DIY फॅशन

जंपसूट करा अशा प्रकारे कॅरी, दिसाल अप्रतिम

Dipali Naphade  |  Nov 18, 2020
जंपसूट करा अशा प्रकारे कॅरी, दिसाल अप्रतिम

सध्या महिलांकडे स्टायलिंगंसाठी काही कमी पर्याय नाहीत. जीन्स, सलवार कुरता, साडी अथवा अनेक असे स्टायलिंगसाठी प्रकार उपलब्ध असतात.  यापैकीच एक पर्याय आहे तो म्हणजे जंपसूट. अतिशय कम्फर्टेबल असणारा जंपसूट सध्या सर्रास वापरात असलेला दिसून येत आहे. सामान्यतः सर्वांच्याच वॉर्डरोबमध्ये जंपसूट असलेला दिसून येतो. हा अतिशय स्टायलिश आऊटफिट असून तुम्ही हा युनिक तऱ्हेने घातला तर तुमचा लुक अधिक सुंदर आणि आकर्षक होतो. तुम्ही नेहमी एकाच तऱ्हेने जंपसूट घातला असेल तर आता अशा वेगवेगळ्या स्टाईल तुम्ही करून पाहा आणि तुमच्या लुकमध्ये वेगळेपणा आणा. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या जंपसूटच्या स्टाईल्स कशा कॅरी करायच्या हे या लेखातून सांगत आहोत. तुम्हाला या टिप्स आणि स्टाईल्स नक्कीच आवडतील. या टिप्स तुम्हाला वेगळा लुक नक्कीच मिळवून देतील. 

प्रिंटवर करा लक्ष केंद्रीत

तुम्हाला तुमचा जंपसूट अधिक स्टायलिश दाखवायचा असेल तर तुम्ही त्यावरील प्रिंटवर खास लक्ष द्या. बाजारात अगदी प्लेनपासून वेगवेगळ्या प्रिंट्सचे जंपसूट्स मिळतात. पण तुम्हाला अधिक आकर्षक आणि सुंदर दिसायचं  असेल तर तुम्ही फ्लोरल जंपसूटची निवड करा. केवळ फ्लोरल नाही तर तुम्ही पोलका डॉट प्रिंटचाही आधार घेऊ शकता. हे काही असे प्रिंट्स आहेत जे कधीही आऊटडेटेड होत नाहीत आणि तुम्हाला चांगला लुक मिळवून देतात. तसंच जंपसूटमध्ये तुमची फिगर अधिक उठावदार आणि आकर्षक दिसते. प्रिंटेड असेल तर तुम्ही चांगल्या तऱ्हेने कॅरी करू शकता.   

 

डेनिम लुक

तुम्हाला जर जंपसूटचा स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही डेनिम लुकही करू शकता. जंपसूटमध्ये डेनिम लुक हा एकदम क्लासी दिसतो. तसंच यामध्ये तुम्ही वेगवेगळे लुक कॅरी करू शकता. अनेक बॉलीवूड अभिनेत्रीही हा लुक बऱ्याचदा कॅरी करताना दिसतात. पटकन तयार होण्यासाठी तुम्हाला हा लुक चांगला आहे. तसंच यामध्ये कटवर्क आणि अनेक गोष्टी तुम्हाला अधिक स्टायलिश लुक देण्यासाठी असतात. 

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)

अॅक्सेसरीज असावे खास

जेव्हा तुम्ही जंपसूट घालता तेव्हा गरज नाही की,  तुम्ही याबरोबर अॅक्सेसरीज घातलेच पाहिजेत.  पण जर घालणार असाल तर त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही स्टायलिश लुक्ससाटी यावर मोठा बेल्ट लाऊ शकता. तसंच तुम्हाला अधिक स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही त्यावर गॉगल, घड्याळ आणि स्टायलिश  स्लिंग बॅग अथवा पर्स कॅरी करू शकता. अशी स्टाईल केल्यास, तुमचा संपूर्ण लुक बदलून जातो. अशा लुकवर लाईट मेकअप करण्यासाठी तुम्ही वापरू शकता MyGlamm ची लिपस्टिक आणि आयशॅडो. 

वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ फॅशन टीप्स

फूटवेअर क्रिएट करेल वेगळी स्टाईल

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण जंपसूट घातल्यावर सर्वात जास्त लक्ष द्यावं  लागतं ते फूटवेअरकडे. कोणत्याही चप्पल यावर चांगल्या दिसत नाहीत. त्यामुळे याचा पूर्ण लुक बदलतो. तुम्हाला स्टायलिश जंपसूट घालायचा असेल त्याला अनुरूप चप्पल तुम्हाला घालाव्या लागतील. उदाहरणार्थ तुम्ही जर एक जंकी अथवा कॉलेज गोईंग गर्ल लुकचा विचार करत असाल तर तुम्ही यासह स्निकर्स घाला. जर तुम्ही ऑफिसमध्ये घालणार असाल तर तुम्ही त्यासह फेमिनिन लुक क्रिएट करा आणि हिल्स अथवा प्लॅटफॉर्म हिल्स कॅरी करा. हे तुम्हाला एलिगंट लुक मिळवून देतील. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

Read More From DIY फॅशन