांच्या रेसिपीमध्ये याचा जास्त उपयोग होत नाही. कारण माशांमध्ये याचा जास्त उपयोग केल्यास, कडवटपणा जास्त येतो. त्यामुळे तुम्ही इतर ग्रेव्हीमध्ये आलं-लसणीची पेस्ट वापरू शकता. 

मॅरिनेशनसाठी अधिक स्वादिष्ट ठरते आलं-लसूण पेस्ट आणि काळी मिरी 

जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मॅरिनेट करायची असेल तर आलं-लसूण पेस्ट आणि काळी मिरी एकत्र केल्यास, अधिक चांगली चव लागते. मॅरिनेशनचा अधिक चांगला स्वाद येतो. तुम्हाला जर एखादा पदार्थ अधिक तिखट हवा असेल तर तुम्ही याचा वापर करावा. तुम्ही यासह लवंग, रोजमेरी, लिंबू यासारखे पदार्थदेखील तुम्ही मिक्स करू शकता. यामुळे पदार्थांचा स्वाद अधिक चांगला लागतो.

अधिक वाचा – आलं टिकवून ठेवायचं असेल तर वापरा सोप्या युक्ती

रोस्टेड रेसिपीजमध्ये अशा स्वरूपात वापरा आलं आणि लसूण 

तुम्ही जेव्हा रोस्टेड रेसिपी बनवणार असाल तेव्हा लसूण आणि आल्याचा स्वाद अधिक चांगला लागतो. अल्युमिनिअम फॉईलमध्ये तुम्ही लसूण आणि आलं एकत्र करून ओव्हनमध्ये गरम करून घ्या. यानंतर हे ओव्हनमधून काढा आणि मॅश करून घ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यामध्ये रोजमेरी, बेसिल इत्यादी घालू शकता. हे अतिशय स्वादिष्ट लागते आणि ही रेसिपी तुम्हाला अतिशय चांगला फ्लेवर मिळवून देते. 
तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून अधिक स्वादिष्ट जेवण बनवू शकता. आलं लसणीची पेस्ट केवळ तुम्ही वापरायची म्हणून न वापरता अशा पद्धतीने वापरून पाहा. तुम्हाला अधिक चविष्ट जेवण बनवता येते. 

अधिक वाचा – लिंबू, मिरची आणि आल्याचे सोपे हॅक्स, करा उपयोग

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ