Eye Make Up

फॉक्स आयमेकअप करताना असा करा कन्सिलरचा वापर

Trupti Paradkar  |  Oct 4, 2020
फॉक्स आयमेकअप करताना असा करा कन्सिलरचा वापर

ब्युटी आणि मेकअपचे ट्रेंड सतत बदलत असतात. तुम्हाला सर्वांना कॅट आय लुकचा ट्रेंड नक्कीच माहीत असेल. पण सध्या सोशल मीडियावर फॉक्स आय लुक खूपच व्हायरल होत आहे. जर तुम्हाला ब्युटी ट्रेंडबद्दल फार काही माहीत नसेल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची आहे. हा ब्युटी लुक करण्यासाठी तुम्हाला कन्सिलर योग्य पद्धतीने वापरण्याची गरज आहे. कोल्ह्याच्या चेहऱ्याप्रमाणे मिळताजुळता हा लुक असल्यामुळे तुम्हाला यासाठी तुमचा चेहऱ्याला थोडं लिफ्ट करणारा इफेक्ट द्यावा लागेल. हा इफेक्ट देण्यासाठी कोणतीही महागडी ट्रिटमेंट करण्याची गरज नाही.फॉक्स आय लुकसाठी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात आय लायनर आणि मस्कारा लावण्याची गरज भासेल. मात्र भुवया आणि पापण्याना योग्य आकार देऊन हा लुक मिळवणं तुम्हाला सहज शक्य होईल. आय मेकअप करताना कन्सिलर वापरणं नक्कीच फायद्याचं ठरेल.सध्या मेकअपने हा लुक कसा मिळवायचा याच्या अनेक हॅक आणि ट्रिक्स तुम्हाला इन्स्टाग्राम अथवा पिंटरेस्टवर मिळू शकतात. जेव्हा तुम्ही घरात बसून खूप बोअर झाला असाल तेव्हा टाईमपाससाठी या लुक करण्याचा सराव करा. ज्यामुळे हा लुक करणं तुमच्यासाठी अगदी सहज होईल. शिवाय हा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आम्ही दिलेल्या टिप्स आणि स्टेप बाय स्टेप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. 

फॉक्स आय लुकसाठी लागणारं साहित्य –

फॉक्स कन्सिलरसाठी फ़ॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स –

स्टेप 1 – तुमचं आवडतं आणि स्किन टोनशी मिळतं जुळतं कन्सिलर खाली दिलेल्या भागांवर लावा. ज्यामुळे मेकअपचा बेस तयार होईल. असं करताना तुम्हाला थोडं विचित्र वाटू शकेल पण फॉक्स लुकसाठी हे करणं फायद्याचं ठरेल.

स्टेप 2 – कन्सिलर ब्रश, ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करा ज्यामुळे तुमच्या फेस शेपला लिफ्ट मिळेल

स्टेप 3 – कन्सिलर सेट करण्यासाठी बनाना पावडर अथवा कोणत्याही सेटिंग पावडरचा वापर करा

स्टेप 4 – तुमचा बाकीचा  मेकअप पूर्ण करा यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या इतर मेकअप टिप्सचा वापर करू शकता. 


स्टेप 5 – फॉक्स आयलुकसाठी तुम्हाला  तुमच्या भुवयांना कपाळाच्या दिशेने वळण देऊन थोड्या लिफ्ट कराव्या  लागतील. ज्यामुळे तुमचा फॉक्स आयलुक परफेक्ट दिसेल

स्टेप 6 – केसांचा हाय पोनीटेल बांधा म्हणजे चेहरा उभट दिसेल

स्टेप 7 – मेकअप उठावदार करण्यासाठी पातळ आयलायनर लावा. डोळ्यांच्या दोन्ही कोपऱ्यांवर एक फायनल टच द्या. 

स्टेप 8 –आय लॅश कर्लरने पापण्यांना कर्ल करा आणि फॉल्स आयलॅशेसने तुमचा लुक पूर्ण करा. 

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

सणासुदीला खास दिसायचं असेल तर असा करा ‘आय मेकअप’ (Festive Eye Makeup In Marathi)

लेटेस्ट निऑन आयमेकअप लुकसाठी हिना खानकडून घेता येईल प्रेरणा

चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी मेकअप टिप्स, डोळे दिसतील अधिक सुंदर

Read More From Eye Make Up